सीआरपीएफ चा फुल फॉर्म | CRPF Full Form in Marathi

CRPF Full Form in Marathi : मित्रांनो वर्तमानपत्रांमध्ये किंवा चित्रपटामध्ये तुम्ही CRPF हे नाव नक्कीच ऐकलं असेल. आणि अनेक लोकांचे स्वप्नही एक सीआरपीएफ ऑफिसर होण्याचे असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीआरपीएफ फुल फॉर्म (CRPF Full Form in Marathi) जाणून घेणार आहोत.

CRPF Full Form in Marathi
सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full Form in Marathi)

सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full Form in Marathi)

सीआरपीएफ चा फुल फॉर्म आहे सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force). यालाच मराठीत केंद्रीय राखीव पोलीस दल असे म्हणतात. या फोर्स ला प्यारा मिलीटरी फॉर्स (Paramilitary Force) असे सुद्धा म्हणतात.

सीआरपीएफ चा अर्थ (CRPF meaning in Marathi)

हे एक भारतातील सर्वात मोठे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. सीआरपीएफ भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली काम करते. सीआरपीएफ चा मुख्य उद्देश हा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे हा असतो. सीआरपीएफ मध्ये सामील होता यावं यासाठी युवक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारने सीआरपीआर अकॅडमी (CRPR Academy) ची स्थापना केली आहे.

 • तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल : Pfms full form in hindi

सीआरपीएफ चे मुख्यालय

भारतातील सीआरपीएफ च मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

सीआरपीएफ चा इतिहास (History of CRPF in Marathi)

 • 27 जुलै 1939 मध्ये भारतातील संवेदनशील राज्यांमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश लोकांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ ची स्थापना करण्यात आली आली होती.
 • सीआरपीएफ चे नाव Crown Representatives Police याच्या नावावरून घेण्यात आले आहे.
 • 1949 मध्ये सीआरपीएफच्या अधिनियमानुसार सीआरपी चे नाव बदलून सीआरपीएफ असं करण्यात आलं होतं.
 • 21 ऑक्टोबर 1959 मध्ये सीआरपीएफच्या एका छोट्या दलाने चिनी सैनिकांवर हल्ला केला होता. यामध्ये 20 सीआरपीएफ जवानामधील 10 सीआरपीएफ जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी 21 ऑक्टोंबर हा दिवस पोलिस स्मरणोत्सव दिवस (Police Commemoration Day) म्हणून  साजरा केला जातो.
 • 1960 च्या दशकामध्ये अधिकांश राज्य पोलीस बटालियनला सीआरपीएफ मध्ये विलीन केलं होतं.
 • 1965 पर्यंत सीआरपीएफ जवान भारत आणि पाकिस्तान सीमेवर पहारा देत होते. त्यानंतर बीएसएफ ला सीमा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.
 • 1980 च्या दशकामध्ये पंजाब मधील आतंकवाद रोखण्यासाठी आणि 1990 च्या दशकामध्ये त्रिपुरा मधील उग्रवाद रोखण्यासाठी सीआरपीएफ ने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
 • 2008 मध्ये COBRA (Commando Battalion for Resolute Action), नक्षलवादी ऑपरेशनचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफची एक विशेष तुकडी स्थापन करण्यात आली होती.

सीआरपीएफ साठी योग्यता (How to become CRPF officer in Marathi)

सीआरपीएफ विषयी माहिती तर आता आपण जाणून घेतली. परंतु आता प्रश्न येतो सीआरपीएफ मध्ये सामील कसे व्हावे. तर मित्रांनो आता आपण सीआरपीएफ मध्ये सामील कसे व्हावे याविषयी माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो जर तुम्ही सीआरपीएफ मध्ये आपलं करियर बनवू इच्छित असाल तर आपले वय कमीत कमी 20, वर्षं आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असायला हवे. आणि आपण दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे. एसी आणि एसटी वर्गासाठी 5 वर्षाची आणि ओबीसी वर्गासाठी 3 वर्षाची सूट सुद्धा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी 5 वर्षाची सूट सुद्धा देण्यात आली आहे.

सीआरपीएफ साठी शारीरिक पात्रता :

 • पुरुष उंची : 153 सेमी
 • महिला उंची : 140.5 सेमी
 • पुरुष छाती : 74.5 सेमी ( फुगवून 5 सेमी जास्त)

सीआरपीएफ जवानांची कामे :

 • गर्दी आणि दंगा यावर नियंत्रण ठेवणे.
 • उग्रवादाचा मुकाबला करणे.
 • नक्षलवादी ऑपरेशनचा मुकाबला करणे.
 • व्हीआयपी लोकांची आणि महत्वपूर्ण प्रतिष्ठानची सुरक्षा करणे.
 • युद्धाच्या काळात सशस्त्र दलांना मदत करणे.
 • संवेदनशील क्षेत्रांमध्ये निवडणुकीच्या वेळी सुरक्षा ठेवणे.
 • नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे.

सीआरपीएफ चा पगार :

सीआरपीएफ उमेदवारांची निवड वेगवेगळ्या पदांसाठी केली जाते. त्यामुळे पदानुसार त्यांचा पगार वेगवेगळा असतो. सीआरपीएफ अधिकाऱ्याचा पगार हा 21,700 – 61,100 पर्यंत असतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full Form in Marathi) काय आहे?

Central Reserve Police Force. यालाच मराठीत केंद्रीय राखीव पोलीस दल असे म्हणतात.

2) सीआरपीएफ चा अर्थ (CRPF meaning in Marathi) काय आहे?

केंद्रीय राखीव पोलीस दल.

3) CRPF ची स्थापना कधी करण्यात आली?

27 जुलै 1939

4) सीआरपीएफ ची वेबसाईट कोणती आहे (CRPF website)

सीआरपीएफ चे मुख्यालय कोठे आहे?

भारतातील सीआरपीएफ च मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सीआरपीएफ फुल फॉर्म (CRPF Full Form in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *