RIP म्हणजे काय ? RIP चा फुल फॉर्म काय आहे?

मित्रांनो तुम्ही अनेक वेळा RIP हा शब्द ऐकला असेल. कोणाचाही मृत्यु झाला की सोशल मीडिया वर त्याचा फोटो ठेवून RIP लिहिलेले स्टेटस तुम्ही नक्कीच पाहिले असतील. हा एक प्रकारचा ट्रेंड सुद्धा सुरू होत आहे.

RIP चा फुल फॉर्म आहे Rest in Peace. यालाच मराठी मध्ये आत्म्याला शांती मिळो असे म्हणतात. यालाच हिंदी मध्ये शान्ति से आराम करो असे म्हणतात. काही लोक याला रिटर्न if possible म्हणतात, परंतु हे चुकीचे आहे.

आरआयपी शब्दाची उत्पत्ती Requiescat In Pace या लॅटिन शब्दापासून झाली आहे. RIP शब्दाचा वापर सर्वात पहिल्यांदा सोळाव्या शतकाच्या आसपास पश्चिमी देशांमध्ये केला गेला होता. 

ईसाई धर्मातील लोक मृत व्यक्तीच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी त्याला पुरल्यानंतर नंतर त्या ठिकाणी त्या कब्र वर आरआयपी (RIP) लिहितात.

आरआयपी च्या जागी वापरले जाणारे दुसरे शब्द
1) देव त्याच्या आत्म्याला शांती देवो. 
2) देव त्याला स्वर्गामध्ये स्थान देऊ दे. 
3) देव त्याला मोक्ष प्राप्त करू दे. 

आरआयपी चे इतर फुल फॉर्म: 
1) Routing Information Protocol
2) Raster Image Processor
3) Refractive Index Profile

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.