गुड फ्रायडे 2022 माहिती मराठी | Good Friday information in marathi

Good Friday information in marathi : हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दुःखवट्याप्रमाणे साजरा होतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण गुड फ्रायडे माहिती मराठी (Good Friday information in marathi) जाणून घेणार आहोत.

गुड फ्रायडे माहिती मराठी (Good Friday information in marathi)

गुड फ्रायडे माहिती मराठी (Good Friday information in marathi)

ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. अशी मान्यता आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्यांनी आत्मत्याग करुन लोकांना प्रेमाच्या कळसाचं एक उदाहरण सादर केले.

या दिवसाला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 15 एप्रिलला साजरा केला जात आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही.

गुड फ्रायडेचा इतिहास काय आहे? (Good Friday 2022 History in Marathi)

गुड फ्रायडेचा इतिहास जवळपास 2003 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी बंधुता, एकता आणि शांतीचा संदेश देणारा येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये राहत होता. ते लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते आणि त्यांना सर्वोच्च परमेश्वराचे दूत मानले जात होते. पण काही दांभिक धर्मगुरूंनी त्याच्याविरुद्ध कट रचला. या खोट्या आणि दांभिक धार्मिक पुढाऱ्यांनी ज्यू राज्यकर्त्यांना येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध केले होते. त्यामुळे येशूवर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आणि त्याला वधस्तंभावर लटकविण्याचा हुकूम जारी करण्यात आला.

गुड फ्रायडे च्या मान्यता काय आहेत ?

ख्रिश्चन समाजाच्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं.

जेव्हा पिलातुसने येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूयांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. येशू यांनी प्रेमाच्या सर्वोत्तम उदाहरण सादर करण्यासाठी आपली कुर्बानी दिली. ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. येशू यांनी महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हटलं जाऊ लागलं

गुड फ्राइडे कसा साजरा केला जातो (How celebrate good Friday in Marathi)

या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात. काही लोक येशूच्या स्मरणार्थ काळे कपडे परिधान करुन शोक व्यक्त करतात आणि पदयात्राही काढली जाते. या दिवशी मेणबत्ती लावली जाते आणि घंटीही वाजवली जात नाही. लोक लाकडाने खटखट असा आवाज करतात. कारण हा दिवस चांगुलपणाचा दिवस मानला जातो, म्हणूनच बहुतेक लोक सामाजिक कार्यात भाग घेतात. वृक्षारोपण करतात आणि दान करतात.

ईस्टर संडे म्हणजे काय (What is Easter Sunday in marathi)

मान्यतेनुसार, क्रॉसवर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवला. येशूच्या पुनःजीवित जाल्याने या दिवसाला ईस्टर संडे म्हटलं जातं. या दिवसापासून ते 40 दिवसांपर्यंत ईस्टर पर्व साजरा केला जातो.

गुड फ्रायडे फोटो मराठी (Good Friday images in Marathi)

गुड फ्रायडे फोटो मराठी
(Good Friday images in Marathi)

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण गुड फ्रायडे माहिती मराठी (Good Friday information in marathi) जाणून घेतली. Good Friday in marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *