मजेशीर मराठी जोक्स | Jokes in marathi text

Jokes in marathi text : हसणे हे उत्तम औषध आहे आणि चांगल्या हसण्यासाठी मराठी विनोद हे उत्तम औषध आहे. आजच्या या धावपळीच्या जीवनात लोकांना आजही जोक्स वाचायला आवडतात. जोक्स चा इतिहास खूप जुना आहे. लहान मुलांपासून ते वयस्क व्यक्ती सर्वाना जोक्स वाचायला खूप आवडतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi text) जाणून घेणार आहोत.

Jokes in marathi text
मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi text)

मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi text)

जे लोकं म्हणतात ना माझ्या हृदयात तुझ्या
शिवाय कोणालाही स्थान नाही





खरतर त्यांच्याच हृदयात कुंभमेळा
भरलेला असतो..

ती – तू एवढा वेळ कसा झोपू शकतो


मी – डोळे बंद करून

जेव्हा मी लहान होतो
अंधाराला घाबरत होतो.
.
.
.
.
.
.
.
आता मोठा झालो लाईट बिल
पाहिले की उजेडाला घाबरतो.

जेव्हा आपण मेकॅनिक कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑईल पडलेले दिसते.

जेव्हा आपण नाव्ही कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे केस पडलेले दिसतात.

मला एक कळत नाही …

या सगळ्या बँकांना काय अडचण असेल ?

मी : मित्राला कलम 420 लावून जेल मध्ये टाकलंय पोलिसांनी.

ती : 420 जास्त होतय रे.
302 वगैरे वर ऍडजस्ट करा म्हण ना त्यांना.

ती: जर तुला सरकारी जॉब नाही मिळाला तर
आमचं पप्पा तुला reject करतील..

तो: अन जर मला सरकारी नोकरी मिळाली तर
माझे वडील तुला दारात सुद्धा उभे करणार नाही… त्याच काय .!

सुख म्हनजे काय हो..
एखाद्या मित्राबरोबर मूलगी बघायला गेल्यावर



तूम्हाला पाहून तेथील मंडळीनी विचाराव,
नवरा मूलगा हाच का ?


व मूलीन ही गालात हसूण होकार दर्शवावा….

मी :- तुझ्या घरी गेलो होतो,
मला नाही वाटत की आपलं
लग्न होईल..


ती :- का ? पप्पाना भेटलास का.


मी :- नाही तुझ्या बहिणीला..

तुम्ही अश्या माणसाला माफ
करू शकता का?




ज्याने तुमचा चार्जिंगला लावलेला
मोबाईल काढून स्वतःचा लावला
असेल….

प्रोफाईल लॉक ठेवून फ्रेंड रिक्वेस्ट
पाठवणं म्हणजे





कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला
बोलावून मुलगी न
दाखविण्यासारखे आहे…

भाजी खरेदी करताना बायकांचे
नीट निरीक्षण करा
ती उचलते कारलं, दर विचारते
भेंडीचा आणि विकत घेते भोपळा

मी अंघोळ करताना
टॉवेलला हात पुसून,
.
.
.
.
.
Reply करायचो तिला
ती सुद्धा सोडून गेली.

सरदार – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल

पुणेरी पाटी..
रात्री 12नंतर… whatsapp
करू नये….
केल्यास…
 रात्री 2 वाजता..

लँड लाइन वर लाइक केले जाईल..

Internet ने लोक एवढे वेडे झालेत की…
काल मेडीकल मध्ये एक जण
500 mg गोळी ऐवजी 500 MB ची गोळी मागत
होता..

लोकांना वेळेचं महत्व
तेव्हाच कळते
जेव्हा ते मोबाईलला चार्जिंग



बटन ऑन करायला विसरतात….

कोंबड्याची बायको असते
कोंबडी,
.
.
.
.
.
अन् जी माझ्या
जोक्सचा Reply देत नाय
ती पोरगी शेंबडी.

मुलींनी
मुलगा देखणा-चिकना
शोधत बसू नका
मिळेल त्यात adjust करा,
.
.
.
.
.
.
नाहीतर शेवटी टाकला मिळाल्यावर समजेल.

सोपं नसतं अभ्यासचं
टेन्शन असून,
.
.
.
.
.
दिवसभर मोबाईल खेळत
बसणं.

लग्न करणार तर Love Marriage
करणार, उद्या माझ्या पोरांनी बोलायला
नको की…

बापाला एक पण पोरगी पटवता
आली नाही

अहो कुठे आहात? फोन का उचलत नव्हता एवढा वेळ?

अगं घाटात गाडी उलटली होती




म्हणजे? डब्यातली पातळ भाजी गेली का वाया?

अश्याच मुलीशी लग्न करा जिला छान स्वयंपाक करता येत असेल… कारण….
खरकटी भांडी घासणे हे करपलेली भांडी घासण्या पेक्षा सोपं आहे

खरं पाहिलं तर जगातला कुठलाच मनुष्य शाकाहारी नसतो …
कारण ,
थोडं बहुत डोकं तर प्रत्येकच जण खात असतो.

 कांही लोक whatsapp वर फक्त
दोनच स्टेटस पोस्ट करतात….
पहिलं:– good morning….
दूसरं:– good night …..
असं वाटतं….. जणू whatsapp च्या दुकानाचं शटर उघडायची आणि बंद
करायची जबाबदारी यांच्यावरच सोपवली असावी…… आणि मालाच्या खरेदी – विक्रीची जबाबदारी आपली

जिची रोज बस स्टँडवर अर्धा
तास वाट बघायचो,
.
.
.
.
.
.
तिने पण आता ACTIVA घेतली
नशिबच दळभद्र.

मला दुसऱ्या ग्रहावर
नेऊन सोडा,
.
.
माझं नाही पटत इथं
कोणाशी.

काही लोकांसाठी ब्लूटूथ ईयरफोन
म्हणजे मंगळसूत्रच झाले आहे.
.
.
.
.
.
गळ्यात असल्याशिवाय चैनच पडत नाही.

आयुष्यात खुप चुका केल्या असतील…
 

पण ,


रिझल्ट लागण्याआधी पुस्तके कधीच विकली नाहीत….

संधीच सोनं नाही करता
आलं तर..

चांदी, पितळ, लोखंड काहीतरी करा
फक्त त्या संधीची माती करू नका…

Exam फेव्हर

परीक्षेत काही येत नाही नसेल तर ..घाबरू नका
एक वाक्य नक्की लिहून या..

मी पुन्हा येईल

सॉफ्टवेअर च्या जॉबसाठी इंटरव्यू चालू असतो

इंटरव्यू घेणारा : सांग Java म्हणजे काय?

इंटरव्यू देणारा : सर तुम्हाला माहित नाही.?
दोन भावांच्या बायकांना
Java म्हणतात.

इंटरव्यू घेणारा मेला…

अशा कितीतरी मस्तान्या आल्या
आणि गेल्या
 पण घरची काशी ती काशी
कारण
 तिने स्वंयपाक नाही केला तर
बाजीराव उपाशी..!

निष्कर्ष

आजच्या या पोस्टमध्ये आपण मजेशीर मराठी जोक्स (Jokes in marathi text) जाणून घेतले. तुम्हाला हि माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *