भारतातील सर्वात महाग हॉटेल | India’s most expensive hotel in Marathi

मित्रांनो आपण कधी ना कधी हॉटेल मध्ये नक्कीच गेला असाल. नवीन ठिकाणी फिरायला जाणे आपल्याला सर्वानाच खूप आवडते. परंतु फिरण्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे राहण्याची जागा. जेव्हा आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपल्याला रात्री राहण्यासाठी हॉटेल ची आवश्यकता असते. जास्त करून लोक हॉटेल मध्येच राहतात. कारण हॉटेल मध्ये सर्व सुविधा अगदी सहजपणे भेटतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील सर्वात महाग हॉटेल (India’s most expensive hotel in marathi) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
या हॉटेलमधील एका दिवसाचं भाड ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. होय मित्रानो आज आपण अश्याच हॉटेल बद्दल जाणून घेणार आहोत.


भारतातील सर्वात महाग हॉटेल | India’s most expensive hotel in Marathi | Rambhag Palace information in marathi

भारतामध्ये सर्वात जास्त विदेशी पर्यटक राजस्थान फिरण्यासाठी येतात. तेथील कला आणि संस्कृतीला सर्वांना पाहावं वाटतं. राजस्थानमध्ये पर्यटनासाठी जयपूर खूप प्रसिद्ध शहर आहे. जेथे आपल्याला खूप मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक दिसतात. याच राजाच्या शहरात म्हणजेच जयपूर मध्ये भारतातील सर्वात महाग हॉटेल सुद्धा आहे.
या हॉटेल च नाव रामबाग पॅलेस असं आहे. जयपूर मध्ये आपल्याला एकापेक्षा एक सुंदर हॉटेल्स पाहायला मिळतील. काही हॉटेल्स जुन्या सुंदर किल्यांच्या जागी बनवली आहेत.
रामबाग पॅलेस हा सुद्धा एक सुंदर किल्ला होता. परंतु याला हॉटेल बनवून अधिकच सुंदर केले आहे. हे हॉटेल राजाच जीवन कसं असतं हे दाखवते. या हॉटेल मधील भाड्याचा जर विचार केला तर मीडिया च्या रिपोर्ट नुसार येथे एक दिवस राहण्यासाठी सहा लाख रुपये द्यावे लागतात. याशिवाय येथे काही स्वस्त रूम्स सुद्धा भेटतात. परंतु सर्वांची किंमत लाखांमध्ये आहे. यामुळे हे हॉटेल सामान्य माणसांसाठी नाही आहे. या हॉटेल मध्ये फक्त तेच लोक राहू शकतात ज्यांच्याकडे पैश्याची काही कमी नाही.

आज आपण काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील सर्वात महाग हॉटेल (Indias most expensive hotel in Marathi) बद्दल माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: 

Leave a comment