युक्रेन देशाविषयी माहिती | Ukraine information in marathi

Ukraine information in marathi : मित्रांनो यूक्रेन हा पूर्व युरोप मधील एक सुंदर देश आहे. ज्याचे एकूण क्षेत्रफळ 6,03,550 चौरस किलोमीटर आहे. युक्रेनची राजधानी कीव आहे. हिला या देशातील सर्वात मोठे शहर असे सुद्धा मानले जाते. युक्रेन हा जगातील 46 सर्वात मोठा देश आहे. युक्रेन या देशाची अधिकृत भाषा युक्रेनियन आहे. तरीही या देशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. आजच्या या पोस्टमध्ये आपण युक्रेन देशाविषयी माहिती (Ukraine information in marathi) जाणून घेणार आहोत.

युक्रेन देशाविषयी माहिती (Ukraine information in marathi)

युक्रेन देशाविषयी माहिती (Ukraine information in marathi)

देशयुक्रेन
राजधानीक्यीव
सर्वात मोठे शहरक्यीव
अधिकृत भाषायुक्रेनियन
क्षेत्रफळ6,03,550 चौरस किलोमीटर
लोकसंख्या41,167,336 (2022)
राष्ट्रीय चलनयुक्रेनियन रिउनिया (UAH)
युक्रेन देशाविषयी माहिती (Ukraine information in marathi)

1) युक्रेन देशाला 24 ऑगस्ट 1991 मध्ये सोवियेत संघाकडून स्वातंत्र्य मिळाले आहे.

2) युक्रेन हा युरोप मधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. ज्याची एकूण लोकसंख्या 42.5 दशलक्ष आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की युरोपमधील सर्वात मोठा देश रशिया आहे.

3) कीव हे शहर युक्रेन या देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे. याबरोबरच हे शहर आर्थिक, राजनैतिक आणि संस्कृतीचे प्रमुख केंद्र आहे. या शहराची स्थापना 1600 वर्षापूर्वी केली गेली होती.

4) युक्रेन या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये 77 टक्के लोक युक्रेनचे आहेत. आणि 22 टक्के लोक इतर देशातून येऊन वसलेले आहेत.

5) युक्रेन देशाची अधिकृत भाषा युक्रेनी आहे. ही भाषा पश्चिम मध्य आणि देशाच्या अनेक ग्रामीण भागांमध्ये बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे.

6) 2011 पर्यंत युक्रेन हा देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अन्न निर्यातक देश होता. ज्याला breadbasket या नावाने सुद्धा ओळखले जात होते.

7) युक्रेन देशामध्ये लोह, कोळसा, गॅस, तेल, मॅगनीज आणि अनेक धातूंचे भांडार आहे.

8) जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन देखील याच देशात आहे, ज्याला युक्रेनचे आर्सेनाल्ना मेट्रो स्टेशन म्हणतात.

9) युक्रेनमधील लोक पाहुण्यांच्या आदरासाठी जगभरात ओळखले जातात. हे लोक त्यांच्या पाहुण्यांचा खूप मनापासून आदर करतात.

10) युक्रेन देशाचा साक्षरता दर सुमारे 99.8% आहे. जो जगातील चौथ्या क्रमांकाचा साक्षरता दर आहे.

यूक्रेन माहिती मराठी (Ukraine mahiti Marathi)

11) युक्रेन देशामधील लोकांचे सरासरी आयुर्मान 71 वर्षे आहे.

12) युनेस्कोने जगातील ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये युक्रेनमधील सात स्थळांचा समावेश केला आहे.

13)) डब्ल्यू एच ओ चा मते युक्रेन हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात जास्त मद्यसेवन करणारा देश आहे.

14) युक्रेन देशातील लोकांचा सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. सुट्टीच्या दिवशी येथील लोक हा खेळ सर्वाधिक खेळतात. फुटबॉल व्यतिरिक्त बॉक्सिंग हासुद्धा येथील लोकप्रिय खेळ आहे.

15) युक्रेन या देशाला वन्यप्राण्यांचा अधिवास असणारा देश म्हणून सुद्धा ओळखले जाते. येथे प्रामुख्याने लांडगा, रानडुक्कर, अस्वल हे प्राणी आढळतात.

16) युक्रेनमध्ये बोलल्या जाणार्‍या सामान्य भाषांमध्ये युक्रेनियन, रशियन, रोमानियन, पोलिश आणि हंगेरियन यांचा समावेश होतो.

17) युक्रेनियन नागरिक हेटमन पायलीप ऑर्लिक  यांनी 1710 मध्ये जगातील पहिली आधुनिक राज्यघटना लिहिली होती.

18) युक्रेनचा ध्वज प्रामुख्याने दोन रंगांचा (निळा आणि पिवळा) बनलेला आहे, ज्यामध्ये निळा रंग आकाशाचे प्रतिनिधित्व करतो आणि पिवळा रंग धान्याचे प्रतिनिधित्व करतो.

19) युक्रेनियन पुरुष आणि महिलांमधील आयुर्मान दर यात दहा वर्षांचा फरक असून महिलांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त आहे.

20) 1933 मध्ये  युक्रेनला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता, परिणामी सुमारे 4.8 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की युक्रेनमध्ये दुष्काळाच्या काळात इतकी भूक लागली होती की सरकारने 2,000 हून अधिक युक्रेनियन लोकांना नरभक्षक म्हणून अटक केली होती.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

21) युक्रेन या देशातील कर्मचार्‍यांच्या पगारातील वीस टक्के सरकार “पगार शुल्क” म्हणून कापले जाते जे नंतर सेवानिवृत्त युक्रेनियन लोकांना पेन्शन म्हणून दिले जाते.

22) जगातील पहिल्या गॅस दिव्याचा शोध युक्रेनमधील ल्विव्ह येथे लागला होता.

23) युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

युक्रेन ची राजधानी कोणती आहे?

युक्रेन ची राजधानी क्यीव आहे.

युक्रेन चे राष्ट्रीय चलन काय आहे?

युक्रेन चे राष्ट्रीय चलन युक्रेनियन रिउनिया (UAH) आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण युक्रेन देशाविषयी माहिती (Ukraine information in marathi) जाणून घेतली. यूक्रेन माहिती मराठी (Ukraine mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *