सिंधुताई सपकाळ या अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर इ.स. १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले गेले होते.

वयाच्या ९ व्या वर्षी सिंधुताई सकपाळ यांचा वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. घरी प्रचंड सासुरवास होता.

अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.

Your Page!

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पद्मश्री पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सुद्धा समाविष्ट आहे. 

सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी आज  वयाच्या 75 व्या वर्षी  पुण्यात अखेरचा श्वास घेतला

भाषण हाय तर राशन हाय असं म्हणत भाषण करुन मिळालेल्या राशनातून छप्पर हरवलेल्या लेकरांसाठी आई होणारी महाराष्ट्राची माई सिंधुताईस... भावपूर्ण श्रद्धांजली...

ओळख तिची अनाथांची माय, प्रेमाला पोरक्या असलेल्या निराधारांची ती माय, हिमतीसमोर तिच्या हरला तो काळ... चिंधीची झाली सिंधू, सिंधूची झाली माई अशी ओळख तिची ती सिंधुताई सपकाळ...