जगातील सर्वात मोठा धर्म कोणता (Which is the largest religion in the world) : आपल्या जगामध्ये खूप लोक राहतात. आणि या बरोबरच अनेक जाती धर्म सुद्धा मानले जातात. या जगामध्ये जितके लोक राहतात तितकेच ते वेगवेगळ्या धर्माचे आहेत. प्रत्येक धर्म एक दुसऱ्या पेक्षा खूप वेगळा आहे. या बरोबर त्यांच्या परंपरा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण जगातील सर्वात मोठा धर्म कोणता याविषयी माहिती (Which is the largest religion in the world) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 जगातील सर्वात मोठा धर्म कोणता (Which is the largest religion in the world)
- 2 जगभरातील धर्म आणि त्यांची लोकसंख्या (Religion and their population)
- 3 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 3.1 बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता?
- 3.2 जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता?
- 3.3 जगात किती धर्म आहेत?
- 3.4 हिंदू धर्माचे संस्थापक
- 3.5 जगातील सर्वात जुना धर्म कोणता?
- 3.6 जपानने स्वीकारलेला बौद्ध धर्म कोणत्या देशात उगम पावलेला आहे?
- 3.7 बौद्ध धर्मातील पंथ कोणते?
- 3.8 भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करणारा शेवटचा सम्राट कोणास म्हणतात?
- 3.9 बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली?
- 3.10 कोणत्या धर्माला सनातन धर्म मानण्यात आले आहे?
- 3.11 हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?
- 3.12 शीख धर्माची स्थापना कोणी केली?
- 3.13 हिंदू धर्मात किती जाती आहेत?
- 3.14 जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?
- 4 सारांश (Summary)
जगातील सर्वात मोठा धर्म कोणता (Which is the largest religion in the world)
आकडेवारीनुसार पाहायला गेले तर जगातील सर्वात मोठा धर्म ख्रिश्चन धर्म आहे. खरंतर कोणताही धर्म छोटा किंवा मोठा नसतो. सर्व धर्म समान असतात. परंतु जर आकडेवारीनुसार विचार केला तर ख्रिश्चन धर्माचे लोक सर्वात जास्त आहेत. आणि यामुळे लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे.
ख्रिश्चन धर्म
लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्म हा जगातील सर्वात मोठा धर्म मानला जातो. कारण पूर्ण जगामध्ये 31 टक्के लोक ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. 2.2 अरब पेक्षा जास्त लोकसंख्या ख्रिश्चन धर्माचे पालन करते.
इस्लाम धर्म
जगातील सर्वात मोठ्या धर्मा पैकी इस्लाम धर्म दुसऱ्या क्रमांकावर येतो. इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक मुसलमान या नावाने सुद्धा ओळखले जातात. ख्रिश्चन धर्मानंतर पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त इस्लाम धर्माचे पालन केले जाते. 1.6 अरब मुसलमान इस्लाम धर्म मानतात.
हिंदू धर्म
जगातील सर्वात मोठ्या आणि महान धर्मामध्ये हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर आहे. पूर्ण जगामध्ये हिंदू धर्माचे पालन फक्त आशिया खंडामधील भारत देशांमध्ये केले जाते. असे असून सुद्धा हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संख्या एक अरब म्हणजेच 100 कोटी पेक्षा जास्त आहे.
बौद्ध धर्म
जगातील सर्वात मोठ्या धर्मामध्ये चौथ्या क्रमांकावर बौद्धधर्म येतो. बौद्ध धर्माची उत्पत्ती भारत देशामध्ये झाली होती. परंतु आता असे अनेक देश आहेत जेथे बौद्ध धर्माचे पालन केले जाते. उदाहरणार्थ जपान, नेपाळ, चीन इत्यादी. पूर्ण जगामध्ये पाच टक्के लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. पूर्ण जगामध्ये 37 कोटी लोक बौद्ध धर्माचे पालन करतात.
शीख धर्म
बौद्ध धर्माप्रमाणे शीख धर्माचा सुद्धा जन्म भारतामध्ये झाला आहे. परंतु आता हा धर्म भारता शिवाय इतर अनेक देशांमध्ये सुद्धा मानला जातो. पूर्ण जगामध्ये 2.3 कोटी लोक शीख धर्माचे पालन करतात. शीख धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना पंजाबी म्हणजे जाते.
जैन धर्म
जैन धर्माचे पालन सर्वात जास्त आपल्या देशांमध्ये केले जाते. आणि जर पूर्ण जगाचा विचार केला तर पूर्ण जगामध्ये 42 लाख लोक जैन धर्माचे पालन करतात. जैन धर्माचे पालन करणे इतर धर्मांच्या तुलनेने सर्वात अवघड आहे.
जगभरातील धर्म आणि त्यांची लोकसंख्या (Religion and their population)
धर्म | लोकसंख्या | टक्केवारी |
ख्रिश्चन धर्म | 2.382 अब्ज | 31.11% |
इस्लाम धर्म | 1.907 अब्ज | 24.9% |
हिंदू धर्म | 1.161 अब्ज | 15.16% |
बौद्ध धर्म | 506 दशलक्ष | 5.6% |
शीख धर्म | 26 दशलक्ष | 0.30% |
जैन धर्म | 4.2 दशलक्ष | 0.5% |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
बौद्ध धर्माचा धर्मग्रंथ कोणता?
बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथाला तिपिटक म्हणतात.
जगातील सर्वात प्राचीन धर्म कोणता?
हिंदू धर्माला जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हटले जाते आणि काही अभ्यासक आणि विद्वान मानवाच्या इतिहासाच्या पलीकडे सनातन धर्म, “चिरंतन परंपरा” किंवा “चिरंतन मार्ग” म्हणून उल्लेख करतात.
जगात किती धर्म आहेत?
जगात सुमारे 4,300 धर्म आहेत.
हिंदू धर्माचे संस्थापक
ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासह अग्नी, आदित्य, वायू आणि अंगिरा यांनी हिंदू धर्माची स्थापना केली आहे.
जगातील सर्वात जुना धर्म कोणता?
हिंदू धर्म
जपानने स्वीकारलेला बौद्ध धर्म कोणत्या देशात उगम पावलेला आहे?
भारत
बौद्ध धर्मातील पंथ कोणते?
महायान आणि हीनयान
भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करणारा शेवटचा सम्राट कोणास म्हणतात?
सम्राट हर्षवर्धन
बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली?
गौतम बुद्ध
कोणत्या धर्माला सनातन धर्म मानण्यात आले आहे?
हिंदू धर्माला
हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?
भगवद्गीता
शीख धर्माची स्थापना कोणी केली?
गुरू नानक
हिंदू धर्मात किती जाती आहेत?
हिंदू धर्मामध्ये सुमारे 3,000 जाती आणि उपजाती आढळून येतात.
जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?
“मानवधर्म” हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. कोणताही धर्म श्रेष्ठ नाही आहेसर्व धर्म समान आहेत
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण जगातील सर्वात मोठा धर्म कोणता (Which is the largest religion in the world) याविषयी माहिती जाणून घेतली. आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
परिपूर्ण, स्पष्टपणे आणि अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे… धन्यवाद!