बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी | Balasaheb Thackeray Information Marathi

Balasaheb Thackeray Information Marathi : बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. आजच्या या पोस्टमध्ये आपण बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) जाणून घेणार आहोत.

Balasaheb Thackeray Information Marathi
बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi)

बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi)

नावबाळ केशव ठाकरे
टोपणनाव बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट
जन्म 23 जानेवारी 1926 (पुणे)
वडीलकेशव सीताराम ठाकरे
आई रमाबाई केशव ठाकरे
पत्नीमीना ठाकरे
राजकीय पक्षशिवसेना
मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 (मुंबई)
बाळासाहेब ठाकरे यांची माहिती (Balasaheb Thackeray Information Marathi)

जन्म

बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात केशव सीताराम ठाकरे यांच्या पोटी झाला होता. त्यांचे वडील एक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांना संघटित करण्यासाठी संयुक्त मराठी चळवळ मध्ये प्रमुख भूमिका बजावली आणि 1950 च्या दशकात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यासाठी बरेच काम केले आहे.

विवाह

बाळासाहेबांचा विवाह मीना ठाकरे यांच्याशी झाला होता. त्यांच्यापासून त्यांना बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे असे तीन पुत्र झाले. त्यांची पत्नी मीना आणि मोठा मुलगा बिंदुमाधव 1996 मध्ये मरण पावले.

व्यंगचित्रकार

ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. 1950 मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.

शिवसेना पक्ष

ठाकरेंनी जून 19 इ.स. 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.’

शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर 30 इ.स. 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.

सामना वृत्तपत्र

सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र असून ते मुंबई शहरातून प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात सामना मधून बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्रे प्रकाशित होत असत. पण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले.

23 जानेवारी, 1989 रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले होते. ‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला.’ या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.

राजकीय कार्य

झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.

चित्रपट

बालकडू हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन आणि आदर्शांवर आधारित 2015 चा मराठी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वप्ना पाटकर यांनी केली असून दिग्दर्शन अतुल काळे यांनी केले आहे. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरण्यात आला आहे.

बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे नावाचा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित झाला. याची निर्मिती संजय राऊत यांनी केली होती, तर नवाजुद्दीन सिद्दिकी हे ठाकरेंची भूमिकेत होते.

निधन

17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच मुंबई ताबडतोब ठप्प झाली होती, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद पडली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते.

त्यांच्या पार्थिवावर शिवाजी मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी, मनेका गांधी, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार, अमिताभ बच्चन, अनिल अंबानी यांच्यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे विचार (Balasaheb Thakre Quotes in Marathi)

 • जीवनात एकदा निर्णय घेतला की परत माघे फिरू नका, कारण माघे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.
 • तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय मिळालाच पाहिजे.
 • वयाने म्हातारे झालात तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.
 • जीवनात एकदा निर्णय करा आणि समोर चालत राहा, मग तुम्हाला इतिहास घडविण्यापासुन कोणीही थांबवू शकणार नाही.
 • तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
 • एकजुटीने राहा, जाती आणि वाद काढून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
 • नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.

आजच्या या पोस्टमध्ये आपण बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी (Balasaheb Thackeray mahiti Marathi) जाणून घेतली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव

बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव बाळ केशव ठाकरे हे आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कधी झाला?

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) जाणून घेतली. बाळासाहेब ठाकरे माहिती मराठी (Balasaheb Thackeray mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

2 thoughts on “बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी | Balasaheb Thackeray Information Marathi

 1. Really Shivsena Pramukha Balasaheb Thakre was great leader and politician in india.

  Regards,

  Rahul Hujare
  9096418955.

 2. Pingback: 2023 new dey

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *