शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती | Names of Shivaji Maharaj bodyguards

Names of Shivaji Maharaj bodyguards : शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल. शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या अंगरक्षकांना स्वराज्य रक्षक असे म्हंटले जात होते. शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये 21 व्या अध्यायामध्ये महाराजांच्या दहा अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे (Names of Shivaji Maharaj bodyguards) जाणून घेणार आहोत.

Names of Shivaji Maharaj bodyguards
शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे (Names of Shivaji Maharaj bodyguards)

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे (Names of Shivaji Maharaj bodyguards)

  1. जीवा महाला
  2. संभाजी कावजी कोंढाळकर
  3. संभाजी करवर
  4. काताजी इंगळे
  5. कोंडाजी कंक
  6. कृष्णाजी गायकवाड
  7. सिद्दी इब्राहीम
  8. सुरजी काटके
  9. विसाजी मुरुंबक
  10. येसाजी कंक

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची माहिती

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे आता आपण जाणून घेतली. आता आपण त्यांची माहिती जाणून घेऊ.

जीवा महाला

जिवाजी महाला हे श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांचे अंगरक्षक होते, त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत श्रीमंत छत्रपती शिवाजीं महाराजांना वाचवले होते. जिवाचे मूळ गाव कोंडवली बुद्रुक (मौका/खारे) हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव धोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. प्रसिद्ध इतिहासंशोधक श्री.पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांनी जिवा महाल यांचे महाबळेश्वरजवळ कोंडवली या गावी त्यांचे वंशज शोधून काढले आहेत.

शिवाजी राज्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर अफझलखानाच्या ‘सय्यद बंडा’ नावाच्या रक्षकाने शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला. जिवाने सय्यद बंडाशी दोन हात करून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते. सैयद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडला होते, “होता जिवा म्हणून वाचला शिवा’, ही म्हण या प्रसंगावरून पडली आहे.

संभाजी कावजी कोंढाळकर

संभाजी कावजी कोंढाळकर ताजा दमाचा मर्दगडी होता.भल्यामोठ्या उंचीचा आणि १० हत्ती एवढ्या ताकदीचा.एका कथेनुसार तो जेवायला बसल्यावर संपूर्ण बोकड खात असे.यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज लावता येईल. संभाजी कावजी कोंढाळकर हे शरीरान व ऊंचीने अफझलखान यांच्या येवढे होते. जेव्हा महाराजानी अफझलखानचा कोथळा बाहेर काढला तेव्हा अफझलखान मेलेला नव्हता तो बाहेर पळु लागला. संभाजी कावजी न त्याच डोकं शरीरापासून वेगळं केल होत.

येसाजी कंक

त्यांचा जन्म भूगोंडे येथे राजगडच्या पायथ्याशी झाला होता. ते कंक कुळातील होते. त्यांचे वडिलांचे नाव दादोजी कंक आहे. तो कंक (संस्कृतमधील गंगा राजवंशातून आला) कुलीन मराठा जातीचा होता. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पाऊल ठेवणारे सैनिक होते. ते गनिमी युद्धाच्या तंत्रात तज्ज्ञ होते.

प्रतापगडच्या लढाईत त्यांची प्रमुख भूमिका होती. त्यांनी मद्यधुंद हत्तीबरोबरही लढा दिला. ते शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी आणि सहकारी होते. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात असलेल्या भाटघर धरणाला आता येसाजी कंक जलसागर म्हणतात. कंक यांनी फत्ते केलेल्या एका कामगिरीवर फत्तेशिकस्त हा चित्रपट आधारित आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

कान्होजी आंग्रे

आदिलशहा बरोबर तह केल्यामुळे शिवाजी महाराजांना कोणता किल्ला परत करावा लागला?

सिंहगड किल्ला

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे जाणून घेतली. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. जर तुमच्याकडे याबद्दल अजून काही माहिती असेल तर ती आमच्यापर्यंत नक्की शेअर करा ती आम्ही या लेखामध्ये नक्कीच समाविष्ट करू.

One thought on “शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती | Names of Shivaji Maharaj bodyguards

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *