Chhatrapati Shivaji Maharaj question answers : मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे (Chhatrapati Shivaji Maharaj question answers)
Contents
- 1 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
- 2 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
- 3 छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
- 4 छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
- 5 सारांश (Summary)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४
२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड
३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट
४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी ……. हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन
५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण
६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन
७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ
८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट
९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०
१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड
१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०
१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड
१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४
१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा
१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४
१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा
१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे
२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८
२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१
२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६
२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९
२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३
२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश
२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ
२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर
२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज
२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु
३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड
३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)
३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ
३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड
३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण
३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)
३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण
३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई
३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे
४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर
४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते
४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा
४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा
४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट
४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे
४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर
४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड
४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक
५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ
५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड
५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो
५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस
५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर
५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी
५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव
५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस
५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370
५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689
५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ
६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह
६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे
६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in Marathi) जाणून घेतले. ही प्रश्न उत्तरे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारची माहिती दररोज जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
धन्यवाद सर, तुमचे लेख वाचून माझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली. असेच छत्रपती संभाजी महारांचे लेख बनवा. धन्यवाद…
Nice
खूप छान माहिती दिली. यातील काही प्रश्न आमच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुद्धा पडले होते. धन्यवाद…
छान अप्रतिम काम , तुमच्या माहितीचा खूप उपयोग झाला
Swarajya nirmiti
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खूप छान माहिती दिली.
धन्यवाद!
जय शिवराय ♂️
एकच नंबर माहिती दिली सर आपलं खुप खुप धन्यवाद
जय शिवराय
Khup chaan mahiti dili sir thank you
Jay Bhavani Jay shivaji
very good imformation thanku sir/ mam
Jay Bhavani jay shivaji