जवस खाण्याचे फायदे व तोटे | flax seeds in marathi

Flax seeds in Marathi : ज्याला आपण मराठीत जवस अस म्हणतो, हे आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयोगी ठरते. जवस मध्ये विविध जीवनसत्त्वे आणि प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जवस बद्दल माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना हा लेख खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जवस खाण्याचे फायदे व तोटे (flax seeds in marathi) याची माहिती जाणून घेणार आहोत.

जवस चे शास्त्रीय नाव लीनम युसीटॅसिमम आहे आणि ती लीनासेस या वर्गातील वनस्पती आहे.फ्लॅक्स सीड म्हणजे जवस याला आपण आळशी म्हणूनपण ओळखतो, हिंदीत जवसाला आलसी किंवा तिसी असे म्हणतात.

जवस उत्त्पत्ती

जवस या वनस्पतींची उत्पत्ती प्रामुख्याने इजिप्त या देशातील आहे.महाराष्ट्रात रब्बी हंगामात जवस ची लागवड केली जाते.याच्या एक फळामध्ये 10 टोकदार बिया असतात.जवसच्या वनस्पतीच्या खोडापासून धागा बनवतात तर बियांपासून खाद्य तेल निर्मिती केली जाते.

सर्वात जास्त flax seed चे उत्पादन चीन या देशात केले जाते.त्याचबरोबर अमेरिका, बेल्जियम, भारत, फ्रान्स याही देशात जवस चे पीक घेतले जातात.

जवस खाण्याचे फायदे – flax seeds in marathi

सर्वप्रथम आपण जवस खाण्याने काय फायदे होतात, याबद्दल माहिती घेऊ.साधारणतः जवसच्या वनस्पतीला आयुर्वेदिक वनस्पती म्हणून पाहिले जाते.आयुर्वेद नुसार जवस खाण्याने पित्तनाशक समस्या दूर होते, तर कप, वात, आणि पाठीचा कणा दुखणे यासारख्या अनेक समस्या वर उपाय म्हणून पाहिले जाते.

हृदयासाठी उपयुक्त – आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा 3 फॅटी हे ऍसिड जवस मध्ये मुबलक प्रमाणात असते.जर जवस रोजच्या आहारात समाविष्ट केला, तर हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो.

कॅन्सर ला दूर ठेवते – महिलांना होणारे ब्रेस्ट कॅन्सर दूर ठेवण्यास जवस महत्वाची भूमिका बजावतो, तर पुरुषांना प्रोटेस्ट कॅन्सर होण्यापासून रक्षण होते.त्यासाठी जवस दररोजच्या आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे.

फायबर मिळते – फायबर म्हणजेच तंतूमय पदार्थ, आपल्या शरीरातील पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.एक चमचा जवस पासून 3 ग्राम तंतूमय पदार्थ मिळतात.त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि पोट नियमित साफ होण्यास मदत होते.त्याचबरोबर रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात येते.

रक्तदाबाच्या वाढीमुळे हार्ट अटॅक आणि किडनी निकामी होऊ शकते, जवस रक्तदाब नियंत्रित करतो त्यामुळे संभाव्य धोका कमी होतो.

मधुमेह – जवसच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात येतो, परिणामी मधुमेह ची समस्या दूर करण्यासाठी याचा एक महत्वपूर्ण फायदा होतो.

जवसच्या वनस्पती मध्ये लोह प्रमाण अधिक असल्याने अशक्तपणा नाहीसा होतो.त्याचबरोबर लिव्हर ची समस्या दूर होते.रोज एक चमचा जवस ची पूड खाल्ली तर हाडे आणि सांधे मजबूत होतात, आणि वजन आटोक्यात राहते.

मासे आणि अंडी किंवा इतर मांस चे सेवन करणाऱ्याला पुरेसे प्रोटिन्स मिळतात, पण शाकाहारी व्यक्तीला मांसाहारी पदार्थ खात नसल्याने पुरेसे प्रोटिन्स मिळत नाही त्यावर उपाय म्हणून जवस चे सेवन करू शकता.कारण जवस मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असल्याने प्रोटिन्स ची कमतरता भरून काढते.

जवस कसे खावे?

जवसच्या वनस्पतींची फायदे आपण वर पाहिले आहेत.हे फायदे प्राप्त करण्यासाठी योग्य प्रकारे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे जवसाचे सेवन कसे करावे, या विषयी पाहू.

जवसच्या बिया थोडे गरम करून त्यात काळे मीठ घालून तुमच्या वापरानुसार तिखट घालून मिक्स करावे लागते त्यानंतर याची सुखी चटणी करून खावी.

जवस खाण्याचे तोटे (flax seeds in marathi)

जवस खाण्याचे इतके फायदे असूनदेखील त्याचा वापर जास्त झाला तर ते शरीराला हानिकारक ठरू शकेल, त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • मोठ्या शस्त्रक्रियेनंतर जवस खाणे टाळावे.
  • गरोदरपनात जवस खाऊ नये.
  • ज्याला कमी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जवस खावे.
  • रक्तस्राव ची समस्या असणऱ्यांनी जवस खाणे टाळावे.
  • मधुमेह चा त्रास असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जवसाचे सेवन करणे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

जवस चे शास्त्रीय नाव काय आहे?

उत्तर : लीनम युसीटॅसिमम

सारांश (Summary) :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जवस खाण्याचे फायदे व तोटे (flax seeds in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment