मजेशीर मराठी जोक्स

तुमचे मित्र जर तुम्हाला msg करत नसतील तर एक काम करा.
एखाद्या मुलीचा DP ठेवा. लगेचं msg येणार.
"DP मधे कोन हाय"

Whatapp , ती आणि गैरसमज... 
साक्षी : काय delete केल ?
रूपेश : I Love You...
 साक्षी : परत delete कर... 
(इतका वाईट आहे का मी)

कुत्र्याच शेपुट नळीत घातलं तरी ते वाकड ते वाकडच.
कुत्रा : मग नका ना घालू हरामखोरांनो मी सांगितलं का माझं शेपटू नळीतघालायला.

मी सध्या एवढा फ्री आसतोय... कि,

मुंग्या जरी चालताना वाट चुकल्या तरी मी त्यांना मार्गदर्शन करतो...

जीने एखाद्याला चुना लावलाय

तिने आम्हाला हळद लावु नयेम्हणजे झालं. 🤣😂

क्लास संपल्यावर
शिक्षक - काही शंका असतील तर विचारा
मी - सर......
शिक्षक - हा बोल काय शंका आहे तुझी
मी - सर..... तुम्ही कोणता विषय शिकवता

बायको दिसायला सावळी ... असेल तरी चालेल पण खिशाला परवडणारी पाहिजे
कारण बचेगा मनी तभी तो जियेगा धनी

एक साडी निवडण्यासाठी जर तुमची बायको संपूर्ण दुकान पालथे करीत असेल .... तर तुम्ही स्वतः चा अभिमान बाळगला पाहिजे की तिने .... तुम्हाला निवडले आहे ....