आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे | IIT Full form in marathi

IIT Full form in marathi : जर तुला आयआयटी मध्ये ऍडमिशन मिळाले तर तुझी लाईफ सेट आहे असं तुम्ही अनेक वेळा ऐकल असेल. परंतु तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आयआयटी म्हणजे काय? आयआयटी ला इतके महत्त्व का आहे? आजच्या या पोस्टमध्ये आपण आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

IIT Full form in marathi
आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full form in marathi)

आयआयटी म्हणजे काय (IIT information in marathi)

आयआयटी ही एक अशी जागा आहे जिथे दहावी पास झाल्यानंतर विज्ञान शाखेत शिकत असलेले अकरावी आणि बारावी करत असणारे विद्यार्थी जाऊ इच्छित असतात. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे आपल्याकडे गुणवत्ता असली तरीही आपण आयआयटीमध्ये प्रवेश मिळू शकत नाही.

भारतात पहिल्यांदा 1951 साली पश्चिम बंगालमध्ये खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 

आयआयटी ही एक भारत सरकारद्वारे स्थापन केलेली आणि टेक्नॉलॉजी एज्युकेशन देणाऱ्या इन्स्टिट्यूटचा समूह आहे. जी विद्यार्थ्यांना सर्वात चांगल्या प्रकारचे शिक्षण प्रदान करते. आयआयटी चा फुल फॉर्म इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. ज्याला भारतीय तंत्रज्ञान संस्था असे म्हणतात.

आयआयटी फक्त भारतातीलच नाही तर जगातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांनपैकी एक आहे. या संस्थांमधून भारतातील अनेक उच्चस्तरीय वैज्ञानिक, रिसर्चर, टेक्नॉलॉजिस्ट आणि इंजिनिअर बाहेर पडतात. भारतातील पहिले आयआयटी संस्थान आयआयटी खडकपूर होते. ज्याला भारत सरकारने 1951 मध्ये स्थापन केले होते. आता भारतामध्ये एकूण 23 आयआयटी संस्था आहेत. या संस्था वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या भागांमध्ये स्थित आहेत. या संस्थांमध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात.

जेव्हा गोष्ट इंजीनियरिंग ची येते आयआयटी हे नाव सर्वात पहिल्यांदा येतं. कारण हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थान आहे. या संस्थांमधून लाखो कुशल आणि काबील इंजिनियर बाहेर पडतात. जे गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करतात. सर्व आयआयटी इन्स्टिट्यूट हे ऑटोनॉमस (Autonomous) संस्थान आहेत. म्हणजेच यांचे सर्व कोर्स, नियम आणि कायदे आयआयटी स्वतः बनवते.

आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full form in marathi)

आयआयटी चा फुल फॉर्म (IIT Full form in marathi) आहे Indian Institute Of Technology (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी). यालाच मराठीमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था असे म्हणतात. इंजिनिअरिंग साठी आयआयटी ला खूप महत्व दिले जाते.

आयआयटी चा अर्थ काय आहे (IIT meaning in Marathi)

आयआयटी चा अर्थ आहे (IIT meaning in Marathi) भारतीय तंत्रज्ञान संस्था. ज्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असे म्हणतात. आयआयटीलाच हिंदी मध्ये भारतीय प्रौद्योगिकी संस्थान असे म्हणतात. आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

आयआयटी चा इतिहास (History of IIT in Marathi)

1946 साली व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषेदेचे सदस्य सर जोगिंदर सिंग यांनी एक समिती नेमली. युद्धानंतरच्या काळात औद्योगिक विकासासाठी “उच्च तांत्रिक संस्था” स्थापन करण्याचा विचार हे त्या समितीचे काम होते. नलीनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली त्या 22 सदस्य असलेल्या समितीने अशा प्रकारच्या संस्था भारताच्या वेगवेगळ्या भागात स्थापन कराव्यात अशी शिफारस केली.

पहीली भारतीय तंत्रज्ञान संस्था ही खडगपूरमधल्या हिजली प्रतिबंध शिबिराच्या जागेवर मे 1950 मध्ये उघडण्यात आली. 1951 मध्ये या ठिकाणी पहील्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेची स्थापना झाली होती. 15 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय संसदेने भारतीय तंत्रज्ञान संस्था (खडगपूर) कायद्यानुसार राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित केली होती.

त्यानंतर मुंबई (1958), चेन्नई, कानपूर (1959), दिल्ली (1963) येथे आणि 1994 साली गुवाहाटी येथेही आयआयटी उघडण्यात आली. 2001 मध्ये रूडकी विद्यापीठाला आयआयटीचा दर्जा देण्यात आला. 2008-09 दरम्यान गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदोर, पाटणा, भुवनेश्वर, रोपड आणि मंडी याठिकाणी आठ नवीन आयआयटी उघडण्यात आल्या. तेव्हाच बनारस हिंदू विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा दर्जा देण्यात आला. 2015-16 मध्ये तिरुपती, पालक्काड, भिलाई, गोवा, जम्मू आणि धारवाड येथे सहा नवीन आयआयटींची स्थापना करण्यात आली, तसेच आयएसएम धनबादलाही हा दर्जा देण्यात आला.

आयआयटी ला प्रवेश कसा घ्यावा?

विद्यार्थ्यांना आयआयटी  कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पहिल्यांदा  JEE Main ही परीक्षा पास करावी लागते. त्यानंतर JEE main पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी टॉप चे 2.5 लाख विद्यार्थी आयआयटी ला प्रवेश मिळवण्यासाठी JEE Advanced परीक्षा देतात. यामध्ये पास होणाऱ्या टॉप एक लाख विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळतो.

आयआयटी कॉलेज मध्ये वेगवेगळे कोर्स असतात. ज्यांना आपण ब्रांचेस (Branches) म्हणतो. जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इत्यादी. जे विद्यार्थी उच्च रँक प्राप्त करतात त्यांना बीटेक साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यासारखी उच्च ब्रांच मिळते. परंतु कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेकॅनिकल, सिव्हिल यासारख्या ब्रांचेस मिळतात.

भारतीय तंत्रज्ञान संस्थांची नावे (IIT names in Marathi)

  1. भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर (IITKGP)
  2. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IITB)
  3. भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर (IITK)
  4. भारतीय तंत्रज्ञान संस्था चेन्नई (IITM)
  5. भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली (IITD)
  6. भारतीय तंत्रज्ञान संस्था गुवाहाटी (IITG)
  7. भारतीय तंत्रज्ञान संस्था रुडकी (IITR)
  8. भारतीय तंत्रज्ञान संस्था रोपड (IITRPR)
  9. भारतीय तंत्रज्ञान संस्था भुवनेश्वर (IITBBS)
  10. भारतीय तंत्रज्ञान संस्था गांधीनगर (IITGN)
  11. भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद (IITH)
  12. भारतीय तंत्रज्ञान संस्था जोधपूर (IITJ)
  13. भारतीय तंत्रज्ञान संस्था पाटणा (IITP)
  14. भारतीय तंत्रज्ञान संस्था इंदोर (IITI)
  15. भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी (IITMandi)
  16. भारतीय तंत्रज्ञान संस्था वाराणसी (IIT(BHU))
  17. भारतीय तंत्रज्ञान संस्था पालक्कड (IITPKD)
  18. भारतीय तंत्रज्ञान संस्था तिरुपती (IITTP)
  19. भारतीय तंत्रज्ञान संस्था धनबाद (IIT(ISM))
  20. भारतीय तंत्रज्ञान संस्था भिलाई (IITBh)
  21. भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा (IITGoa)
  22. भारतीय तंत्रज्ञान संस्था जम्मू (IITJM)
  23. भारतीय तंत्रज्ञान संस्था धारवाड (IITDH)

आयआयटी इन्स्टिट्यूट ची फी किती असते?

आयआयटी मध्ये जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना सर्वात पहिल्यांदा हा प्रश्न पडतो की आयआयटी मध्ये फी किती असते? प्रत्येक आयआयटी संस्था द्वारे त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वर त्यांचे फी स्ट्रक्चर शेअर केलेले असते.

जर सामान्यता पाहिले तर बी टेक साठी आयआयटी ची फी ही जवळजवळ दरवर्षी 2 ते 2.5 लाख असते. जी चार वर्षांमध्ये आठ ते दहा लाख होते. आरक्षित जातींमधील विद्यार्थ्यांसाठी ही फी कमी असते. अशा विद्यार्थ्यांची चार वर्षाची फी ही दोन ते चार लाख असते.

आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्याचे फायदे?

  • ही देशातील सर्वात मोठी संस्था आहे ज्यामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळते. म्हणजेच इंजिनियरिंग किंवा इतर कोणत्याही कोर्ससाठी.
  • या संस्थांमध्ये सर्वात चांगले शिक्षक शिकवत असतात. जे त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले असतात.
  • आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप हुशार मानले जाते.
  • आयआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्शिअल हेल्प म्हणून काही स्कॉलरशिप सुद्धा दिली जाते.
  • येथे आपल्याला Internship साठी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा जाता येते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

भारतात किती आयआयटी कॉलेज आहेत?

भारतात 23 (तेवीस) आयआयटी कॉलेज आहेत.

भारतातील पहिले आयआयटी कॉलेज कोणते?

भारतातील पहिले आयआयटी कॉलेज भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर (IITKGP)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आयआयटी चा फुल फॉर्म काय आहे (IIT Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. आयआयटी म्हणजे काय (IIT information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *