सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे | Difference between CID and CBI in Marathi

मित्रांनो जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल किंवा बातम्या पाहत असाल तर तुम्ही सीआयडी आणि सीबीआय विषयी नक्कीच ऐकलं असेल. आणि तुम्हाला याबद्दल जाणून घ्यायची सुद्धा इच्छा असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे (Difference between CID and CBI in Marathi) याविषयी जाणून घेणार आहोत.

Difference between CID and CBI in Marathi
सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे | Difference between CID and CBI in Marathi

सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे | Difference between CID and CBI in Marathi

प्रत्येक देशामध्ये अपराध सोडवण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी अनेक मोठमोठ्या एजन्सी असतात. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा अशा अनेक एजन्सी आहेत ज्या अपराध्यांना शोधण्याच काम करतात. आज आपण याच विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

सीआयडी चा फुल फॉर्म (CID Full form in Marathi)

तुम्हाला सांगू इच्छितो की सीआयडी चा फुल फॉर्म (CID Full form in Marathi) आहे क्राईम इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंट (Crime Investigation Department). यालाच मराठीत गुन्हे अन्वेषण विभाग असे सुद्धा म्हणतात.

सीआयडी म्हणजे काय (What is cid in Marathi)

ही एक अशी एजन्सी आहे जी राज्यस्तरावरील गुन्ह्यांची चौकशी करते. म्हणजेच राज्यातील कोणत्याही जागी दंगा, हत्या, भ्रष्टाचार किंवा चोरी यासारख्या गुन्ह्यामध्ये सीआयडी महत्वाची भूमिका बजावते. सीआयडी हा एक राज्यातील पोलिसांचा तपास आणि गुप्तचर विभाग आहे.

ब्रिटिश सरकारने 1902 मध्ये पोलिस आयोगाच्या शिफारशीनुसार CID ची स्थापना केली होती. प्रत्येक राज्याची एक वेगळी सीआयडी तपास एजन्सी असते, त्यांचे कार्य करण्याचे अधिकार राज्य सरकार किंवा राज्याच्या उच्च न्यायालयाकडे असतात.  म्हणजेच राज्य सरकार किंवा उच्च न्यायालय राज्यातील कोणतेही गुन्हेगारी प्रकरण सोडविण्याची जबाबदारी सीआयडीकडे सोपवते. यात सामील होण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण ही दिले जाते.

सीबीआय चा फुल फॉर्म (Full Form of CBI in Marathi)

सीबीआय चा फुल फॉर्म आहे (Full Form of CBI in Marathi) Central Bureau of Investigation. यालाच मराठीत केंद्रीय अन्वेषण ब्यूरो असं सुद्धा म्हणतात.

सीबीआय काय आहे (What is cbi in Marathi)

याच्या नावावरूनच आपल्याला कळते की एजन्सी पूर्ण भारताची चौकशी एजन्सी आहे. प्रत्येक देशाची अशी एक केंद्रीय चौकशी एजन्सी असते. त्याच प्रमाणे सीबीआय हा भारताचा केंद्रीय अन्वेषण विभाग आहे. जो भारत आणि विदेशातील होणारे अपराध, हत्या, घोटाळे आणि भ्रष्टाचार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये आणि राष्ट्रीय हिताच्या संबंधित अपराधानमध्ये भारत सरकारकडून चौकशी करतो.

तुम्हाला सांगू इच्छितो की सीबीआय ची स्थापना भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सहा वर्षे आधी म्हणजेच 1941 मध्ये झाली होती. आणि त्यानंतर 1963 मध्ये सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्यूरो हे नाव देण्यात आले. भारत सरकार राज्य सरकारच्या संमतीने कोणत्याही अपराधी गुन्ह्याची चौकशी करण्याची जिम्मेदारी सीबीआय कडे देते. आणि उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारच्या सहमती शिवाय सीबीआय ला चौकशी करण्याचे आदेश देऊ शकते. सीबीआय मध्ये सामील होण्यासाठी उमेदवाराला एसएससी बोर्ड द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा मध्ये पास होणे गरजेचे असते.

सीबीआय आणि सीआयडी मध्ये काय फरक आहे (Difference between CBI And CID in Marathi)

  • आता आपण सीबीआय आणि सीआयडी मध्ये काय फरक आहे हे जाणून घेणार आहोत.
  • सीआयडीचे काम करण्याचे क्षेत्र फक्त एका राज्यापुरते मर्यादित असते परंतु सीबीआयचे काम करण्याचे क्षेत्र पूर्ण भारत आणि विदेशामध्ये असते.
  • सीआयडी कडे जे अपराध किंवा गुन्हे येतात त्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकार किंवा हायकोर्ट यांच्यामार्फत दिले जातात. परंतु सीबीआयकडे जे अपराध येतात त्यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकार, हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्या द्वारे दिले जातात.
  • सीआयडी मध्ये सामील होण्यासाठी पहिल्यांदा पोलीस भरती व्हावे लागते आणि त्यानंतर सीआयडी ऑफिसर बनता येते. परंतु सीबीआय मध्ये भरती होण्यासाठी एसएससी बोर्ड द्वारे आयोजित परीक्षेमध्ये पास होणे आवश्यक असते.
  • सीबीआयची स्थापना सन 1941 मध्ये झाली होती परंतु सीआयडी ची स्थापना सन 1902 मध्ये झाली होती.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे (Difference between CID and CBI in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

One thought on “सीआयडी आणि सीबीआय यामध्ये काय फरक आहे | Difference between CID and CBI in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *