ओबीसी म्हणजे काय | OBC Full Form In Marathi

OBC Full Form In Marathi : मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या प्रमाणेच आपल्या देशात अनेक जातींमध्ये लोकांना विभागले गेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ओबीसी म्हणजे काय? आजच्या या पोस्टमध्ये आपण ओबीसी चा फुल फॉर्म काय आहे (OBC Full Form in Marathi) जाणून घेणार आहोत.

OBC Full Form in Marathi
ओबीसी चा फुल फॉर्म काय आहे (OBC Full Form in Marathi)

ओबीसी म्हणजे काय? (What is obc in Marathi)

ओबीसी हा भारतातील एक प्रवर्ग आहे ज्याला इतर मागास वर्ग किंवा ओबीसी (Other Backward Class) असे म्हंटले जाते. या प्रवर्गामध्ये अनेक जातींचा सुद्धा समावेश होतो. हा सामाजिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग (समाज) आहे. ओबीसीचे मूळ भारतीय राज्यघटनेच्या कलम 16 (4 आणि 340) मध्ये आहे जिथे ते OBC च्या मागासवर्गीय लोकसंख्येच्या नावाने संकलित केले आहे.

भारतीय राज्यघटनेत ओबीसींना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागासवर्गीय असे वर्णन केले आहे. ओबीसींना सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणात 27 टक्के आरक्षण दिले गेले आहे.

1979 मध्ये केलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार या वर्गात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात येणाऱ्या समाजाचा समावेश करण्यात आला होता. ओबीसी वर्गातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मंडल आयोगाने 1990 मध्ये व्ही.पी. सिंग यांच्या सरकारच्या शिफारशींवरून दिला होता.

ओबीसी चा फुल फॉर्म काय आहे (OBC Full Form in Marathi)

ओबीसी हा भारतातील एक प्रवर्ग आहे. ओबीसी चा फुल फॉर्म आहे Other Backward Class यालाच मराठी मध्ये इतर मागास वर्ग असे म्हटले जाते. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360, तर देशात ओबीसी जातींची संख्या 3744 इतकी नोंद केलेली आहे. इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राष्ट्रीय आयोगाने 2171 प्रमुख ओबीसींची यादी जाहीर केलेली आहे. ह्यांतील उपजाती जमेस धरल्यास ही संख्या आणखीही वाढू शकते.

ओबीसी मधील समाविष्ठ जाती

कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती ओबीसी या प्रवर्गामध्ये मोडतात.

ओबीसी प्रवर्गातील लोकांना मिळणारे लाभ

ओबीसी प्रवर्गातील लोकांना सरकारकडून अनेक प्रकारचे फायदे दिले जातात, जसे की या वर्गातील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण दिले जाते, यासोबतच या वर्गातील लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये वयात सूट दिली जाते.

ओबीसी प्रवर्गातील शाळा आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो जेणेकरून विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासासंबंधी आवश्यक साहित्य खरेदी करता येईल आणि कुटुंबावर कोणताही भार पडणार नाही.

ओबीसी चे इतर फुल फॉर्म (Other full form of OBC in Marathi)

  • Oriental Bank of Commerce (ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स)
  • Outer Backward Caste (बाह्य मागास जात)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ओबीसी प्रवर्गातील लोकांना किती टक्के आरक्षण आहे?

ओबीसी प्रवर्गास केंद्रात 27% तर महाराष्ट्र राज्यात 19% आरक्षण आहे.

ओबीसी चा अर्थ काय आहे (OBC meaning in Marathi)

ओबीसी चा अर्थ आहे Other Backward Class यालाच मराठी मध्ये इतर मागास वर्ग असे म्हटले जाते.

इतर मागासप्रवर्ग (ओबीसी) म्हणजे काय?

इतर मागासवर्गीय (ओबीसी) हा भारतातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित समुदायांचा एक गट आहे. भारत सरकारने 1993 मध्ये ओबीसींना अधिकृतपणे एक वेगळा प्रवर्ग म्हणून मान्यता दिली होती.

ओबीसींना काय लाभ मिळतात?

ओबीसींना शिक्षण, रोजगार आणि सरकारी सेवांमध्ये विविध लाभ आणि आरक्षण मिळते. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष योजना आणि अनुदानासाठीही ते पात्र आहेत.

ओबीसी आयोगांची भूमिका काय?

ओबीसी समाजाच्या कल्याण आणि उन्नतीसाठी उपाययोजना सुचविण्यासाठी भारत सरकारकडून ओबीसी आयोगांची नियुक्ती केली जाते. यादीतून समुदायांचा समावेश किंवा वगळण्याची शिफारसही ते करतात.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ओबीसी म्हणजे काय? (What is obc in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ओबीसी चा फुल फॉर्म काय आहे (OBC Full Form in Marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *