सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली – sindhutai sapkal latest news

सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली - sindhutai sapkal latest news

sindhutai sapkal latest news – सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर इ.स. 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी सिंधूचा विवाह झाला. आयुष्यभर संकटाना सामोरे जात हजारो लेकरांची आई बनली.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.

Sindhutai sapkal organization – सिंधुताई सपकाळ यांनी अनेक संस्था उभा करून समाजसेवा चालूच ठेवली.

  • बाल निकेतन हडपसर, पुणे
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
  • अभिमान बाल भवन, वर्धा
  • गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
  • ममता बाल सदन, सासवड
  • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

sindhutai sapkal age – सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर इ.स. 1947 रोजी झाला. त्यांचे आजचे वय 75 इतके आहे.

sindhutai sapkal death – आयुष्यभर अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे आजचे वय 75 इतके आहे.

रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज दिनांक 4 जानेवारी त्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

sindhutai sapkal latest news – सिंधुताई सपकाळ यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला.

2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

स्रोत – सकाळ न्यूज नेटवर्क

One thought on “सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली – sindhutai sapkal latest news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *