Andra Pradesh information in marathi : आंध्र प्रदेश भारतातील दक्षिण पूर्व किनाऱ्यावर स्थित राज्य आहे. क्षेत्रफळानुसार हे भारतातील चौथे सर्वात मोठे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आठवे सर्वात मोठे राज्य आहे. आंध्र प्रदेश राज्याची राजधानी शहर अमरावती आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वात लांब समुद्रकिनारा गुजरात मध्ये असताना, दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश राज्याचा समुद्रकिनारा आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आंध्र प्रदेश विषयी माहिती (Andra Pradesh information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 आंध्र प्रदेश विषयी माहिती (Andra Pradesh information in marathi)
- 2 आंध्र प्रदेश माहिती मराठी (Andra Pradesh mahiti marathi)
- 3 आंध्र प्रदेश विषयी काही रोचक तथ्य (Facts about Andra Pradesh in marathi)
- 4 आंध्रप्रदेश मधील जिल्हे (Districts of Andra Pradesh in Marathi)
- 5 आंध्र प्रदेशातील पर्यटन स्थळे (Tourist places of Andra Pradesh in Marathi)
- 6 आंध्र प्रदेश मधील शेती
- 7 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 8 सारांश (Summary)
आंध्र प्रदेश विषयी माहिती (Andra Pradesh information in marathi)
राज्य | आंध्र प्रदेश |
राजधानी | अमरावती |
स्थापना | 01 ऑक्टोबर 1953 |
अधिकृत भाषा | तेलुगू |
जिल्हे | 13 |
लोकसंख्या | 4,96,65,533 (2011) |
क्षेत्रफळ | 1,60,205 चौ. किमी |
1) आंध्र प्रदेश राज्याची स्थापना 1 ऑक्टोबर 1953 ला झाली होती.
2) अमरावती शहर हे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे.
3) आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ एक लाख 60 हजार 205 चौकीमी आहे.
4) आंध्र प्रदेश राज्याची लोकसंख्या 2011 नुसार 4 कोटी 96 लाख 65 हजार 533 आहे.
5) आंध्रप्रदेश राज्याचा साक्षरता दर 67.4 टक्के आहे.
6) आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एकूण तेरा जिल्हे आहेत.
7) आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये 175 विधानसभा मतदारसंघ आहेत.
8) आंध्रप्रदेश राज्य मध्ये 25 लोकसभा मतदारसंघ आहेत.
9) आंध्रप्रदेश राज्यांमध्ये 11 राज्यसभा मतदार संघ आहेत.
10) टंगटूरी प्रकाशम हे आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
आंध्र प्रदेश माहिती मराठी (Andra Pradesh mahiti marathi)
11) चंदूलाला माधवलाल त्रिवेदी हे आंध्र प्रदेश मधील पहिले राज्यपाल आहेत.
12) आंध्रप्रदेश राज्य क्षेत्रफळानुसार भारतातील आठवे सर्वात मोठे राज्य आहे.
13) आंध्र प्रदेश राज्यांमध्ये एक हजार पुरुषांमागे 993 महिलांचे प्रमाण आहे.
14) आंध्रप्रदेश राज्यातील 88 टक्के लोकसंख्या तेलगू भाषा बोलते. तेलगू भारतातील सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे.
15) आंध्र प्रदेश राज्याचे मुख्य जातीय समूह तेलुगु लोक आहेत.
16) आंध्र प्रदेश राज्याचे राज्य फळ आंबा आहे.
17) आंध्र प्रदेश राज्याचा राष्ट्रीय वृक्ष निम आहे.
18) आंध्र प्रदेश राज्याचे राज्य फूल वॉटर लीली आहे.
19) इंडियन रोलर हा आंध्र प्रदेश राज्याचा राज्य पक्षी आहे.
20) Blackbuck हा आंध्र प्रदेश राज्याचा राज्य प्राणी आहे.
आंध्र प्रदेश विषयी काही रोचक तथ्य (Facts about Andra Pradesh in marathi)
21) आंध्रप्रदेश राज्याचा राज्य खेळ कबड्डी आहे.
22) आंध्र प्रदेश राज्याचा उल्लेख ऋग्वेदात आणि महाभारत यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.
23) आंध्रप्रदेश राज्य मधील काही भागांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखावरून असे समजते की येथे काही काळ मौर्य साम्राज्याचा सुद्धा भाग होता.
24) आंध्रप्रदेश राज्य क्षेत्रफळानुसार भारतातील आठवे सर्वात मोठे राज्य आहे.
25) आंध्र प्रदेश राज्याच्या सीमा पाच राज्यांना मिळतात. तेलंगाना, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक आणि तमिळनाडू.
26) क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे वाघांसाठी राखीव नागार्जुन श्रीशैलम सेंचुरी हे आंध्र प्रदेश मध्ये स्थित आहे.
27) कृष्णा आणि गोदावरी या आंध्र प्रदेश राज्य मधील सर्वात प्रमुख नद्या आहेत.
28) आनंदपुर हा आंध्रप्रदेश राज्य मधील सर्वात मोठा जिल्हा आहे, आणि लोकसंख्येनुसार ईस्ट गोदावरी.
29) आंध्र प्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यामध्ये स्थित तिरुपती भारतातील पवित्र शहरांपैकी एक शहर आहे. शहरातील एका उंच पर्वतावर तिरुमाला वर प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर स्थित आहे.
30) 1951 मध्ये हैदराबाद मध्ये बनवले गेलेले चार मिनार आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.
31) आंध्र प्रदेशचे हवामान सामान्यतः उष्ण आणि दमट असते. नैऋत्य मान्सून राज्याचे हवामान ठरवण्यात मोठी भूमिका बजावते. पण आंध्र प्रदेशात हिवाळा आल्हाददायक असतो. ही अशी वेळ आहे जेव्हा राज्य अनेक पर्यटकांना आकर्षित करते.
32) आंध्र प्रदेश हे खनिज समृद्ध राज्य आहे, जे खनिज संपत्तीच्या बाबतीत भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील चुनखडीचा एक तृतीयांश साठा या राज्यात आहे.
33) जयापा सेनानी (जयपू नायडू) ही पहिली व्यक्ती आहे ज्यांनी आंध्र प्रदेशात प्रचलित नृत्यांबद्दल लिहिले आहे.
34) आंध्रातील शास्त्रीय नृत्य स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात; पण बहुतेक स्त्रिया ते शिकतात. कुचीपुडी हा राज्यातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकार आहे.
35) आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त सिनेमा हॉल असलेले राज्य आहे, ज्यामध्ये सुमारे 2700 सिनेमा हॉल आहेत.
36)
आंध्रप्रदेश मधील जिल्हे (Districts of Andra Pradesh in Marathi)
आंध्र प्रदेशमध्ये 13 जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी :
- अनंतपुर
- चित्तूर
- पूर्व गोदावरी
- गुंटुर
- कडप्पा
- कृष्णा
- कुर्नूल
- नेल्लोर
- प्रकाशम
- श्रीकाकुलम
- विशाखापट्टणम
- विजयनगर
- पश्चिम गोदावरी
आंध्र प्रदेशातील पर्यटन स्थळे (Tourist places of Andra Pradesh in Marathi)
चारमिनार
चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी 1591 साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पद्धतीवरून मिळाले. चारमिनार हा 54 मीटर उंच आहे.
तिरुपती बालाजी
तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन
श्रीशैल्यम् मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून 220 किमी अंतरावर आहे.
आंध्र प्रदेश मधील शेती
राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी शेती हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. गोदावरी, कृष्णा, पेन्ना आणि तुंगभद्रा या भारतातील चार महत्त्वाच्या नद्या राज्यातून वाहतात आणि सिंचन पुरवतात. भात, ऊस, कापूस, मिर्ची (मिरची), आंबा आणि तंबाखू ही स्थानिक पिके आहेत. अगदी अलीकडे, वनस्पती तेलाच्या उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या पिकांना, जसे की सूर्यफूल आणि भुईमूग, यांना आधार मिळाला आहे.
तांदूळ हे आंध्र प्रदेशचे मुख्य पीक आहे आणि तांदूळ हे येथील लोकांचे मुख्य अन्न आहे. राज्याच्या एकूण धान्य उत्पादनात तांदळाचा वाटा 77 टक्के आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
आंध्र प्रदेश ची राजधानी कोणती आहे?
आंध्र प्रदेश ची राजधानी अमरावती आहे.
आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री कोण आहेत?
वाय.एस. जगनमोहन रेड्डी (2019 पासून)
आंध्र प्रदेश ची नवीन राजधानी
आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी गुंटुर जिल्ह्यातील अमरावती आहे.
आंध्र प्रदेश ची निर्मिती कोणत्या राज्याचे विभाजन करून करण्यात आली?
01 नोव्हेंबर इ.स. 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला.
आंध्र प्रदेशातील मुख्य धरण
नागार्जुनसागर धरण
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आंध्र प्रदेश विषयी माहिती (Andra Pradesh information in marathi) जाणून घेतली. आंध्र प्रदेश माहिती मराठी (Andra Pradesh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.
Plz send the information about uttarakhand state..
याविषयी माहिती लिहिण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू.