डीएनए चा फुल फॉर्म काय आहे | DNA full form in marathi

DNA full form in marathi : मित्रानो जेव्हा आपल्या घरात एखाद्या लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा आपल्या घरातील लोक म्हणतात की याचे डोळे त्याच्या वडिलांसारखे झाले आहेत. किंवा त्याचे नाक त्याच्या आईसारखी झाले आहे. आपल्या सवयी बद्दल सुद्धा ते कधीकधी असेच बोलतात. आणि हे सर्व डीएनए मुळे होते. आजच्या या पोस्टमध्ये आपण डीएनए म्हणजे काय (DNA information in marathi), डीएनए चा फुल फॉर्म (DNA full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

DNA full form in marathi
डीएनए चा फुल फॉर्म काय आहे (DNA full form in marathi)

डीएनए म्हणजे काय (DNA information in marathi)

डीएनए शरीराची जनुकीय आणि अनुवंशिक माहिती साठवून ठेवण्याचे काम करतो. हे आपण सोप्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ. आपली निर्मिती ही आपल्या आई-वडिलांपासून झाली आहे. आपले आई वडील आपल्याला जन्म देतात. म्हणजेच त्यांचे जनुकीय गुण जसे की नाक, कान, उंची, डोळे, केस, रंग  हे आपल्याला आपल्या आई-वडिलांपासून मिळते. आणि ही सर्व माहिती साठवण्याचे काम डीएनए करत असतो. आणि यालाच डीएनए असे म्हणतात.

डीएनए चा फुल फॉर्म काय आहे (DNA full form in marathi)

डीएनए चा लॉंग फॉर्म आहे Deoxyribo Nucleic Acid. यालाच मराठी मध्ये डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक आम्ल असे म्हणतात. डीएनए कधीच मरत नाही म्हणजेच तो अमर आहे. म्हणजेच तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवला जातो.

डीएनए चा अर्थ काय आहे (DNA meaning in Marathi)

डीएनए चा अर्थ आहे डी ऑक्सीराइबो न्यूक्लिक आम्ल. डीएनएचा आकार एखाद्या सीडी प्रमाणे असतो. आणि हा प्रत्येक जीवामध्ये आढळतो. आणि डीएनए मध्ये अनुवंशिक गुण साठवले जातात. डीएनएचा आकार एखाद्या सीडी प्रमाणे असतो. आणि हा प्रत्येक जीवामध्ये आढळतो. आणि डीएनए मध्ये अनुवंशिक गुण साठवले जातात.

डीएनए टेस्ट का केली जाते?

डीएनए टेस्ट का केली जाते?

  • डीएनए टेस्ट चा वापर फॉरेन्सिक लॅब मध्ये गुन्हेगारांची ओळख पटवून देण्यासाठी केला जातो. म्हणजेच गुन्ह्याच्या घटनास्थळी सापडलेले रक्त असेल, केस असतील किंवा शरीराचा काही भाग असेल याचा शोध घेण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाते.
  • नवीन जन्मलेल्या बाळाची ओळख पटवण्यासाठी सुद्धा या टेस्ट चा वापर केला जातो. हे तुम्हाला थोडेसे वेगळे वाटेल. परंतु अनेक वेळेला अनेक पालक मुलाला जन्म देऊन सुद्धा आपण याचे पालक नसल्याचे सांगत असतात. या परिस्थितीमध्ये सुद्धा डीएनए टेस्ट केली जाते.
  • अज्ञात ठिकाणी सापडलेल्या मृत शरीराची माहिती मिळविण्यासाठी सुद्धा डीएनए टेस्ट केली जाते.
  • अनुवंशिक रोग, विकार, विकृती यांची माहिती नवजात बालकाच्या जन्माआधी डीएनए चाचणीने मिळावता येते. व त्यावर वेळीच योग्य उपचार करता येतात.
  • डीएनए चाचणीचा वापर करून बी-बियाणे, तसेच विक्रीसाठी ठेवले मांस, मशरूमसारखे पदार्थ यांचा दर्जा तपासता येतो.
  • डीएनए चाचणीवरून स्थलांतरित व्यक्तीचे, प्राण्याचे वा वनस्पतीचे मूळ स्थान ओळखता येते.

डीएनए टेस्ट करण्याची पद्धत काय आहे (DNA test information in marathi)

मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीची डीएनए टेस्ट करायची म्हटली तर त्याच्या शरीरामधील पेशी च्या उती चे नमुने घ्यावे लागतात. केस, त्वचा, रक्त, वीर्य किंवा इतर ज्या पेशी असतील यांचे नमुने घेऊनच ही टेस्ट केली जाते. ही टेस्ट करताना जैवतंत्रज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आणि ही टेस्ट शंभर टक्के यशस्वी झाली आहे.

डीएनए चा कायदा

डीएनए टेस्ट साठी कायद्याची सुद्धा मान्यता आहे. यालाच डीएनए तंत्रज्ञान विधेयक 2019 म्हणतात. सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक पद्धतीचे गुन्हे सोडवण्यासाठी याचा चांगल्या प्रमाणात उपयोग होतो. एखाद्या व्यक्तीची डीएनए चाचणी करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे मात्र अत्यावश्यक आहे. भारतात हैदराबाद, बंगलोर इत्यादी ठिकाणी अत्याधुनिक डीएनए चाचणी केंद्रे आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

डीएनए चा शोध कोणी लावला?

1953 मध्ये डीएनए च शोध जेम्स वॉटसन (James Watson) आणि फ्रांसिस क्रिक (Francis Crick) यांनी लावला होता. या शोधासाठी त्यांना 1962 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा देण्यात आले आहे.

डीएनए चा आकार किती असतो?

32BP म्हणजेच अत्यंत सूक्ष्म

डी एन ए म्हणजे काय?

डीएनए शरीराची जनुकीय आणि अनुवंशिक माहिती साठवून ठेवण्याचे काम करतो. हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेया केंद्रबिंदूमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल आहे.

डी एन ए मध्ये किती घटक असतात?

चार. एडेनिन, ग्वानिन, थाइमिन आणि साइटोसिन

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण डीएनए म्हणजे काय (DNA information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. डीएनए चा फुल फॉर्म काय आहे (DNA full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “डीएनए चा फुल फॉर्म काय आहे | DNA full form in marathi

  1. डि एन ए संबंधी खुप छान माहिती दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *