मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय | Microcontroller information in Marathi

Microcontroller information in Marathi : मित्रांनो जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा आय टी डिपार्टमेंट मधून असाल तर तुम्ही मायक्रोकंट्रोलर बद्दल नक्कीच ऐकलं असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय (Microcontroller information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Contents

मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय (What is microcontroller in Marathi)

मायक्रो कंट्रोलर एक छोटा आणि खूप स्वस्त असा मायक्रो कॉम्प्युटर आहे, ज्याला एम्बेडेड सिस्टीम (Embedded System) च्या काही विशेष कामांसाठी बनवलं गेलं आहे. जसे की मायक्रोवेव (Microwave) मधील सूचना दाखवणे, रिमोट सिग्नल स्वीकारणे इत्यादी.

मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय
मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय (Microcontroller information in marathi)

मायक्रो कंट्रोलर विषयी माहिती (Microcontroller information in marathi)

दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर मायक्रो कंट्रोलर एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated Circuit) म्हणजेच एक IC आहे ज्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक सर्किट मधील वेगवेगळ्या भागांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो. एका सामान्य मायक्रो कंट्रोलर मध्ये Processor, Serial Ports, Memory (RAM, ROM, EPROM) आणि Peripherals असतात.

मायक्रो कंट्रोलर ला Embedded Controller असे सुद्धा म्हटले जाते.  याचा उपयोग गाड्यांमध्ये, मेडिकल उपकरणांमध्ये, रोबोट्समध्ये आणि अनेक घरगुती उपकरणामध्ये केला जातो.

मायक्रो कंट्रोलर ची विशेषता (Features of microcontroller in Marathi)

 • मायक्रो कंट्रोलर चा आकार आणि किंमत कमी असते.
 • मायक्रो कंट्रोलर हा एका फिक्स Clock Rate Frequency वर काम करतो. आणि त्यामुळे खूप कमी वीज मायक्रो कंट्रोलर Consume करतो.
 • मायक्रो कंट्रोलर कडे एक Dedicated Input Device असतो आणि आउटपुट साठी नेहमी एक लहान एलईडी किंवा एलसीडी डिस्प्ले असतो.
 • मायक्रो कंट्रोल जास्तकरून अनेक उपकरणाबरोबर जोडलेला असतो आणि त्या उपकरणांच्या कामावर नियंत्रण ठेवतो.
 • मायक्रो कंट्रोलर द्वारे उपयोग केला जाणारा प्रोग्राम ROM मध्ये साठवला जातो.मायक्रो कंट्रोलर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वापरला जातो जिथे फक्त ठराविक कॉम्प्युटरच्या कार्याची आवश्यकता असते.

मायक्रो कंट्रोलर चे प्रकार (Types of Microcontroller in Marathi)

मायक्रो कंट्रोलर ला आपण Memory, Architecture, bits आणि Instruction set च्या आधारावर वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये विभाजन करू शकतो.

मायक्रो कंट्रोलर चे बीट च्या आधारावर पडणारे प्रकार

बीटच्या आधारावर मायक्रो कंट्रोलर चे तीन प्रकार पडतात.  ते पुढीप्रमाणे:

1) 8 bit microcontroller

याप्रकारच्या मायक्रो कंट्रोलर चा Arithmetic किंवा Logical ऑपरेशन करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. Intel 8031 आणि 8051 हे 8बिट मायक्रो कंट्रोलर आहेत.

2) 16 bit microcontroller

याप्रकारच्या मायक्रो कंट्रोलर चा उपयोग Logical आणि Arithmetic ऑपरेशन मध्ये केला जातो. जेथे High Accuracy आणि Performance ची गरज असते. उदाहरणार्थ Intel 8096.

3) 32 bit microcontroller

याप्रकारच्या मायक्रो कंट्रोलर चा वापर आपण ऑटोमॅटिक नियंत्रीत होणाऱ्या उपकरणांमध्ये केला जातो. जसं की. Automatic Operational Machine, Medical Appliances, etc.

मायक्रो कंट्रोलर चे मेमरी च्या आधारावर पडणारे प्रकार

मेमरी च्या आधारावर मायक्रो कंट्रोलर चे दोन प्रकार पडतात.  ते पुढील प्रमाणे :

1) External Memory Microcontroller

याप्रकारच्या मायक्रो कंट्रोलरला अशा प्रकारे डिझाइन केलं जातं की या चीप मध्ये प्रोग्राम मेमरी नसते. उदाहरणार्थ Intel 8031.

2) Embedded Memory Microcontroller

याप्रकारच्या मायक्रो कंट्रोलरला अशा प्रकारे डिझाइन केले जाते की या चीप मध्ये सर्व प्रोग्राम्स आणि डाटा मेमरी असते. उदाहरणार्थ IC 8051.

Instruction Set च्या आधारावर मायक्रो कंट्रोलर चे पडणारे प्रकार

Instruction Set च्या आधारावर मायक्रो कंट्रोलर चे दोन प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे :

1) CISC

CISC चा फुल फॉर्म आहे (CISC Full Form in Marathi) काम्प्लेक्स इंस्ट्रक्शन सेट कंप्यूटर (Complex Instruction Set Computer). हा युजरला खूप साऱ्या  Instruction च्या जागी फक्त एक Instruction इन्सर्ट करण्याची अनुमती देतो.

2) RISC

RISC चा फुल फॉर्म आहे (RISC Full Form in Marathi) Reduced Instruction Set Computer.  हा प्रत्येक Instruction मधून Clock Cycle ला लहान करून Operational Time कमी करतो.

मायक्रो कंट्रोलर चा उपयोग (Uses of Microcontroller in Marathi)

मायक्रो कंट्रोलरचे उपयोग पुढीलप्रमाणे:

 • मायक्रो कंट्रोलर चा उपयोग Light Sensing आणि कंट्रोल डिव्हाइसेस मध्ये केला जातो. जसं की LED.
 • तापमान सेन्स करणारे डिव्हाइसेस (Temperature sensing device). जसं की Microwave oven आणि Chimneys, etc.
 • आगीला डिटेक्ट करणारे डिव्हाइसेस. जसं की Fire Alarm.
 • मापन करणारे डिव्हाइसेस. जसं की Volt meter.
 • Current meter मध्ये.
 • Industrial instrumentation devices मध्ये.
 • Hand-held metering systems मध्ये.

मायक्रो कंट्रोलर चे भाग (Parts of Microcontroller in Marathi)

चला आता आपण मायक्रो कंट्रोलरच्या भागाविषयी माहिती जाणून घेऊया.

1) सीपीयू

सेंट्रल प्रोसेसिग युनिट (सीपीयू) हा मायक्रो कंट्रोलर चा मेंदू आहे. हा Instruction ला Fetch करतो आणि त्याला Decode करतो आणि शेवटी Execute करतो. म्हणजेच हा Arithmetic Operations ला परफॉर्म करतो, डाटा फ्लो ला Manage करतो, Control Signal Generate करतो.

2) मेमरी

मेमरी चा उपयोग डेटा का किंवा प्रोग्राम साठविण्यासाठी केला जातो. एका मायकल कंट्रोलर मध्ये RAM आणि ROM (EPROM, EEPROM) किंवा Flash Memory मधील एक निश्चित मात्रा असते.

3) Parallel Input/ Output Ports

Parallel Input/ Output Ports सा उपयोग खूप साऱ्या डिव्हाइसेस मध्ये जसं की एलसीडी, एलईडी, प्रिंटर इत्यादींना चालवण्यासाठी केला जातो.

4) Serial Ports

Serial Ports मायक्रो कंट्रोलर किंवा अन्य Peripheral Device मध्ये Interface प्रदान करतो.

5) Timers / Counters

एका मायक्रो कंट्रोलर मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त टाईमर आणि काउंटर असू शकतात. टाईमर आणि काउंटर  Counting आणि Timing ची सर्व कामे करण्याची सुविधा प्रदान करतात.

6) Analog to Digital Converter (ADC)

हे Analog सिग्नल ला डिजिटल सिग्नल मध्ये रुपांतर करते.

7) Digital to Analog Converter (DAC)

हे डिजिटल सिग्नल ला Analog सिग्नलमध्ये रूपांतर करते.

मायक्रो कंट्रोलर चे फायदे (Advantages of Microcontroller in Marathi)

 • मायक्रो कंट्रोलर चा आकार लहान असतो आणि मायक्रो कंट्रोलर स्वस्त आहे. त्यामुळे मायक्रो कंट्रोलर कोणत्याही लहान मशीन मध्ये सुद्धा बसवता येतो.
 • मायक्रो कंट्रोल च्या माध्यमातून लहान संगणकीकृत कामे अगदी सहजपणे करता येतात.
 • मायक्रो कंट्रोलर काम करण्यासाठी खूप कमी पॉवर वापरतो.
 • मायक्रो कंट्रोलर साठी खूप मोठे सर्किट बनवण्याची गरज नसते.
 • मायक्रो कंट्रोलर वापरून आपण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाइस ला स्मार्ट डिवाइस बनवू शकतो.
 • सामान्य संगणकाची आवश्यकता असलेल्या अनेक साध्या कामांसाठी मायक्रो कंट्रोलर चा उपयोग करता येतो.

मायक्रो कंट्रोलर चे उपयोग (Applications of Microcontroller in Marathi)

 • मोबाईल फोन
 • ऑटोमोबाईल
 • CD / DVD
 • वॉशिंग मशीन
 • कॅमेरा
 • सिक्युरिटी अलार्म
 • कीबोर्ड कंट्रोलर
 • मायक्रोवेव्ह ओव्हन
 • घड्याळ
 • MP 3 Player

आता आपण मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय (Microcontroller information in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय (Microcontroller information in Marathi), मायक्रो कंट्रोलर चे प्रकार, भाग आणि उपयोग यांची माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *