फादर्स डे 2022 शुभेच्छा

वडिलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी १९ जून रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. 

वडिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. यंदा हा दिवस अजून खास करण्यासाठी वडिलांना शुभेच्छा द्या...

बाबा तुम्ही चांगले वडिलअसण्यासोबतच माझे चांगले मित्र आहात...'फादर्स डे'च्या शुभेच्छा बाबा!

बोट धरून चालायला शिकवले आम्हास, आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास, अश्रू पुसून आपले हसवले आम्हास, परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांना हॅप्पी 'फादर्स डे' बाबा!

जर आई धरणी आहे तर वडील गगन आणि मी त्या गगनात उडणारा मुक्त पक्षी वडिलांना 'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा

खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही...

बाबांचा मला कळलेला अर्थ बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी झटणारं अंतःकरण...

तुम्हीही कितीहीमोठे झालात तरी असा एकमेव माणूस आहे ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा...

आयुष्यात सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हेमाझं सर्वात मोठं भाग्य आहे...