रमझान ईद 2022 माहिती मराठी | Ramzan Eid information in marathi

Ramzan Eid information in marathi : रमजान म्हणजे ‘बरकती’ आणि ईद म्हणजे ‘आनंद’. परस्परांमध्ये स्नेहभाव वाढविणारा हा महिना. रमजान ईद या दिवसाला ‘ईद-उल-फित्र’ असेही म्हणतात. हा महिना आणि हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय असा मानला जातो. 3 मे रोजी देशभरात ईद उत्साहात साजरी केली जाणार आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण रमझान ईद विषयी माहिती (Ramzan Eid information in marathi) जाणून घेणार आहोत.

रमझान ईद विषयी माहिती (Ramzan Eid information in marathi)

रमझान ईद विषयी माहिती (Ramzan Eid information in marathi)

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात 29-30 दिवसांचा रोजा ठेवतात. त्यानंतर शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद-उल-फित्र म्हणजे ईद ही चंद्रदर्शनानेच साजरी केली जाते. मुस्लिम बांधव महिनाभराचे उपवास करण्याची ताकद दिल्याबद्दल अल्लाहचे आभार मानतात. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत केली जाते, दानधर्म केला जातो.

ईदच्या दिवशी सकाळी प्रार्थना झाल्यानंतर प्रथम दहीभात आणि साखर यांचे जेवण होते. त्याचवेळी खारका खाण्याचीही पद्धत आहे. कारण महंमद पैंगबर व त्यांच्या कुटुंबातील लोकांना हाच पदार्थ मुख्यत्वे उपलब्ध होता, अशी समजूत आहे. दुधात शेवया टाकून खीर खाण्याची आणि इतरांना खाऊ घालण्याचीही पद्धत आहे. या वेळी मिठाई आणि शिरखुर्मा हे पदार्थ आवर्जून दिले जातात.

रमजानचा मुख्य संदेश पुण्य कमवा आणि पापाला जाळा असा आहे. मुस्लिम या शब्दाचा अर्थ अल्लाच्या आज्ञांचे पालन करणारा किंवा शांततेचे रक्षण करणारा असा केला जातो. रमजान महिन्यात दिवसा व रात्री मिळून नऊ वेळा नमाज अदा केली जाते. सलग तीस दिवस रोजा (उपवास) धरले जातात. हा रोजा 12 तासांचा असतो. सूर्योदयापासून अन्नपाणी वर्ज्य केले जाते. रमजान महिन्याचे पहिले 10 दिवस ईश्वरी कृपेचे, पुढील 10 दिवस भक्तीचे आणि शेवटचे 10 दिवस रोजेदाराचे संरक्षण करण्यासाठी असतात. रमजानचा मुख्य संदेश आनंदी राहा असाच आहे.

रमजान ईद नंतर अडीच महिन्यांनी ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो. या सणाची सुरुवात पैगंबर अब्राहम यांनी केली होती.

पहिली रमझान ईद

‘जंग-ए-बदार’ ची लढाई जिंकल्यानंतर खुद्द पैगंबरांनी त्यांच्या अनुयायांसह पहिली ‘ईद-अल-फितर’ साजरी केली होती. पवित्र कुरआन याच महिन्यात अवतरले असल्यामुळे इस्लाममध्ये रमजानला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण रमझान ईद विषयी माहिती (Ramzan Eid information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *