जेसीबी चा फुल फॉर्म काय आहे | JCB Full Form in Marathi

JCB Full form in marathi : आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळेला आपल्याला जेसीबी ही मशीन लागते. आणि जेसीबी ला तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहिले असेल. परंतु तुम्हाला जेसीबी चा फुल फॉर्म नक्कीच माहीत नसेल.  आजच्या या पोस्टमध्ये आपण जेसीबी चा फुल फॉर्म (JCB Full Form in Marathi) जाणून घेणार आहोत.

जेसीबी म्हणजे काय (JCB information in marathi)

कंपनीचे नाव जेसीबी
प्रकार खाजगी कंपनी
स्थापना 1945
संस्थापकजोसेफ सिरिल बामफोर्ड
उद्योगजड उपकरणे, कृषी यंत्रसामग्री.

सामान्यपणे जेव्हा आपण कोणत्याही बांधकामाच्या ठिकाणी जातो, तेथे आपल्याला एक मोठी पिवळ्या रंगाची मशीन दिसते. ही मशीन जमीन खोदण्याचे काम करते. अशा प्रकारच्या मशीन ला जेसीबी म्हणतात. परंतु जेसीबी हे एका ब्रिटिश कंपनी चे संक्षिप्त रूप आहे. या कंपनीची सुरुवात साधारणपणे सात दशकापूर्वी झाली होती. यावरून आपल्याला हे समजते की जेसीबी हे एका मशीनचे नाव नसून एका कंपनीचे नाव आहे.

जेसीबी या कंपनीचे मुख्यालय रॉचेस्टर, स्टेफोर्डशिरे, युनायटेड किंगडम येथे स्थित आहे. जेसीबी ही कंपनी जगातील Construction Manufacturer करणाऱ्या कंपनीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीमध्ये तीनशे पद्धतीच्या मशिन्स तयार केल्या जातात. जेसीबी या कंपनीमध्ये साधारणपणे अकरा हजार लोक काम करतात. 2012 च्या एका सर्वेक्षणानुसार जेसीबी या कंपनीचे वार्षिक उत्पन्न €2.75 बिलियन होते.

आशिया खंडामध्ये जेसीबी या कंपनीच्या एकूण 22 फॅक्टरीज स्थापन केल्या गेल्या आहेत. या फॅक्टरी मध्ये बनणाऱ्या मशीन 150 पेक्षा अधिक देशांमध्ये विकल्या जातात. येथे बनणाऱ्या मशीन खूप मजबूत असतात. सन 1948 मध्ये जेसीबी या कंपनीची पहिली मशीन बनवली गेली होती. त्यावेळी कंपनीमध्ये फक्त सहा लोक काम करत होते.

JCB Full Form in Marathi
जेसीबी चा फुल फॉर्म काय आहे (JCB Full Form in Marathi)

जेसीबी चा फुल फॉर्म काय आहे (JCB Full Form in Marathi)

जेसीबी चा फुल फॉर्म आहे Joseph Cyril Bomford. जेसीबी मशीन चा खरं नाव  बॅकहॉ लोडर आहे. जेसीबी ही एक अवजड उपकरणे तयार करणारी कंपनी आहे.  जेसीबी या कंपनीची स्थापना जोसेफ सायरील बामफॉर्ड यांनी केली होती. आणि या कंपनीची सुरुवात 1945 मध्ये झाली होती.

जेसीबी चा अर्थ काय आहे (JCB meaning in Marathi)

तर मित्रांनो जेसीबी हे एका मशीनचे नाव नसून ते एका कंपनीचे नाव आहे. जेसीबी या मशीन ला बॅकहॉ लोडर असे म्हणतात. भारतामध्ये या कंपनीला Escorts JCB Pvt Ltd असे म्हंटले जात होते. आणि 2003 मध्ये या कंपनीचे नाव बदलून जेसीबी इंडिया लिमिटेड असे करण्यात आले.

जेसीबी कंपनीची उत्पादने (JCB products in marathi)

  • ट्रॅक्टर
  • चाकांचे लोडर
  • लष्करी वाहने
  • जनरेटर

जेसीबी मशीन ची कामे

कोणतेही मोठे काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि मजूर लागतात. जड आणि वजनदार पदार्थ उचलण्यासाठी या मशीन चा उपयोग केला जातो. या मशीनचा उपयोग जास्त करून खड्डे खोदण्यासाठी, माती उचलण्यासाठी आणि वजनदार वस्तू उचलण्यासाठी केला जातो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण जेसीबी चा फुल फॉर्म काय आहे (JCB Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जेसीबी म्हणजे काय (JCB information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *