मदरबोर्ड म्हणजे काय | Motherboard information in marathi

Motherboard information in marathi : कॉम्प्युटरच्या आजच्या या दुनियेमध्ये तुमच्या मनात कधी ना कधी मदरबोर्ड म्हणजे काय (Motherboard information in marathi) हा प्रश्न नक्कीच आला असेल.

आपली कॉम्प्युटर सिस्टिम वेगवेगळ्या हार्डवेअर पार्टसनी बनलेली असते. त्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मदरबोर्ड. परंतु तुम्हाला माहित आहे का मदरबोर्ड म्हणजे काय (What is motherboard in Marathi), मदरबोर्ड चे किती प्रकार आहेत, मदरबोर्ड चे कोणकोणते भाग आहेत, मदरबोर्ड काय काम करतो या विषयी संपूर्ण माहिती आजच्या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Motherboard information in marathi
मदरबोर्ड म्हणजे काय (Motherboard information in marathi)

मदरबोर्ड म्हणजे काय (Motherboard information in marathi)

जर आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर कॉम्प्युटरचा शोध लागला तेव्हापासून आजपर्यंत मदरबोर्ड चे अनेक आकार आणि त्यांची वैशिष्ट्ये यामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. जुन्या काळामध्ये जे मदरबोर्ड होते त्यांची त्यांचा आकार खूप जास्त होता. त्यांची काम करण्याची क्षमता कमी होती. त्यांचे फिचर्स आजच्या मॉडर्न मदरबोर्ड पेक्षा खूप कमी होते.

मदरबोर्ड विषयी माहिती (Motherboard information in marathi)

जसं आपण पाहिलं की मदरबोर्ड एका हब प्रमाणे काम करतो. हा एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतो. ज्यावर इतर उपकरणे जोडलेली असतात. त्यामुळे मदरबोर्डला मेनबोर्ड (Mainbord) असं सुद्धा म्हणतात. मेन बोर्ड चा अर्थ आहे कॉम्प्युटर सिस्टिमचा सर्वात मुख्य बोर्ड.

मदरबोर्ड म्हणजे काय (What is motherboard in Marathi)

मदरबोर्ड हा कॉम्प्युटर सिस्टीमचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. मदरबोर्ड हा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड असतो ज्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टिम आणि त्याचे अनेक छोटे मोठे Components जोडलेले असतात. या इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड वर RAM, Processor, CMOS, HDD असे वेगवेगळ्या प्रकारचे Components जोडले असतात.

मदरबोर्ड वास्तविकपणे एका हब प्रमाणे काम करतो. यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे पोर्ट दिलेले असतात. त्याच्या मदतीने आपण कॉम्प्युटर ला वेगवेगळे पार्टस जोडू शकतो. या बोर्डवर वेगवेगळे डिव्हाइसेस एकमेकांबरोबर कनेक्ट असतात ज्यामुळे ते एकमेकांबरोबर कमुनीकेशन करू शकतात.

सर्व प्रकारचे एक्स्टर्नल डिव्हाइसेस आपण कॉम्प्युटर ला जोडू शकतो. जसं की कीबोर्ड, माऊस, पेन ड्राईव्ह, एअरफोन, नेटवर्क डिवाइस हे सर्व डिव्हाईसेस मदरबोर्डला जोडलेले असतात. मदरबोर्ड वर एक्स्टर्नल डिव्हाइसेस जोडण्यासाठी वेगवेगळे पोर्ट दिलेले असतात. जसे की कीबोर्ड, माऊस आणि पेन ड्राईव्ह जोडण्यासाठी यूएसबी पोर्ट, एअरफोन जोडण्यासाठी Earphone Jack आणि नेटवर्क डिव्हाइसेस जोडण्यासाठी RJ45 हे पोर्ट मदरबोर्ड वर दिलेले असतात.

एक्स्टर्नल डिव्हाइसेस बरोबरच मदर बोर्ड बर इंटर्नल डिव्हाइसेस सुद्धा कनेक्ट असतात जसं की RAM, Processor, CMOS, HDD इत्यादी. ज्याप्रकारे एक्स्टर्नल डिव्हाइसेस जोडण्यासाठी मदरबोर्ड External Ports असतात त्याप्रमाणेच मदरबोर्ड इंटर्नल डिव्हाइसेस जोडण्यासाठी सुद्धा इंटर्नल स्लॉटस असतात. ज्याच्या मदतीने RAM, CMOS, HDD आणि Graphic Card हे इंटर्नल Components मदरबोर्ड वर जोडले जातात.

जर आपण मदरबोर्ड च्या Components चा विचार केला तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनेंट्स असतात आणि मदर बोर्ड मध्ये प्रत्येक कंपोनेंट्सच असं एक विशेष काम असत. या सर्वांविषयी आपण पुढे पाहूयात.

सर्वात पहिल्यांदा आपल्याला मदरबोर्ड आर्किटेक्चर समजून घेणे गरजेचे आहे. मदरबोर्ड एक चिप सेट आर्किटेक्चर आहे जे दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभाजित केले गेले आहे ज्याला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये Northbridge आणि Southbridge म्हणतात. Northridge आणि Southbridge वर वेगवेगळे Components असतात. परंतु ते सर्व एकमेकांमध्ये इंटरकनेक्टेड असतात आणि ते डेटा ट्रान्स्फर आणि कम्युनिकेशन साठी कार्य करतात.

मदरबोर्ड चे कार्य (Functions of motherboard in Marathi)

जसे आपण पाहिलं की मदरबोर्ड एका हब प्रमाणे काम करतो आणि मदरबोर्ड आपल्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये काम करतो.

  • मदरबोर्ड मध्ये अनेक उपकरणे जोडण्यासाठी सॉकेटस असतात. मदरबोर्ड चे पहिले कार्य हेच आहे की उपकरणे जोडण्यासाठी जागा प्रदान करणे. म्हणून मदरबोर्ड ला संगणकाचा कणा म्हणून देखील ओळखले जाते.
  • मदरबोर्ड वरील प्रत्येक डिवाइस दुसऱ्या डिवाइस बरोबर कमुनिकेशन करू शकतो आणि हे सर्व शक्य होतं फक्त मदरबोर्ड मुळे.
  • मदरबोर्ड वर लावलेल्या External Devices आणि Internal Devices ना पावर सप्लाय देण्याचं आणि ते मॅनेज करण्याचे काम सुद्धा मदरबोर्ड करतो.
  • प्रोसेसर ज्याला आपण कॉम्प्युटरचा मेंदू म्हणतो त्या प्रोसेसर ला पावर सप्लाय देण्याचे आणि त्याला कूलिंग फॅन च्या मदतीने थंड ठेवण्याचे काम सुद्धा मदरबोर्ड करतो.
  • कॉम्प्युटर योग्य प्रकारे सुरू होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायोस (Basic Input Output System), बायोस सिस्टीमला सुरक्षित ठेवण्याचे आणि त्याला नियंत्रित करण्याचे काम सुद्धा मदरबोर्ड करतो.
  • एक्स्टर्नल डिव्हाइसेस जसे की माऊस, कीबोर्ड, यूएसबी कॉम्प्युटरला जोडण्यासाठी मदरबोर्ड एक्स्टर्नल स्लॉट उपलब्ध करून देतो. त्यांना नियंत्रित करण्याचं काम सुद्धा मदरबोर्डच करतो.
  • सीपीयू, ग्राफिक कार्ड, हार्ड डिस्क, रॅम असे कंप्यूटरचे वेगवेगळे Components इंस्टॉल करण्यासाठी मदरबोर्ड स्लॉट उपलब्ध करून देतो.

मदरबोर्ड फुल फॉर्म (motherboard full form in Marathi)

इंटरनेटवर अनेक लोक मदरबोर्ड फुल फॉर्म इन मराठी (Motherboard full form in Marathi) सर्च करतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की मदरबोर्ड चा कोणताही फुल फॉर्म नाही. कारण मदरबोर्ड हा शब्द दोन वेगवेगळ्या शब्दांनी मिळून बनला आहे. पहिला शब्द आहे मदर (Mother) आणि दुसरा शब्द आहे बोर्ड (Board).

मदरबोर्ड चे भाग

मदरबोर्ड चे भाग (Parts of motherboard in Marathi)

  • यूएसबी (USB)
  • पॅरलल स्लॉट (Parallel Slot)
  • रॅम स्लॉट (RAM Slot)
  • माऊस आणि कीबोर्ड (Mouse and Keyboard)
  • सीपीयू स्लॉट (CPU Slot)
  • आयएसए स्लॉट (ISA Slot)
  • एजीपी स्लॉट (AGP Slot)
  • पावर सप्लाय प्लग इन (Power Supply Plugin)
  • सीपीयू चीप (CPU chip)
  • आयडीइ कंट्रोलर (IDE Controller)
  • पीसीआय स्लॉट (PCI Slot)
  • फ्लॉपी कंट्रोलर (Floppy Controller)

मदरबोर्ड चे प्रकार (Types of Motherboard in Marathi)

मदरबोर्ड चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात:

  1. Integrated Motherboard
  2. Non Integrated Motherboard

1) Integrated Motherboard

हे मदरबोर्ड असे मदरबोर्ड असतात ज्यामध्ये वेगवेगळे डिवाइस जोडण्यासाठी पोर्ट दिलेले असतात. हे मदरबोर्ड कॉम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये असतात.

Integrated Motherboard च्या मदतीने आपण विविध प्रकारच्या कॉम्प्युटर Components ला जोडून आपल्या सिस्टमला अपग्रेड करू शकतो. Integrated Motherboard मध्ये रॅम ग्राफिक कार्ड असे इंटरनल कंपोनेंट्स अपग्रेड करता येतात. या मदर बोर्ड मध्ये आपण ग्राफिक कार्ड वाढवू शकतो, RAM वाढवू शकतो आणि मदर बोर्ड मध्ये काही बदल करून सिस्टिमला मॉडिफाय करू शकतो.

2) Non Integrated Motherboard

हे मदरबोर्ड सिस्टीम मध्ये कायमस्वरूपी फिट केलेले असतात. हे मदरबोर्ड जास्त करून मोबाईल फोन आणि टॅबलेट मध्ये वापरले जातात.

या प्रकारच्या मदरबोर्ड मध्ये आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. या मदरबोर्ड मध्ये आपण ग्राफिक्स कार्ड आणि रॅम वाढवू शकत नाही. मदर बोर्ड मध्ये काहीही बदल आपण करू शकत नाही. या मदर बोर्डला आपण मॉडिफाय करू शकत नाही कारण याला एकाच वेळी बनवले जाते आणि सोल्डरिंग केले जाते.

मदरबोर्ड वरील पोर्ट (Motherboard ports in Marathi)

कम्प्युटर मदरबोर्ड वर वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट्स पाहायला मिळतात. याच्याविषयी आपण आता माहिती पाहूया.

1) पावर कनेक्टर (Power Connector)

कॉम्प्युटर सिस्टिम चालू करण्यासाठी मदरबोर्ड वर एक पावर कनेक्टर दिलेला असतो. याच कनेक्टर च्या मदतीने सीपीयू पर्यंत पावर सप्लाय पोहोचतो. पावर कनेक्टर पासून पावर डायरेक्ट मदरबोर्ड पर्यंत जात नाही. त्यापूर्वी SMPS (Switch Mode Power Supply) पर्यंत पावर जाते. याच्या मदतीने विजेतील अस्थिरता पासून संरक्षण दिले जाते.

2) यूएसबी पोर्ट (USB Port)

यूएसबी डिव्हाइसेस सिस्टीम ला जोडण्यासाठी यूएसबी पोर्ट चा वापर केला जातो. USB चा फुल फॉर्म (USB full form in Marathi) आहे Universal Serial Bus. या पोर्टचा तुम्ही नक्कीच वापर केला असेल.

युएसबी ची डेटा ट्रान्सफर करण्याची स्पीड खूप जास्त आहे. यूएसबी पोर्ट चा वापर कॉम्प्युटरला यूएसबी डिवाइस जोडण्यासाठी केला जातो. जसं की माऊस, कीबोर्ड, पेन ड्राईव्ह इत्यादी.

3) विजीए पोर्ट (VGA Port)

या पोर्टचा उपयोग मदरबोर्डवर कोणताही डिस्प्ले डिवाइस जोडण्यासाठी केला जातो. जसं की मॉनिटर जोडण्यासाठी. VGA चा फुल फॉर्म (VGA Full form in Marathi) आहे Video Graphics Array.

4) PS/2 Port

या पोर्ट चा उपयोग कीबोर्ड आणि माउस जोडण्यासाठी केला जातो. या पोर्ट च्या जागी आता यूएसबी पोर्ट चा वापर केला जातो. PS/2 पोर्ट आपल्याला जास्त करून जुन्या मदरबोर्ड मध्ये पाहायला मिळतात. या पोर्टचा आकार गोल असतो.

5) Serial Port

सिरियल पोर्ट 9 पिन आणि 25 पिन च्या मॉडेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या पोर्ट चा उपयोग जुन्या माऊस आणि कीबोर्ड ला जोडण्यासाठी आणि एक्स्ट्रा मोडेम जोडण्यासाठी केला जात होता.

6) Parallel Port

या पोर्ट ला प्रिंटर पोर्ट असेसुद्धा म्हणतात. कारण याचा वापर प्रिंटर आणि स्कॅनर जोडण्यासाठी केला जातो. हे पोर्ट सुद्धा सिरीयल पोर्ट प्रमाणे 25 पिनचे असते.

7) Game Port

जुन्या मदर बोर्ड वर जॉय स्टिक आणि गेम कन्सोल कॉम्प्युटरला जोडण्यासाठी गेम पोर्ट चा वापर केला जातो. कारण आताच्या मदरबोर्ड वर जॉय स्टिक आणि गेम कन्सोल जोडण्यासाठी USB Port वापर केला जातो.

8) External Ports

नेटवर्क केबल जोडण्यासाठी या पोर्ट चा वापर केला जातो. एका कॉम्प्युटरला दुसऱ्या डिवाइस बरोबर जोडण्यासाठी या पोर्ट चा वापर करतात.

9) HDMI Port

या पोर्ट चा उपयोग डिस्प्ले डिव्हाइसेस ला CPU बरोबर जोडण्यासाठी केला जातो. HDMI चा फुल फॉर्म (HDMI full form in Marathi) आहे High Definition Multimedia Interface. आधीच्या काळात मदरबोर्ड मध्ये सीपीयू ला मॉनिटर जोडण्यासाठी VGA Port चा वापर केला जात होता. परंतु आत्ताच्या काळात मदरबोर्ड मध्ये जास्त करून एचडीएमआय पोर्ट चा वापर केला जातो.

10) RJ45 Port

Ethernet विषयी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकलं असेल. हि एक नेटवर्किंग टेक्नॉलॉजी आहे. याच्या मदतीने कॉम्प्युटर डिवाइस कोणत्याही नेटवर्किंग डिव्हायस ला जोडता येऊ शकतो. RJ45 पोर्ट चा उपयोग कॉम्प्युटर पासून नेटवर्क डिवाइस ला जोडण्यासाठी केला जातो.

मदरबोर्ड खराब कसे होतात?

सामान्यपणे मदरबोर्ड अनेक कारणामुळे खराब होतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे हीटिंग (Heating). अधिक गर्मी मुळे. आणि विजेच्या झटक्यामुळे. या दोन कारणामुळेच मदरबोर्ड खराब होऊ शकतो.

मित्रांनो जसजशी नवनवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे, तसे तसे मदर बोर्ड मध्ये सुद्धा खूप बदल होत आहेत. मदरबोर्ड चा आकार सुद्धा पहिल्यापेक्षा खूप छोटा झाला आहे. आणि मदरबोर्ड वरील पोर्टची संख्या सुद्धा कमी होत आहे.

मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल की जुन्या काळामध्ये मदरबोर्ड वर प्रत्येक डिवाइस साठी एक वेगळा पोर्ट होता. जसं की माऊस साठी वेगळा कीबोर्ड साठी वेगळा मॉनिटर साठी वेगळा. परंतु आता नवीन मदर बोर्ड मध्ये पोर्ट ची संख्या खूप कमी केली आहे. आत्ता जास्तकरून डिव्हाइसेस यूएसबी पोर्ट ने कनेक्ट होतात.

आता आपण मदरबोर्ड म्हणजे काय (Motherboard information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता:

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मदरबोर्ड विषयी माहिती (Motherboard information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. मदरबोर्ड म्हणजे काय (What is motherboard in Marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *