सूर्यमालेविषयी 40+ प्रश्न उत्तरे | Questions about solar system in marathi

Questions about solar system in marathi : सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती चंद्र आहेत. याशिवाय लाखो लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, कायपरचा पट्टा आदी वस्तू सूर्यमालेत येतात. पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण सूर्यमालेविषयी काही प्रश्न उत्तरे (Questions about solar system in marathi)

अनुक्रमणिका

सूर्यमाला माहिती मराठी (solar system information in marathi)

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे.सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत – बुध, शुक्र हे अंतर्ग्रह, नंतर पृथ्वी. व नंतर मंगळ, गुरू, शनी, युरेनस (हर्शल) व नेपच्यून (वरुण) हे बाह्यग्रह. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती चंद्र आहेत. याशिवाय लाखो लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, कायपरचा पट्टा आदी वस्तू सूर्यमालेत येतात.

पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला ‘निळा ग्रह’ असेही म्हणतात. हिचा व्यास 12,756 कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे 14,95,97,890 कि.मी. एवढे आहे.

सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणजे सूर्य होय. सूर्याचे वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे 99.86% इतके आहे. इतक्या प्रचंड वस्तुमानामुळेच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूंना त्याच्या भोवती फिरावयास लावते. उरलेल्या वस्तुमानाच्या 90% पेक्षा अधिक वस्तुमान हे गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.

सूर्याभोवती फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. ग्रहांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीच्या जवळपास आहे तर धूमकेतू व कायपरचा पट्टा यांची परिभ्रमणाची पातळी ही पृथ्वीच्या भ्रमणाच्या पातळीशी काही अंशांचे कोन करते.

सूर्यमालेविषयी काही प्रश्न उत्तरे (Questions about solar system in marathi)

सूर्यमालेविषयी काही प्रश्न उत्तरे (Questions about solar system in marathi)

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध आहे.

सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आहे.

कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात?

शुक्र ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात.

जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते?

जलग्रह म्हणून पृथ्वी ग्रहाला ओळखले जाते.

सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील ग्रह कोणता?

सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील ग्रह पृथ्वी आहे.

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे.

सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह बुध आहे.

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात?

पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस परिवलन म्हणतात.

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात?

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस परिभ्रमण म्हणतात.

सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता?

सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह गुरू आहे.

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आहे.

सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह शुक्र आहे.

मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती?

फोबोज आणि डीमोज

कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते?

मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते.

गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे?

गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत 1397 पटीने मोठा आहे.

कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते?

गुरू ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते.

सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह टायटन आहे.

सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता?

सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह शनि आहे.

युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो?

प्रजापती व वासव या नावाने युरेनस ग्रह ओळखला जातो.

सूर्यमालेविषयी 40+ प्रश्न उत्तरे (Questions about solar system in marathi)

गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो?

गुरु ग्रह बृहस्पति नावाने ओळखला जातो.

नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो?

वरून व हर्षल या नावाने नेपच्यून ग्रह ओळखला जातो.

नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो?

नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु 41 वर्षाचा असतो.

सूर्यमालेतील ग्रह व त्यांच्या उपग्रहांची संख्या?

पृथ्वी – 01
मंगळ – 02
गुरु – 79
शनि. – 82
युरेनस – 27
नेपच्यून – 14

सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत?

सूर्यमालेतील बुध व शुक्र ग्रहाला उपग्रह नाहीत.

सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे?

सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या आठ आहे.

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे?

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर 14 कोटी 96 लाख किमी आहे.

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे?

चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3 लाख 84 हजार किमी आहे.

सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?

सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास 8 मिनिटे 20 सेकंद लागतात.

चंद्रचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो?

चंद्रचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास 1.3 सेकंद लागतात.

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे?

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000⁰ C आहे.

चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात?

चंद्रा प्रमाणेच शुक्र ग्रहाच्या कला दिसून येतात.

चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो?

चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा 50 मिनिटे उशिरा उगवतो.

ग्रहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता?

सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

सूर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही?

बुध सूर्यमालेतील ग्रहावर वातावरण नाही.

पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो?

पृथ्वीवरून चंद्राचा 59 टक्के पृष्ठभाग दिसतो.

पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे?

पृथ्वीच्या परिवलन कालावधी 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद आहे.

पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे?

पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद आहे.

पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे?

ध्रुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला?

युरेनस या ग्रहाचा शोध विल्यम हर्षल या खगोल शास्त्रज्ञाने लावला.

नेपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला?

नेपच्यून या ग्रहाचा शोध जॉन गेल या खगोल शास्त्रज्ञाने लावला.

सुर्यमालेबाहेरील ग्रहांमधील मोठे अंतर मोजण्याचे एकक कोणते?

सुर्यमालेबाहेरील ग्रहांमधील मोठे अंतर मोजण्याचे एकक पार्सेक आहे.

सूर्यमालेचा राजा कोण?

सूर्यमालेचा राजा सूर्य आहे.

सूर्यमाला म्हणजे काय?

सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह आहेत. आठ पैकी सहा ग्रहांच्या भोवती चंद्र आहेत. याशिवाय लाखो लघुग्रह, बटुग्रह, धूमकेतू, कायपरचा पट्टा आदी वस्तू सूर्यमालेत येतात.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सूर्यमाला माहिती मराठी (solar system information in marathi) जाणून घेतली. सूर्यमालेविषयी काही प्रश्न उत्तरे (Questions about solar system in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Comment