मिझोरम राज्याची माहिती | Mizoram information in marathi

Mizoram information in marathi : भारताचा उत्तर-पूर्व भाग जो समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांसाठी प्रसिद्ध आहे. मिझोरम भारतातील सर्वात लहान राज्य आहे. मिझोरम पहिल्यांदा आसाम राज्यातील एक जिल्हा होता परंतु फेब्रुवारी 1987 मध्ये त्याला आसाम पासून वेगळे करण्यात आले. आणि भारतामधील 23 वे राज्य म्हणून नोंदविण्यात आले. आजच्या या पोस्टमध्ये आपण मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi) जाणून घेणार आहोत.

Mizoram information in marathi
मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi)

मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi)

राज्यमिझोरम
स्थापना20 फेब्रुवारी 1987
राजधानीऐझॉल
सर्वात मोठे शहरऐझॉल
राज्यभाषामिझो
जिल्हे11
लोकसंख्या11.2 लाख (2014)
क्षेत्रफळ21,081 चौकिमी
मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi)

1) मिझोरम रंगीबेरंगी सांस्कृतिक सणांनी राज्याला सदाबहार बनवतो. विभिन्न जनजातीच्या लोकांद्वारे दरवर्षी कोणता ना कोणता सण येथे साजरा केला जातो. राज्यातील लोकसंख्या अनेक विभिन्न जनजाति द्वारे विभागली गेली आहे. 

2) मिझोरम नावाला तीन भागांमध्ये वेगळे करून नावाचा अर्थ लावला गेला आहे. मि म्हणजे लोक, झो म्हणजे पर्वत आणि रम म्हणजे प्रदेश. आणि याला जोडून याचा अर्थ होतो पर्वतीय लोकांचा प्रदेश किंवा पर्वतीय लोकांची भूमी.

3) मिझोरम मधील पारंपारिक शासक नाविक होते. आणि ते जमीन आणि पिकांच्या बाबतीत पूर्णपणे निपुण होते.

4) मिझोराम मधील लोकसंख्येचा एक विशाल भाग काही खास जनजातीचा समूह आहे. ज्यांना सामूहिक रूपामध्ये मीझोस असे म्हणतात.

5) मिझोरामची सीमा भारताच्या तीन राज्यांना आणि दोन देशांना मिळते. मिझोरम ची सीमा पूर्व आणि दक्षिणेला म्यानमार आणि पश्चिमेला बांगलादेश ला मिळते. आणि पश्चिमेला भारताच्या त्रिपुरा राज्याला आणि उत्तरेमध्ये आसाम राज्याला तर पूर्वेला मणिपूर राज्याला मिळते.

6) मिझोरम राज्याची राजधानी ऐझॉल आपल्या प्राकृतिक सुंदरता आणि उच्च गुणवत्तेच्या ताज्या फळांसाठी प्रसिद्ध आहे. हे राज्याचे प्रमुख पर्यटन स्थळ सुद्धा आहे.

7) मिझोरम मधील रस्त्यांची व्यवस्था खूप विकसित आहे.

8) मिझोरम मधील लोक मुख्यतः इसाई धर्माचे पालन करतात.

9) मिझोरम मधील लोक आपले मनोरंजन आणि मनाला शांती मिळण्यासाठी लोकसंगीताचा वापर करतात. संगीत क्षेत्रामध्ये त्यांनी आपली एक वेगळी संस्कृती बनवली आहे.

10) मिझोरम राज्य मुख्य पणे एक खास प्रकारची शेती करतो त्याला झूम शेती म्हणतात.

मिझोरम माहिती मराठी (Mizoram mahiti Marathi)

11) मिझोरम मधील प्रमुख सण चापचार कुट आहे, ज्याला वसंत महोत्सव या नावानेसुद्धा ओळखतात. हा सण दरवर्षी मार्च महिन्यामध्ये साजरा केला जातो.

12) मिझोरम मधील 33 टक्के भाग घनदाट जंगलांनी पसरलेला आहे.

13) उन्हाळ्यामध्ये मिझोरम मधील तापमान 20 अंश किंवा 30 अंश पेक्षा जास्त नसते. आणि हिवाळ्यामध्ये 7 ते 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असते.

14) येथील 33 टक्के जमीन घनदाट जंगलांनी व्यापलेली असल्यामुळे, वर्षा ऋतूमध्ये येथे खूप पाऊस पडतो. मार्च ते सप्टेंबर महिन्यामध्ये येथे पाऊस पडतो. यामुळे या महिन्यांमध्ये आपण पर्यटनासाठी येथे जाऊ नये.

15) छिमतुईपुई ही मिझोराम मधील सर्वात लांब नदी आहे, या नदीला कलादान या नावानेसुद्धा ओळखतात.

16) मिझोरम मधील सर्वात मोठा धबधबा झील धबधबा आहे.  जो दक्षिण मिझोरम मधील सैहा जिल्हामध्ये स्थित आहे.

17) मिझोरम मधील मुख्य भाषा मिजो आहे. येथील लोक इंग्रजी भाषेचा सुद्धा उपयोग आपल्या बोलण्यामध्ये करतात.

18) मिझोरम राज्य साक्षरतेच्या हिशोबाने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त साक्षर राज्य आहे, येथील साक्षरता दर कमीत कमी 91 टक्के आहे.

19) मिझोरम भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारे दुसरे राज्य आहे.

20) मिझोरम राज्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या लोकांचे वेगवेगळे लोक नृत्य प्रसिद्ध आहेत. जसे की चेरौ, खुल्ल्म,छैहलम आणि चै.

मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi)

21) मिझोरममधील बहुतेक भू-भाग डोंगराळ स्वरूपाचा असून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यासोबतच पशुपालन व रेशीम हे येथील जोड व्यवसाय आहेत.

22) मका, चहा व कडधान्ये ही मिझोरम मधील प्रमुख पिके आहेत.

23) मिझोरामच्या लोकसंख्येपैकी सुमारे 95% लोक विविध आदिवासी वंशातील आहेत. भारतातील सर्व राज्यांपैकी मिझोराममध्ये आदिवासी लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

24) मिझोरम राज्याच्या लांबी आणि रुंदीमध्ये सुमारे 21 प्रमुख डोंगररांगा आणि विविध उंचीची शिखरे इकडे तिकडे विखुरलेली मैदाने आहेत. राज्याच्या पश्चिमेकडील टेकड्यांची सरासरी उंची सुमारे 1,000 मीटर (3,300 फूट) आहे.

25) मिझोरम राज्याच्या आग्नेय भागात वसलेले, ब्लू माउंटन म्हणून ओळखले जाणारे फावंगपुई त्लांग हे मिझोराममधील 2,210 मीटर (7,250 फूट) सर्वात उंच शिखर आहे.

26) पलक सरोवर हे मिझोराममधील सर्वात मोठे सरोवर आहे आणि 30 हेक्टर (74 एकर) क्षेत्रात व्यापलेले आहे. हे सरोवर दक्षिण मिझोराममधील सायहा जिल्ह्यात आहे.

27) मिझोरम राज्यात पक्ष्यांच्या सुमारे 640 प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत, त्यापैकी अनेक हिमालयाच्या पायथ्याशी आणि आग्नेय आशियामध्ये स्थानिक आहेत. मिझोरामच्या जंगलात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 27 पक्षी जगभरातील धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत आहेत आणि आठ गंभीरपणे धोक्यात असलेल्या यादीत आहेत.

28) राज्यात दोन राष्ट्रीय उद्याने आणि सहा वन्यजीव अभयारण्ये आहेत ब्लू माउंटन (फवंगपुई) राष्ट्रीय उद्यान, डंपा व्याघ्र प्रकल्प ही दोन राष्ट्रीय उद्याने आहेत तर लेंगटेंग वन्यजीव अभयारण्य, मुरलेन राष्ट्रीय उद्यान, न्गेंगपुई वन्यजीव अभयारण्य, तवी वन्यजीव अभयारण्य, खवंगलुंग वन्यजीव अभयारण्य, थांगपुई आणि वन्यजीव अभयारण्य ही मिझोरम मधील अभयारण्य आहेत.

मिझोरम जैवविविधता

मिझोरम राज्यप्राणीसेरो (साझा)
मिझोरम राज्यपक्षीमिसेस ह्यूम्स तीतर
मिझोरम राज्यवृक्षभारतीय गुलाब चेस्टनट (Herhse)
मिझोरम राज्यफुललाल वंदा (सेन्हरी)

मिझोरम मधील जिल्हे (Districts of Mizoram in Marathi)

मिझोरम मध्ये एकूण 11 जिल्हे आहेत.

 • आयझॉल
 • कोलासिब
 • लॉंगटलाय
 • लुंगले
 • ममित
 • सायहा
 • सरचिप
 • चंफई
 • ह्नहथियाल
 • खवजवल
 • सैच्युअल

मिझोरम मधील पर्यटन स्थळे (Tourist places of Mizoram)

मिझोरमला त्याच्या आल्हाददायक हवामानामुळे अनेकजण एक सुंदर ठिकाण मानतात.

 • आयझॉल
 • बारा बाजार
 • मिझोराम राज्य संग्रहालय
 • रेईक टुरिस्ट रिसॉर्ट
 • मुर्लेन नॅशनल पार्क
 • थेनझॉल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मिझोरम ची राजधानी

ऐझॉल

मिझोरम चे राज्यपाल

कंभमपती हरी बाबू

मिझोरम चे मुख्यमंत्री

झोरमथांगा

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण मिझोरम राज्याची माहिती (Mizoram information in marathi) जाणून घेतली. मिझोरम माहिती मराठी (Mizoram mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *