मित्रांनो तुम्हाला दररोज नवीन काहीतरी जाणून घ्यायला नक्कीच आवडत असेल. रोचक तथ्य (Marathi Rochak Tathya) वाचायला तर तुम्हाला खूप आवडतं असतील. आजच्या या पोस्टमध्ये आपण 50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (50 Marathi Rochak Tathya) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50 Marathi Rochak Tathya
- 2 20 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 20 Marathi Rochak Tathya
- 3 30 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 30 Marathi Rochak Tathya
- 4 40 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 40 Marathi Rochak Tathya
- 5 50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50 Marathi Rochak Tathya
- 6 निष्कर्ष:
50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50 Marathi Rochak Tathya
1) इंडोनेशिया या देशातील (Indoneshia facts in marathi) शाळांमध्ये एक विशेष परंपरा आहे, यामध्ये सर्व शाळकरी मुलांच्या आईना एक दिवस शाळेत आमंत्रित करतात आणि त्यांची मुले आईचे पाय धुतात.”आईच्या चरणीचं आपले स्वर्ग आहे” ही भावना आणि संस्कार मुलांच्या मनात रुजवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
2) अमेरिकेच्या हवाई या भागातील हवाईयन संस्कृतीनुसार ज्या महिला त्यांच्या डाव्या कानात फुल अडकवतात त्या विवाहित असतात, व ज्या उजव्या कानात फुल अडकवतात त्या अविवाहित असतात.
3) एका अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, घराबाहेर चपला काढणे ही भारतीयांची Concept खुपच फायदेशीर आहे. कारण चपलांमध्ये Toilet Seat पेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. त्यातील 96% बॅक्टेरिया या Fecal Bacteria असतात. ज्यांच्यामुळे वेगवेगळे आजार उदभवतात.
4) अपयशाला कंटाळून एलोन मस्कने टेस्ला कंपनी विकण्यासाठी ॲपलचे सीईओ टीम कूक यांच्याशी संपर्क केला होता. पण त्यांनी मिटिंग करायला नकार दिला.आज टेस्लाचं मार्केट कॅपिटल ८०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. तर एलोन मस्क जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत.
5) 70% लोकांना जुनी गाणी ऐकायला आवडतात कारण ते त्यांच्या आठवणींशी जोडलेले असतात.
6) एक मादी ऑक्टोपस एका वेळेस तब्बल 56000 अंडी घालते. ही अंडी परिपक्व होईपर्यंत ऑक्टोपस 6 महिने त्यांचे रक्षण करते. जन्माच्या वेळेस ऑक्टोपसची पिल्ले तांदळाच्या एका दाण्याच्या आकाराची असतात.
7) आपण आपल्या दैनंदिन जीवनात GPS प्रणालीचा वापर कधीतरी नक्कीच करत असतो हि सेवा आपल्याला अगदी मोफत मिळते.परंतु ही सेवा ऑपरेट करण्याचा एका दिवसाचा खर्च 2 मिलियन डॉलर्स इतका आहे. हा खर्च अमेरिकेच्या टॅक्स रिव्हेन्यू मधुन दिला जातो. ही सेवा देण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत 24 सॅटेलाईट कार्यरत आहेत.
8) आळंदीतील अविनाश बोरूदिया यांच्या “रुबाब” या सलूनमध्ये चक्क 80 ग्रॅम सोन्याच्या वस्तयाने ग्राहकांची दाढी केली जाते. या वस्तऱ्याची किंमत 4 लाख रुपये असुन प्रत्येक दाढीसाठी केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाते.
9) RH-null हा जगातील सर्वात दुर्लभ रक्तगट आहे. हा रक्तगट कोट्यवधींपैकी एखाद्या व्यक्तीमध्ये आढळतो. या रक्तगटाला “गोल्डन रक्तगट” असे देखील म्हणतात. जगाला या रक्तगटाची ओळख झाल्यापासून ते आत्तापर्यंत या रक्तगटाच्या केवळ 50 व्यक्तीच समोर आल्या आहेत.
10) इंद्रधनुष्य ही निसर्गाची खुपच मनमोहक कलाकृती आहे. परंतु इंद्रधनुष्याचे फोटो टिपण्याअगोदरच तो गायब होतो, परंतु चिनी तैवानच्या Yangmingshan प्रांतात 30 नोव्हेंबर 2017 रोजी तयार झालेला इंद्रधनुष्य तब्बल 8 तास 58 मिनिटे इतका वेळ तग धरून राहिला होता.याच्या नावे जगातील सर्वात जास्त वेळ टिकणारा इंद्रधनुष्य हा विक्रम नोंदवण्यात आला आहे.
20 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 20 Marathi Rochak Tathya
11) तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये अगोदरपासूनच Installed असलेल्या Clock App नक्कीच पहिले असेल परंतु तुमच्या कधी लक्षात आले आहे का, की जशी-जशी वेळ पुढे जाते तसेच त्या App Icon वरील काटे देखील फिरतात व योग्य वेळ देखील दर्शवतात.
12) Henely Partners च्या माहितीनुसार भारतीय लोक फक्त पासपोर्टच्या जोरावर जगातील 58 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. पासपोर्ट किंगमध्ये भारताचा 85 वा क्रमांक लागतो.
13) आपण सर्वजण हे जाणतोच की लहान मुल जन्मल्यानंतर त्याला दात नसतात.पण तुम्हाला माहित आहे का? जन्माला येणाऱ्या 2000 लहान मुलांमध्ये एक असं मुल असतं जे दाताबरोबट जन्माला येत.
14) जगामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण जेवण करताना श्वास घेणे हे फक्त मानवच करू शकतो.
15) जर तुमचा मोबाईल वादे जड़ काम करताना हँग झाला असेल तर त्याला चार्जिंगला लावा ज्यामुळे तो पूर्वस्थितीत येईल.
16) Electric Eel नावाचा एक असा मासा आहे जो 600 वॉल्ट वीज आपल्या शरीरात सामावून घेण्याची क्षमता ठेवतो.
17) गोल्ड फिश हा एक मासा आहे जो आपल्या संपूर्ण जीवनामध्ये डोळे कधीच बंद करत नाही.
18) डॉक्टरांनी लिहिलेल्या त्यांच्या डॉक्टर लिपिमुळे प्रत्येक वर्षी जवळजवळ सात हजार लोकांचा मृत्यू होतो.
19) युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या एका अभ्यासामध्ये हे सिद्ध झालं की एका दिवसामध्ये 10 तासापेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांना मरणाचा धोका जवळजवळ 50% पर्यंत असतो.
20) ट्रेनच इंजिन सुरुवातीला चालू करण्यासाठी कमीत कमी 25 लिटर डिझेल लागते. आणि एक किलोमीटर जाण्यासाठी 20 लिटर डिझेल खर्च होते.
30 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 30 Marathi Rochak Tathya
21) ज्या व्यक्ती ऑनलाईन चॅटिंग करताना खुपच Expressive आणि मजेशीररित्या बोलतात परंतु प्रत्यक्ष भेटीत खुपच लाजाळू असतात अश्या व्यक्तींना “Textrovert” म्हणतात.
22) “The Invisible Jellyfish” हा पृथ्वीतळावरील सगळ्यात धोकादायक जीव आहे. हा जेलिफिश अगदी पाण्यासारखाच दिसतो आणि जेलिफिश हा कोब्रापेक्षा तब्बल 100 पटीने अधिक विषारी आहे.
23) बिबट्या वाघ हा मांजर परिवारातील एकमेव असा प्राणी आहे जो जमिनीबरोबरच पाण्यातदेखील उत्तमप्रकारे शिकार करतो. बिबट्याला पोहण्याची कला अवगत असते त्यामुळे तो मासे, कासव आणि इतर जलचर प्राण्यांचीदेखील शिकार करतो.
24) कझाकिस्तान या देशातील कलाची या गावातील लोक बहुतांश वेळेस कुठेही झोपलेले आढळतात. असे सांगितले जाते की, या गावामध्ये युरेनियम विषारी गॅस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे येथील कधीही आणि कुठेही झोपी जातात. या गावाला “Sleepy Hollow” असे देखील म्हटले जाते.
25) जगातील 60% (3.8 अब्ज) लोक आजही सुरक्षित आणि स्वच्छ पाण्यापासून वंचित आहेत. भारतात 4 प्राथमिक शाळांमागे एका शाळेत, मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ती मुले अस्वच्छ पाणी पितात किंवा तहानलेली राहतात. भारतात दरवर्षी, पाच वर्षाखालील 7 लाख मुले, जुलाब-हगवण-डायरिया यासारख्या अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजाराने मरतात.
26) सर्वात जास्त वयामध्ये बाप बनण्याच्या विश्वविक्रम हा भारतातील राजस्थान राज्यातील सुदूर गावातील रहिवासी नानु राम जोगी या व्यक्तीच्या नावावर आहे. जोगी यांनी 2007 मध्ये वयाच्या 90 व्या वर्षी आपल्या चौथ्या पत्नीपासून 21 व्या मुलाला जन्म दिला होता.
27) नेदरलँडमध्ये जर तुम्ही सायकल घेऊन ऑफिसला जात असाल तर कंपनीकडून तुम्हाला प्रत्येक किलोमीटर मागे 16 रुपये दिले जातात. वाहनांमुळे होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो.(Netherland facts in marathi)
28) Zoom App चे Founder एरिक युआन हे अमेरिकेत राहत असताना चीनमध्ये राहणाऱ्या त्यांच्या प्रेयसीसोबत कनेक्ट राहण्यासाठी मार्ग शोधत होते त्यावेळेस त्यांना Zoom App ची कल्पना सुचली.
29) युक्रेन या देशात जर एखाद्या मुलाचा Marriage Pruposal मुलीने नाकारला तर मुलगा रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणुन ती मुलगी किंवा तिचे कुटुंबीय त्या मुलाला भोपळा देतात.
30) आपल्या घरातील धुळीमध्ये खरंतर मोठ्या प्रमाणात मृत त्वचा असते. प्रत्येक तासाला मनुष्याच्या त्वचेचे 6,00,000 कण हे शरीराबाहेर पडत असतात.
40 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 40 Marathi Rochak Tathya
31) पूर्वीच्या काळात प्राण्यांपासून वाद्यांची तार तयार केली गेली होती.सुरुवातीला मेंढ्या किंवा कोकरू सारख्या प्राण्यांच्या आतड्यापासून वाद्यांची तार तयार केली गेली. आता, वाद्ये बनविणारे त्यासाठी मेटल वायरिंग वापरतात.
32) मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे कानाच्या मध्य भागात असते. स्टॅपल (किंवा स्टार्रप) हाड हे फक्त 2.8 मिलीमीटर लांबीचे असते.
33) आपण जे चव घेतो ते जवळपास 80 टक्के खरंतर वास गंध/ वास असते.फ्लेवर हे चव आणि वासाच्या धारणेचे कॉम्बीनेशन असते.
34) 2013 मध्ये चीनच्या एका व्यक्तीला छोट्याश्या चुकि करिता 1600 डॉलर्सचा दंड भरण्यास सांगितला होता. तेव्हा त्या व्यक्तीने सर्व पैसे चिल्लर (कॉइन्स) मध्ये जमा केले होते, व ते मोजण्याकरिता बँकेतील 18 कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस लागला होता.
35) दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी सिकेदी रीस्तोला त्याच्या मर्सीडीज कारवर इतके प्रेम होते की त्याच्या
शेवटच्या इच्छेनुसार त्याला त्याच्या या आवडत्या
कारमध्ये दफण करण्यात आले होते.
36) जगातला सर्वात मोठा मानवी झेंडा बनवण्याचा
विक्रम भारताच्या नावावर आहे. 2014 मध्ये 50,000 लोकांनी चेनईच्या VMCA मैदानात एकत्र येऊन हा मानवी झेंडा बनवला होता.
37) धोनीसाठी प्रसिद्ध असलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’
त्याला त्याचा मित्र संतोष लाल यांनी रांची येथे टेनिस-बॉल स्पर्धेदरम्यान शिकविला होता.
38) नवी दिल्ली येथे भारतातील सर्वात पहिले oxibar सुरू केले आहे. या Oxibar मध्ये शुद्ध हवा दिली जाते. या oxibar मध्ये 15 मिनिटांचे 300 रुपये आकारले जातात.
39) जपानमधील लोक हे सर्वाधिक साक्षर मानले जातात. इथे साक्षरता दर 100% आहे. इथे वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर भारताप्रमाणे वादग्रस्त दुर्घटना, राजकारण, फिल्मी मसाले ह्या गोष्टींवर बातम्या छापल्या जात नाहीत. इथे वृत्तपत्रांमध्ये आधुनिक माहिती आणि आवश्यक बातम्याच छापल्या जातात.
40) भारतीय चित्रपट अभिनेता कीच्चा सुदीप यांनी कर्नाटक मधील 4 सरकारी शाळांना दत्तक घेतलं आहे. ह्या सरकारी शाळांचा होणारा खर्च आता कीच्चा उचलणार आहेत, ह्याशिवाय ह्या शाळांमध्ये विद्याथ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून शिष्यवृत्ती योजना देखील राबवण्यात येणार आहेत.
50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50 Marathi Rochak Tathya
41) गुटखा, तंबाखू इत्यादी व्यसन लागणाऱ्या वस्तू बनवणाऱ्या कंपन्या जानेवारीच्या महिन्यामध्ये आपल्या वस्तूंच्या जाहिरातीवर जास्त पैसे खर्च करते कारण नवीन वर्षाला खूप सारे लोक ह्या वस्तूंना सोडण्याचा विचार करत असतात.
42) जर्मनीमध्ये दररोज 15 बॉम्ब आज देखील असे भेटतात, ज्यांना दुसऱ्या महायुध्दात वापरले जाणार होते. असे बॉम्ब शोधून त्यांना डिफ्युज केले जातात.
43) जगामध्ये सर्वात जास्त CCTV कॅमेरे भारतातील
चेन्नई शहरामध्ये लागले आहेत, इथे प्रत्येक किलोमिटर अंतरावर एकूण 654 कॅमेरे लागले आहेत.
44) पाकिस्तानच्या लाहोर मध्ये पक्षांसाठी एक घटटे
बनवले आहे आणि जे इतके मोठे आहे की पूर्ण शहरातील पक्षी ह्यामध्ये येवून राहू शकतात.
45) सुरत मधील सरथाना ह्या भागात राहणाऱ्या विजय कथेटिया यांनी आपल्या 2 महिन्याच्या मुलीला चंद्रावर 1 एकर जमिनीची मौल्यवान भेट दिली आहे. आता ही मुलगी चंद्रावर जमीन मिळवण्याच्या बाबतीत सर्वात कमी वयाची व्यक्ती बनली आहे. “कोणीतरी खटेच म्हटले आहे की वडीलांपेक्षा जास्त मुलीला कोणीही प्रेम करू शकत नाही”.
46) आयफिल टॉवरवर जो टंग केला आहे, त्या रंगाचे वजन 10 हत्तींच्या वजना इतके आहे. ह्याचा अर्थ जवळपास 60 टन वजन केवळ टंगाचेच आहे. प्रत्येक सात ते आठ वर्षामध्ये पूर्ण टॉवटवट टंग केला जातो,
ज्यामध्ये जवळपास तीन वर्षाचा कालावधी लागतो.
47) चीनच्या CHINGQING CITY मध्ये LEHE LEDU WILDLIFE एक असं प्राणिसंग्रहालय आहे, जेथे पर्यटनासाठी आलेल्या लोकांना पिंजऱ्यात ठेवून संग्रहालय फिरवलं जातं आणि सगळ्या जनावरांना मोकळे सोडलं जातं.
48) रायन हा जगातील सर्वात लहान व सर्वात जास्त सबस्क्रायबर असलेला युट्युबर आहे. त्याचे युट्युबवर
9.4 दशलक्ष स्बस्क्रायबर आहेत.
49) Octopus हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचे रक्त निळ्या रंगाचे आहे.
50) जगातील सर्वात महाग द्रव पदार्थात विंचूचे विष सर्वात हे सर्वात महाग आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (50 Marathi Rochak Tathya) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल: