50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य | 50 Intresting Facts in Marathi

Intresting Facts in Marathi : नमस्कार मित्रांनो, आजच्या या पोस्टमध्ये आपण काही 50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (50 Intresting Facts in Marathi) जाणून घेणार आहोत. हे रोचक तथ्य (Intresting Facts) तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर टाकतील. चला तर मग पाहूया. 

Intresting Facts in Marathi

50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (50 Intresting Facts in Marathi)

1) जगातील सर्वात महाग नंबर प्लेट FI कार ची आहे. या कारची किंमत 19.21 CRORE आहे तर या नंबर प्लेटची किंमत 132 CRORE आहे.

2) एका वेळेस मुकेश अंबानी (Mukesh Ambani facts in marathi) यांच्या MERCEDES कारची चावी हरवली होती, तेव्हा त्यांच्या मॅनेजरने MERCEDES च्या ऑफिसला फोन लावला. त्याच दिवशी रात्री 3 वाजता जर्मनी वरून एक अधिकारी हेलिकॉप्टरने कारची DUPLICATE चावी घेऊन आला होता.

3) सुदानची सुप्रसिद्ध मॉडेल NYAKIM GATWECH ही जगातील सर्वात काळ्या त्वचेची महिला आहे. त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवलं गेलं आहे.

4) एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे की Tom & Jerry यांच्या शेवटच्या एपिसोडमध्ये दोघे आत्महत्या करतात, परंतु Tom & Jerry यांच्या शेवटच्या एपिसोडमध्ये दोघेही एका रेल्वेच्या पटरीवर बसलेले दिसून आले. जेथे रेल्वे येण्याचा कोणताच आवाज नाही.

5) झुरळाचं रक्त पांढऱ्या रंगाचं असतं. कारण झुरळाच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमी असते. आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताचा रंग लाल होतो.

6) जपानच्या ओसाका शहरामध्ये बनवलेली गेट टॉवर बिल्डिंग ही जगातील एकमेव अशी बिल्डिंग आहे, ज्यामधून एक्स्प्रेस हायवे जातो. हा हायवे बिल्डिंगचा पाचवा, सहावा आणि सातवा मजला कवर करतो आणि या मजल्यावर कोणतंही घर नाही.

7) भारताचे सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी 131 टेस्ट सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये एकही नो-बॉल टाकला नाही.

8) भारतात एकूण 33 लाख 69 हजार इतक्या लोकांकडे बंदूक ठेवण्याचा परवाना आहे. त्यातील 12 लाख 77 हजार परवाने केवळ एकट्या उत्तरप्रदेश राज्यात आहेत.

9) जगामध्ये 30% लोक अजूनही असे आहेत ज्यांनी अजूनपर्यंत मोबाईल फोन वापरला नाही.

10) सायकॉलॉजी नुसार आपण अश्या लोकांपासून जास्त आकर्षित होतो ज्यांच भेटणं आपल्यासाठी खूप अवघड असतं.

20 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (20 Intresting facts in marathi)

11) गरमाई नावाचा एक असा मासा आहे जो पाण्यात तरंगुही शकतो, जमिनीवर चालुही शकतो आणि हवेतही उडू शकतो.

12) ज्या डॉक्टरांनी रोगांपासून संरक्षण करण्यासाठी हात धुण्याचा मार्ग सांगितला होता, त्याला लोकांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. अजब आहे ना दुनिया…

13) ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असतो त्याच दिवशी संपूर्ण जगातील 90 लाख लोकांचाही वाढदिवस असतो.

14) स्विझरलँड मध्ये जगातील सर्वात जास्त चॉकलेट खाल्ली जातात. येथील प्रत्येक व्यक्ती एका वर्षामध्ये सरासरी 10 किलो चॉकलेट खातो.

15) रुसचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन गेल्या 18 वर्षापासून रूसच्या सत्तेवर आहेत, पण ते कधीच पाकिस्तानला गेले नाहीत. दक्षिण आशिया मध्ये भारत हा एकमात्र असा देश आहे जेथे पुतीन येतात.

16) सुपरहिट भारतीय चित्रपट K.G.F या मध्ये गरुडा ही खलनायकची भूमिका साकारणारे रामचंद्रन राजू हे खऱ्या आयुष्यात K.G.F फेम अभिनेते यश यांचे पर्सनल बॉडीगार्ड आहेत.

17) एका वर्षात 15 दशलक्ष मुलींचे बालविवाह म्हणजे 18 हून कमी वय असताना लग्न लावले जाते. या आकडेवारीनुसार प्रत्येक मिनिटाला 28 मुलींचे बालविवाह होतात.

18) दुबई मध्ये एक असं ATM आहे जे पूर्णपणे 24 कॅरेट सोन्याने बनलेले आहे. यामधून पैश्याच्या जागी सोन्याचे शिक्के निघतात. हे ATM अबूधाबी मधील अमीरात पॅलेसच्या लॉबिमध्ये बसवले आहे.

19) सायकॉलॉजी सांगते एक साधारण महिला एका दिवसामध्ये जवळ जवळ नऊ वेळा आपल्या लूक बद्दल विचार करते. आणि ते आपलं एक वर्ष यामध्ये घालवतात की आज मी काय घालू?

20) जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग (तरंगणारा) सौर प्रकल्प मध्यप्रदेश मधील खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर धरणावर बांधला जात आहे. 600 मेगावॅटचा हा प्रकल्प असून यासाठी 410 दशलक्ष डॉलर इतका खर्च येणार आहे.

30 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (30 Intresting facts in marathi)

21) अलीकडील एका अहवालानुसार सर्वाधिक भिकाऱ्यांची संख्या पश्चिम बंगाल राज्यात आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांचा नंबर लागतो. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 4 लाख भिकारी आहेत.

22) बोस्टन कन्सल्टिंग समूहाच्या ताज्या अहवालानुसार जगातील सुमारे 50 टक्के लोक इतर देशांत जाऊन नोकरी करू इच्छितात. मात्र आता अशा लोकांचा श्रीमंत देश नव्हे तर लहान देशांकडे जास्त कल असल्याचे दिसते.

23) जर तुम्ही हे सत्य करून दाखवता की Paranomal Activity जसं की भूत-प्रेत खऱ्या आयुष्यामध्ये असतात. तर तुम्हाला James Randi Educational Institute एक मिलियन डॉलर बक्षीस देते.

24) आपल्या सर्वांचं आवडतं मांजर आपल्या आयुष्यातील 66 टक्के वेळ झोपण्यात घालवते.

25) शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार आपल्या सर्वांच्या स्वप्नामध्ये येणारा प्रत्येक चेहरा आपण एक ना एक वेळेस पाहिलेला असतो.

26) रात्री झोपेत स्वप्ने तर आपण सर्वजण पाहतो परंतु स्वप्नामधील हे तथ्य आहे की, आपल्याला कधीच हे नाही लक्ष्यात राहत की आपलं स्वप्न सुरू कोठून झालं होत?

27) तुम्ही कधी जगातील सर्वात महाग किड्याविषयी ऐकलं आहे का? हा आहे स्टैग बीटल. ज्याची किंमत 2500$ म्हणजे जवळजवळ दोन लाख रुपये आहे.

28) अजूनही जमिनीच्या पोटामध्ये इतकं सोन आहे की जर पृथ्वीवरील सगळ्या लोकांना वाटलं तर प्रत्येक माणसाला अर्धा तोळा सोन मिळेल.

29) जगातील सर्वात जास्त वर्ष जगणारा पोपट COOKIE हा होता. ज्याचा 2016 मध्ये 82 व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे.(Cookie Parrot Facts in Marathi)

30) दक्षिण ऑस्ट्रेलिया मध्ये कुबेर पेडी नावाचं एक गाव जमिनीच्या खाली म्हणजेच UNDERGROUND राहतं. या गावामध्ये जवळ जवळ 1500 घरे आहेत.

40 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (40 Intresting facts in marathi)

31) भारताच्या केरळ राज्यामध्ये राहणाऱ्या NATURE MS या 24 वर्षीय मुलाने 4 तास 10 मिनिटे आणि 5 सेकंद 60000 मधमाश्या आपल्या चेहऱ्यावर ठेवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. तो मुलगा म्हणतो की मधमाश्या माझ्या चांगल्या मित्र आहेत.

32) दुबई मधील MIRACLE GARDEN हे जगातील सर्वात मोठे NATURAL FLOWR GARDEN आहे ज्यामध्ये 5 करोडपेक्षा जास्त फुले आहेत.

33) चीन हा एकमेव असा देश आहे जेथे श्रीमंत आणि ताकदवर लोक गुन्हा केल्यानंतर आपल्या जागी दुसऱ्याला तुरुंगात पाठवू शकतात.

34) JON RIPPLE नावाच्या या माणसाने त्याच्याच शहरात एक चोरी केली आणि तो तेथेच बसून राहिला. तो म्हणत होता की पत्नी बरोबर राहण्यापेक्षा मला तुरुंगात टाका. म्हणजेच या व्यक्तींनी आपल्या पत्नीपासून वाचण्यासाठी चोरी केली होती.

35) जगातील पहिली सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलियस या व्यक्तींनी काढली होती. आणि त्या वेळेस त्याला सेल्फी काढण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ लागला होता.

36) भारतीय Go Airline फक्त महिलांना नोकरीवर ठेवते कारण त्या वजनाने हलक्या असतात. त्यामुळे कंपनीचे एका वर्षात 500,000 डॉलर इतके इंधन वाचते.

37) विकिपीडियावर इतकं ज्ञान भरलेलं आहे की जर तुम्ही प्रत्येक आर्टिकलच्या फक्त हेडलाईन्स जरी वाचत गेला तरी सर्व आर्टिकलच्या हेडलाईन्स वाचण्यासाठी तुम्हाला 400 वर्षे लागतील.

38) दिल्लीमध्ये दररोज 310 मेट्रो ट्रेन चालतात आणि त्या दिवसभरात 69000 किमी चालतात आणि हे इतकं जास्त आहे की जर पृथ्वीला दोन फेरे मारायला सांगितले तर फक्त 11150 किमीच अंतर कमी पडते.

39) ICELAND देशातील मुलीबरोबर लग्न केल्यानंतर आपल्याला तेथे सरकारी नोकरी आणि त्या देशाची नागरिकता फ्री मध्ये मिळते.

40) कांदा कापण्याच्या वेळेस, आनंदाच्या वेळेस आणि दुःखाच्या वेळेस आपल्या डोळ्यातून जे अश्रू येतात त्यांना जर आपण मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तर ते आपल्याला प्रत्येक वेळेस वेगळे दिसतात.

50 मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (50 Intresting facts in marathi)

41) एका संशोधनानुसार जगातील महिलांची 18 ट्रिलियन डॉलर कमाई होते आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, महिला एका वर्षा मध्ये 28 ट्रिलियन डॉलर इतका खर्च करतात.

42) एखादी नवीन बँक सुरू करण्यासाठी आपल्या जवळ कमीत कमी 500 करोड़ रुपये असावे लागतात.

43) हत्ती एक इमोशनल प्राणी आहे जो खूप जुन्या आठवणींना लक्ष्यात ठेवतो. जेव्हा त्याच्या जवळचं कोणी या जगातून निघून जात तेव्हा तो खाणे पिणे सोडून देऊन एकाच जागी बसतो. त्यामुळे तो डिप्रेशन मध्ये जातो आणि यामुळे त्याचा मृत्यु देखील होऊ शकतो.

44) गूगल बद्दल तर सर्वानाच माहीत आहे परंतु गूगल किती पैसे कमावतो हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य होईल. जेवढ्या वेळात आपण आपल्या डोळ्याची पापणी लावतो तेवढ्या वेळात गूगल 50 हजार रुपये कमावतो.

45) तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य होईल की सध्या भारतातील सर्व न्यायालयातील मिळून जवळजवळ 3.5 करोड केसेस पेंडींग आहेत.

46) तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की अमेरिकेतील 38% डॉक्टर आणि 12% वैजानिक भारतीय आहेत. NASA तील 36%, MICROSOFT चे 34%, IBM चे 28%, INTEL चे 17% आणि XEROX चे 13% कर्मचारी भारतीय आहेत.

47) नोकियाच्या मोबाईलमध्ये आपल्याला हे दोन हात पाहायला मिळतात. यातील एक हात मार्था स्टीवर्ट या महिलेचा आणि दुसरा हात जैकरी जॉन्सन या मुलाचा आहे.

48) भारत सरकारने सिगारेट सोडण्यासाठी एक हेल्पलाईन नंबर 1800112356 सुरू केला आहे. जेथे कॉल करून करून आपण सल्लागाराशी बोलू शकतो. ते आपल्याला सिगरेट सोडण्याचे उपाय सांगतात. हा हेल्पलाईन नंबर सकाळी आठपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत काम करतो.

49) जपानमध्ये लग्न झाल्यानंतर सुद्धा पती पत्नी एकत्र झोपत नाहीत. कारण तेथील तेथील लोक जितकं महत्व आपल्या कामाला देतात, तितकच महत्त्व आपल्या झोपेला देतात.पार्टनरच घोरण किंवा त्याच्या अजब सवयीमुळे त्यांना झोप कमी लागणे हे त्यांना आवडत नाही. याच QUALITY SLEEPING च्या कारणामुळे लग्न झाल्यानंतरसुद्धा जपानी लोक वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपतात.

50) नारायण मूर्ती यांनी आयआयटीची परीक्षा क्लिअर केली होती. परंतु आयआयटीला प्रवेश घेण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून स्वतःची कंपनी सुरू केली. आज आयआयटी त्यांच्यावर केस स्टडी बनवते.

सारांश (Summary)

तुम्हाला ही मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Intresting Facts in Marathi) पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *