Bangladesh information in marathi : बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. एकेकाळी बांगलादेश हे भारतातील सर्वाधिक महत्त्वाचे राज्य होते. बांगलादेशला मज्जिदांच शहर असे सुद्धा म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
- 2 बांगलादेश विषयी रोचक तथ्य (Facts about Bangladesh in marathi)
- 3 बांगलादेश माहिती मराठी (Bangladesh mahiti marathi)
- 4 बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
- 5 बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
- 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 7 सारांश :
बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
देश | बांगलादेश (Bangladesh) |
राजधानी | ढाका |
सर्वात मोठे शहर | ढाका |
अधिकृत भाषा | बंगाली (बांगला) |
लोकसंख्या | 16.47 कोटी (2020) |
क्षेत्रफळ | 148,460 चौकिमी |
राष्ट्रीय चलन | बांगलादेशी टका (BDT) |
आतंरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +880 |
बांगलादेश विषयी रोचक तथ्य (Facts about Bangladesh in marathi)
1) जगातील सर्वात मोठी नदी डेल्टा आणि सदाबहार वन बांगलादेश मध्येच आहेत.
2) बांगलादेश अधिकृत नाव पीपल रिपब्लिक ऑफ बांगलादेश आहे. याचा स्थानीक भाषांमध्ये अर्थ बंगालीयांचा देश असा होतो.
3) लोकसंख्येच्या दृष्टीने बांगलादेश जगातील अठरावा देश आहे.
4) बांगलादेश मधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतकऱ्यांची आहे.
5) कबड्डी हा बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे.
6) बांगलादेशमध्ये आपल्या देशाप्रमाणेच प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती असतात.
7) रॉयल बंगाल टाइगर हा बांगलादेशचा राष्ट्रीय प्राणी आहे. या राष्ट्रीय प्राण्याची डरकाळी इतकी मोठी आहे की तिचा तीन किलोमीटर दूर सुद्धा याचा आवाज येऊ शकतो.
8) बांगलादेशच्या मुद्रे ला टका म्हटलं जातं. ज्याचा अर्थ बांगलादेशमध्ये रुपया होतो.
9) बांगलादेशमध्ये दर पाच वर्षानंतर राष्ट्रपती निवडणूक होते. येथे कोणीही दोन वेळे पेक्षा जास्त वेळेस राष्ट्रपती पदावर राहू शकत नाही.
10) बांगलादेश मधील जास्त करून लोकसंख्या स्वतःला बंगाली मानते. बंगला उर्फ बंगाली ही बांगलादेशची अधिकृत भाषा आहे.
बांगलादेश माहिती मराठी (Bangladesh mahiti marathi)
11) बांगलादेश मध्ये दोन हजार पेक्षा जास्त पत्रिका आणि वर्तमानपत्रांचे प्रकाशन केले जाते. परंतु देशातील सरासरी वाचकांचे प्रमाण फक्त पंधरा टक्के आहे.
12) बांगलादेशचा प्रमुख धर्म इस्लाम आहे, ज्याची लोकसंख्या जवळजवळ 88.3 टक्के आहे.
13) बांगलादेशच्या एकूण लोकसंख्या मधील जवळजवळ तीस टक्के लोक आपलं जीवन दारिद्रय रेषेच्या खाली जगतात.
14) ढाका बांगलादेश ची राजधानी असण्याबरोबरच येथील सर्वात मोठे शहर सुद्धा आहे.
15) रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कविता हे बांगलादेशचे राष्ट्रगीत आहे.
16) बांगलादेशमध्ये क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे.
17) बांगलादेश मधील लोक खूप कमी हसतात. असं नाही की ते हसत नाहीत, पण त्यांना असं वाटतं की हसणे हे एक म्हातारपणाची निशाणी आहे.
18) बांगलादेश हा एक विकसनशील देश आहे, जेथे एका व्यक्तीचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे 80 हजार रुपये आहे.
19) बांगलादेशच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये दोन रंग आहेत. पहिला हिरवा आणि दुसरा लाल. लाल रंग हा स्वातंत्र्यासाठी लढाई देणार्या सैनिकांसाठी श्रद्धांजलीच प्रतीक आहे.
20) बांगलादेशच्या आर्मीमध्ये तीन लाख सैनिक आहेत. वायुसेनेमध्ये 22 हजार जवान आणि नौसेनेमध्ये 24 हजार जवान आहेत.
बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
21) बांगलादेशमध्ये दरवर्षी 80 पेक्षा जास्त चित्रपट बनवले जातात. बांगलादेशमध्ये भारतीय फिल्म स्टार राहुल रॉय याला खूप प्रसिद्ध मानलं जातं.
22) बांगलादेश हा जगातील एकमेव असा देश आहे जो वेश्यावृत्तिला कायद्याने मान्यता आहे.
23) पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असणारा देश म्हणून बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे.
24) बांगलादेशमधील 80 टक्के लोक शेती करतात. परंतु त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा कपड्यांची निर्यात आहे.
25) बांगलादेश मधील सर्वात उंच शिखर सका हफोंग हे आहे. त्याची उंची 1052 मीटर आहे.
26) 1947 सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो.
27) जॉय बांगला हे बांगलादेशचे ब्रीद वाक्य आहे.
28) 4 नोव्हेंबर 1972 या दिवशी बांगला देश प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. म्हणून 4 नोव्हेंबर हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
29) ब्रम्हपुत्रा व गंगा बांगलादेश येथील प्रमुख नद्या आहेत.
30) बांगलादेशचा साक्षरता दर 72.3 टक्के आहे.
बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi)
31) चिटगांव आणि मोंगला ही दोन बांगलादेश मधील बंदरे आहेत.
32) बांगलादेशातील एक प्रसिद्ध आकर्षण म्हणजे साठ घुमट मशीद. 1985 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. बांगलादेशातील सल्तनत काळातील ही सर्वात मोठी मशीद आहे.
33) जगातील सर्वात लांब समुद्रकिनारा बांगलादेशमध्ये आहे. त्याचे नाव कॉक्स बाजार आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
स्वतंत्र बांगलादेश निर्माता कोणाला म्हटले जाते
स्वतंत्र बांगलादेश निर्माता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांना म्हंटले जाते.
बांगलादेश चे जुने नाव काय आहे?
बांगलादेश चे जुने नाव पूर्व पाकिस्तान होते.
बांगलादेश ची राजधानी कोणती आहे?
बांगलादेश ची राजधानी ढाका आहे.
सारांश :
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण बांगलादेश विषयी माहिती (Bangladesh information in marathi) जाणून घेतली. बांगलादेश माहिती मराठी (Bangladesh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.