मोबाईल विषयी काही रोचक तथ्य

जगातील पहिला मोबाईल अमेरिकेतील एका माणसाने 1983 मध्ये 4000 डॉलर म्हणजेच त्या काळच्या 68 हजार रुपयामध्ये खरेदी केला होता.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ब्रिटनमध्ये दरवर्षी जवळ जवळ एक लाख मोबाइल शौचालयात पडतात.

आतापर्यंत 4 अरब मोबाईल सेट लोकांपर्यंत पोहचले आहेत आणि साडेतीन अरब टूथ ब्रश. म्हणजेच टूथ ब्रश करणाऱ्या लोकांपेक्षा मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

मोबाईल फोनचा वापर करणारे लोक 49% गेम खेळण्यामध्ये आणि 30% वेळ सोशल मीडिया वापरण्यासाठी घालवतात.

जगातला पहिला मेसेज Neil Papworth यांनी पाठवला होता आणि हा मेसेज MERRY CHRISTMAS असा होता.

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की शौचालयापेक्षा जास्त बॅक्टरिया आपल्या मोबाईलवर असतात.

2012 मध्ये मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी ॲपलने एका सेकंदात 4 मोबाईल विकले होते. म्हणजेच दिवसाला जवळजवळ 3,40,000.

HTC ने जगातील सर्वात पहिला Android मोबाईल 22 ऑक्टोबर 2008 ला लाँच केला होता.

मोबाईल विषयी अधिक रोचक तथ्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

Click Here