प्रोसेसर विषयी माहिती | Processor information in marathi

Processor information in marathi : मित्रांनो जर तुम्ही कॉम्प्युटर, मोबाईलचा वापर करत असाल तर प्रोसेसर हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का कि प्रोसेसर काय आहे, प्रोसेसर काय काम करतो, याचा उपयोग काय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रोसेसर म्हणजे काय (Processor information in marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.

Processor information in marathi
प्रोसेसर विषयी माहिती (Processor information in Marathi)

प्रोसेसर विषयी माहिती (Processor information in Marathi)

मित्रांनो मोबाईल किंवा कॉम्प्युटर याच्या ताकदीचा अंदाज लावायचा झाला तर आपण पहिल्यांदा त्याच्या प्रोसेसर कडे पाहतो. त्यामध्ये कोणता प्रोसेसर आहे हे आपण पाहतो. मित्रांनो जर तुम्ही टेक्नॉलॉजी बद्दल माहिती जाणून घेत असाल तर तुम्हाला प्रोसेसर बद्दल नक्कीच माहिती असेल. आणि जेव्हा तुम्ही नवीन मोबाईल किंवा कॉम्प्युटर घेता तेव्हा तुम्ही प्रोसेसर बद्दल माहिती नक्कीच वाचत असाल.

प्रोसेसर म्हणजे काय (What is Processor in Marathi)

प्रोसेसर ही एक प्रकारची चीप आहे जी मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर, लॅपटॉप मध्ये लावलेली असते. ही चीप कॉम्प्युटर मध्ये मदरबोर्ड च्या रूपामध्ये लावलेली असते. प्रोसेसरला Main Processor किंवा सीपीयु म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट या नावाने सुद्धा ओळखले जाते. प्रोसेसर हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये होणाऱ्या क्रियांना समजतो.

उदाहरणासाठी तुम्ही या प्रकारे समजून घेऊ शकता. समजा एक व्यक्ती तुमच्याशी बोलू इच्छिते, परंतु त्या व्यक्तीला फक्त इंग्लिश भाषा येते. आणि तुम्हाला फक्त मराठी भाषा येते. या स्थितीमध्ये तुम्हाला त्याच्याशी बोलणे कठीण जाते. परंतु जर तुम्हाला ही इंग्लिश भाषा येत असली तर तुम्ही त्याच्याशी सहजपणे बोलू शकला असता. या स्थितीमध्ये इंग्रजी भाषा एक दुसऱ्याला समजण्याच एक माध्यम आहे.

या प्रमाणेच कॉम्प्युटर आणि आपल्यामध्ये प्रोसेसर हे एक माध्यम आहे. प्रोसेसर आपल्याकडून दिल्या जाणाऱ्या कमांडला कॉम्प्युटर पर्यंत पोहोचवतो आणि त्यानंतर कॉम्प्युटर ते टास्क पूर्ण करतो.

प्रोसेसर आपल्या कॉम्प्युटर मध्ये सर्व इनपुट, आउटपुट ऑपरेशन पूर्ण करतो. मित्रांनो या प्रक्रियेला आपण विस्तारित रूपात पाहिलं तर आपल्याला समजते की आपण कॉम्प्युटरला जी सूचना देतो त्याला इनपुट म्हणतात आणि आपण दिलेली सूचना कॉम्प्युटर प्रोसेस करतो त्याला प्रोसेसिंग म्हणतात आणि त्यानंतर कॉम्प्युटर जे परिणाम दाखवतो त्याला आउटपुट म्हणतात.

शेवती ईतकच सांगेन की जितका शक्तिशाली आपला प्रोसेसर असेल तीतका चांगला परफॉर्मन्स आपला कॉम्प्युटर देईल. त्यामुळे प्रत्येक वेळेस एक चांगल्या ब्रॅण्ड चा प्रोसेसर आपण वापरावा हा सल्ला दिला जातो.

प्रोसेसर चा इतिहास (History of Processor in Marathi)

Intel ने 1971 मध्ये जगातील सर्वात पहिला सिंगल चीप मायक्रोप्रोसेसर डिझाईन केला होता. याला इंटेलचा तीन इंजिनिअर्सनी मिळून बनवले होते. Federico Faggin, Ted Hoff आणि Stan Mazo हे ते तीन इंजिनीयर होते ज्यांनी सर्वात पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला. या चीपच नाव होतं Intel 4004

मायक्रोप्रोसेसर ला अशा प्रकारे डिझाइन केले गेले होते की एकाच चीप मध्ये सर्व प्रोसेसिंग फंक्शन जसे की सीपीयू, मेमरी, इनपुट आणि आऊटपुट कंट्रोल ठेवले गेले होते. हळू हळू वेळेबरोबर नवनवीन शोध लागत गेले आणि त्यामुळे कॉम्प्यूटरच्या डिझाईन मध्ये सुद्धा खूप बदल झाला. प्रोसेसर ची कार्य करण्याची क्षमता वाढत गेली आणि आकार कमी होत गेला. आजच्या काळात इंटेल प्रोसेसरच्या जगातील बादशहा आहे. तो आपल्या गरजे प्रमाणे वेगळ्या प्रकारचे प्रोसेसर बनवतो.

प्रोसेसर मध्ये Clock Speed काय आहे ?

या क्लॉक स्पीडला क्लॉक रेट  किंवा प्रोसेसरची स्पीड असे सुद्धा म्हंटले जाते. Clock Speed त्या स्पीड ला म्हटले जाते जा स्पीडने मायक्रोप्रोसेसर प्रत्येक Instructio ला Execute करतो. CPU ला एका Fixed number of Clock ticks किंवा cycle ची गरज असते प्रत्येक Instructio ला Execute करण्यासाठी. यामुळे जितकी आपल्या Clock Rate ची स्पीड जास्त असेल तितकी जास्त स्पीड CPU ची सुद्धा असेल, म्हणजेच तितक्या वेगाने आपला प्रोसेसर Instruction ला Execute करेल.

Clock Speed ला MHz मध्ये मोजले जाते. 1 MHz म्हणजे 1 million cycles per second किंवा GHz, 1GHz म्हणजे 1 thousand million cycles per second. साधारणपणे जितकी जास्त आपल्या सीपीयू ची स्पीड असेल तितकाच चांगला परफॉर्मन्स आपला कॉम्प्युटर देईल. तसं पाहिलं तर कॉम्प्युटर मधील इतर पार्टस वर देखील कॉम्प्युटर ची स्पीड अवलंबून असते जसं की RAM, Hard drive, Motherboard आणि Number of processor core.

सीपीयू च्या स्पीड वरून आपल्याला कळते की तो किती कॅल्क्युलेशन एका सेकंदामध्ये करतो. जितकी जास्त आपल्या सीपीयू ची स्पीड असेल तितके जास्त कॅल्क्युलेशन तो परफॉर्म करेल. ज्यामुळे आपला कॉम्प्युटर अधिक वेगाने रन होईल. बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ब्रँडचे कॉम्प्युटर प्रोसेसर पाहायला मिळतील. जसे की Intel आणि AMD. परंतु ते सर्व समान CPU Speed Standard च पालन करतात त्यामुळे आपल्याला समजू शकते की कोणता प्रोसेसर किती स्पीड मध्ये रन होतो.

प्रोसेसर मध्ये कोअर काय आहे (What is core in Processor information in Marathi)

प्रोसेसरमध्ये त्याच्या क्षमतेनुसार वेगवेगळे कोअर असतात. एका सामान्य प्रोसेसरमध्ये सिंगल कोअर असतो, म्हणजेच तो एक सिंगल CPU असतो. तसेच Dual Core Processor मध्ये दोन समान फ्रिक्वेन्सी असणारे प्रोसेसर सर्किट मध्ये असतात. हा सिंगल कोअर प्रोसेसर च्या तुलनेमध्ये डबल स्पीडने काम करू शकतो तेही अगदी सहजपणे.

सध्या बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या कोअर चे प्रोसेसर उपलब्ध आहेत. जसे की :

 • Dual Core मध्ये 2 Core
 • Quad Core मध्ये 4 Core
 • Hexo Core मध्ये 6 Core
 • Octa Core मध्ये 8 Core
 • Deca Core मध्ये 10 Core
DesktopCore i3Core i4Core i5
No. Of cores244
Frequency Range3.4 – 4.2GHz2.4 – 3.8GHz2.9 – 4.2GHz

ज्या प्रोसेसर मध्ये सर्वात जास्त कोअर असतात तो तितक्याच वेगाने मल्टिटास्किंग पूर्ण करू शकतो.

प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्या

तसं पाहायला गेलं तर खूप साऱ्या कंपन्या प्रोसेसर बनवतात. परंतु त्यातील काही प्रमुख कंपन्या आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे:

 • Intel
 • AMD
 • Qualcomm
 • NVIDIA
 • IBM
 • SAMSUNG
 • MOTOROLA
 • HEWLETT PACKARD (HP)

मायक्रोप्रोसेसर चे उपयोग (Applications of Microprocessor in Marathi)

 • कॅल्क्युलेटर
 • अकाउंटिंग सिस्टीम
 • गेम्स मशीन
 • कॉम्प्लेक्स इंडस्ट्रिअल कंट्रोलर
 • ट्रॅफिक लाईट
 • मिलिटरी ॲप्लिकेशन
 • डिफेन्स सिस्टीम

आता आपण प्रोसेसर विषयी माहिती (Processor information in marathi) जाणून घेतली.

तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता:

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रोसेसर विषयी माहिती (Processor information in marathi) जाणून घेतली. प्रोसेसर म्हणजे काय (What is Processor in Marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

One thought on “प्रोसेसर विषयी माहिती | Processor information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *