एमएलए चा फुल फॉर्म काय आहे | MLA full form in Marathi

MLA full form in Marathi : मित्रांनो आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. येथे प्रशासन चालवण्यासाठी तीन कार्यकारी प्रणाली मध्ये विभाजन केल गेलं आहे. पहिल्या स्तरावर केंद्र सरकार आहे, जे संपूर्ण भारताच्या पातळीवर काम करते. दुसऱ्या स्तरावर राज्य सरकार आहे, जे राज्याच्या पातळीवर काम करते. तिसऱ्या पातळीवर पंचायत आणि नगरपालिका येतात, ज्या स्थानिक पातळीवर काम करतात. दुसऱ्या स्तरावर राज्य सरकारची स्थापना विधानसभेद्वारे केली जाते. आजच्या या पोस्टमध्ये आपण एमएलए चा फुल फॉर्म काय आहे (MLA full form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

MLA full form in Marathi
एमएलए चा फुल फॉर्म काय आहे (MLA full form in Marathi)

एमएलए चा फुल फॉर्म काय आहे (MLA full form in Marathi)

एमएलए चा फुल फॉर्म (MLA full form in Marathi) Member of Legislative Assembly असा आहे. यालाच विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार म्हणतात. विधानसभा सदस्यांची निवड एका विशिष्ट मतदार संघांमधून केली जाते. विधानसभेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची पैकी एका उमेदवाराला मुख्यमंत्री बनवले जाते.

एमएलए चा अर्थ (MLA Meaning in Marathi)

एमएलए चा अर्थ (MLA Meaning in Marathi) विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार असा होतो. भारताच्या प्रत्येक राज्यात दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या वेळी विधानसभा निवडणुका होतात. प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळ्या मतदार संघामध्ये विभागले गेले आहे.

मतदारसंघातून एक उमेदवार निवडून जातो. मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या निश्चित नसते, परंतु यातील केवळ एकच व्यक्ती निवडणूक जिंकू शकतो. एका मतदारसंघामध्ये आमदार साठी पात्र असलेल्या अनेक लोकांना निवडणूक लढवता येते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध जोडला जावा अशी काही अट नसते. कोणताही पक्ष नसलेली व्यक्तीही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते. त्या मतदारसंघामध्ये जी व्यक्ती निवडून येते त्या व्यक्तीला आमदार असे म्हणतात.

आमदार होण्यासाठी पात्रता (MLA Eligibility in Marathi)

 • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
 • विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 25 वर्ष असावे.
 • उमेदवार त्या राज्यातील कोणत्याही मतदारसंघाचा मतदार असणे आवश्यक आहे.
 • उमेदवार हा मानसिकदृष्ट्या निरोगी असायला हवा.

आमदाराची कामे (MLA work in Marathi)

 • लोकांच्या तक्रारी आणि आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व आमदार करतात.
 • आमदारांकडून जनतेची इच्छा राज्य सरकारला कळविली जाते.
 • एका आमदाराचा त्याच्या भागातील लोकांशी थेट संबंध असतो.
 • आमदार सरकारने पुरवलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेतात. आणि आपल्या प्रदेशातील लोकांना सरासरी योजनांचा जास्तीत जास्त लाभ करुन देण्याचा प्रयत्न केला जातो. 
 • आमदार विधानसभेत आपल्या क्षेत्राचे मुद्दे उपस्थित करतात, याकडे सरकारचे लक्ष वेधतात.
 • आमदार हा त्याच्या प्रदेशातील जनतेचा प्रतिनिधी असतो.
 • आमदार आपला मतदारसंघ विकसित करण्यासाठी सरकारकडून आलेल्या निधीचा योग्य वापर करतो. कारण त्याचे क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. 

आमदाराचा कालावधी

विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी पाच वर्षाचा असतो. विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची आहे परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.

आमदाराला मिळणाऱ्या सुविधा

प्रत्येक राज्यात सरकारकडून आमदाराला वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. तेलंगणा राज्यात आमदाराला दर महिन्याला सुमारे अडीच लाख रुपये पगार दिला जातो. उत्तर प्रदेश राज्यात हा पगार दोन लाख रुपये आहे. त्रिपुरा मध्ये आमदाराला सर्वात कमी म्हणजेच 30000 रूपये पगार दिला जातो. याशिवाय त्यांना वैद्यकीय सुविधा, डिझेल सुविधा, सरकारी निवास सुविधा, सरकारी रेल्वे सुविधा इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आमदाराला दर महिन्याला तीस हजार रुपये पेन्शन दिली जाते. याशिवाय त्यांना आयुष्यभर विनामूल्य रेल्वेद्वारे प्रवास आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.

विधानसभाआमदाराचा पगार
1. तेलंगणा2.5 लाख रू.
2. दिल्ली2.10 लाख रू.
3. उत्तर प्रदेश1.87 लाख रू.
4. महाराष्ट्र1.70 लाख रू.
5. जम्मू आणि काश्मीर1.60 लाख रू.
6. उत्तराखंड1.60 लाख रू.
7. आंध्र प्रदेश1.30 लाख रू.
8. हिमाचल प्रदेश1.25 लाख रू.
9. राजस्थान1.25 लाख रू.
10. गोवा1.17 लाख रू.
11. हरियाणा1.15 लाख रू.
12. पंजाब1.14 लाख रू.
13. झारखंड1.11 लाख रू.
14. मध्य प्रदेश1.10 लाख रू.
15. छत्तीसगड1.10 लाख रू.
16. बिहार1.14 लाख रू.
17. पश्चिम बंगाल1.13 लाख रू.
18. तमिळ नायडू1.05 लाख रू.
19. कर्नाटक98 हजार रु.
20. सिक्किम86.5 हजार रु.
21. केरळ70 हजार रु.
22. गुजरात65 हजार रु.
23. ओडिसा62 हजार रु.
24. मेघालय59 हजार रु.
25. पद्दुचेरी50 हजार रु.
26. अरुणाचल प्रदेश49 हजार रु.
27. मिझोरम47 हजार रु.
28. आसाम42 हजार रु.
29. मनिपुर37 हजार रु.
30. नागालँड36 हजार रु.
31. त्रिपुरा34 हजार रु.
आमदारांचा पगार

आमदार कसे बनावे (How to become a mla in Marathi)

आमदार होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये सहभागी व्हावे लागेल. यासाठी एखाद्या राजकीय पक्ष असेल तर ते थोडे सोपे जाईल. तसं पाहिलं तर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणे आवश्यक नाही. आपण अपक्ष ही निवडणूक लढवू शकतो. निवडणुका लढवण्यासाठी आपली लोकांमध्ये चांगली पकड असणे गरजेचे आहे. जर जनतेमध्ये आपली चांगली पकड असेल तर आपण नक्कीच विजयी होऊ शकतो अन्यथा आपल्याला प्रतिस्पर्धा कडून पराभवाचा सामना करावा लागेल. जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आधीच विकास केला असेल तर लोक आपोआपच आपल्याला निवडून देतील.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एमएलए चा फुल फॉर्म काय आहे (MLA full form in Marathi)

उत्तर : Member of Legislative Assembly यालाच मराठीत आमदार म्हणतात.

आमदार चा अर्थ काय आहे (Aamdar meaning in Marathi)

उत्तर : विधानसभा सदस्य. विधानसभा सदस्यांची निवड एका विशिष्ट मतदार संघांमधून केली जाते.

आमदार म्हणजे काय?

उत्तर : आमदार हा एक विधासभा सदस्य असतो, ज्याला एखाद्या विशिष्ठ तालुक्यामधून निवडून दिले जाते.

आमदाराला किती पगार असतो?

उत्तर : महाराष्ट्रामध्ये आमदाराला साधारणपणे 1.70 लाख रुपये पगार असतो.

आमदाराचा कालावधी किती वर्षाचा असतो?

उत्तर : आमदाराचा कालावधी साधारणपणे 5 वर्षाचा असतो.

Mp meaning in Marathi

MP म्हणजेच Member of Parliament यालाच मराठीमध्ये खासदार म्हणतात.

MP full form in marathi

MP चा फुल फॉर्म आहे Member of Parliament यालाच मराठीमध्ये खासदार म्हणतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एमएलए चा फुल फॉर्म काय आहे (MLA full form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

2 thoughts on “एमएलए चा फुल फॉर्म काय आहे | MLA full form in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *