तारामासा माहिती मराठी

तारामासा हा एक समुद्री जीव आहे. ज्याला स्टारफिश (Starfish) या नावानेसुद्धा ओळखतात.

तारामासा जगातील सर्व महासागरामध्ये आढळतो.तारामाशाच्या जगभरामध्ये दोन हजार पेक्षा जास्त प्रजाती आढळतात.

त्याच्या शरीराचा आकार ताऱ्याप्रमाणे असतो म्हणून त्याला तारामासा असे म्हणतात.

तारा माशाला जास्तीत जास्त पाच भुजा असतात. परंतु प्रजाती नुसार या भुजा जास्त सुद्धा असू शकतात.

तारा माशाच्या प्रत्येक भुजा च्या टोकाला लहान डोळे असतात. जरी त्यांना खूप डोळे असले तरीही ते चांगल्या प्रकारे पाहू शकत नाहीत.

याला जरी स्टारफिश म्हणत असले तरीही हा वास्तवामध्ये मासा नाही. कारण तारामासा मध्ये माशाप्रमाणे पंखही नसतात आणि श्वसनासाठी कल्ले सुद्धा नसतात.

तारा माशाच्या शरीराची रचना इतर सजीवांपेक्षा वेगळी असते. कारण त्यांना मेंदू ही नसतो आणि त्यांच्या शरीरामध्ये रक्त ही नसते.

तारामासा विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.