Africa Information in Marathi : आफ्रिका हा जगातील सात खंडापैकी एक खंड आहे. जो पृथ्वीच्या पूर्व गोलार्ध मध्ये आणि रशियाच्या दक्षिण-पश्चिमेला आहे. अफ्रीका खंड हा जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा खंड आहे. जो आर्थिक, सांस्कृतिक आणि भाषेच्या दृष्टीने विविधतेने भरलेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आफ्रिका खंडाची माहिती (Africa Information in Marathi) माहिती जाणून घेणार आहोत.

आफ्रिका खंडाची माहिती (Africa Information in Marathi)
खंड | आफ्रिका |
लोकसंख्या | 121.61 कोटी (2016) |
क्षेत्रफळ | 3,02,21,532 वर्ग किमी |
स्वतंत्र देश | 56 |
आफ्रिका खंडाविषयी रोचक तथ्य (Intresting facts about Africa in Marathi)
1) आफ्रिका हा आशिया नंतर जगातील दुसरा सर्वात मोठा खंड आहे.
2) आफ्रिका हा जगातील दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा खंड आहे.
3) आफ्रिकेमध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म आहे तर इसाई हा दुसरा धर्म आहे.
4) अफ्रीका खंडा मध्ये 54 देश आहेत. सर्वात नवीन राष्ट्र दक्षिण सुदान आहे, ज्याला सुदान मधून विभाजित केले गेले आहे.
5) आफ्रिका हा जगातील सर्वात अधिक केंद्रामध्ये स्थित खंड आहेत.
6) आफ्रिकेमध्ये नायजेरिया ची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. ही आफ्रिकेच्या एकूण लोकसंख्येच्या 18 टक्के आहे.
7) जगातील सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्राणी आफ्रिका खंडात येतात. त्यामध्ये जिराफ आणि आफ्रिकी हत्ती यांचा सुद्धा समावेश होतो.
8) अरबी ही भाषा अफ्रीका खंडा मध्ये सर्वात जास्त बोलली जाते.
9) अफ्रीका खंडा मध्ये जवळजवळ दोन हजार भाषा बोलल्या जातात.
10) जगातील सर्वात लांब नदी नील नदी आफ्रिका मध्ये स्थित आहेत.
आफ्रिका खंडाविषयी माहिती मराठी (Africa khand mahiti marathi)
11) जगातील सर्वात मोठे वाळवंट सहारा वाळवंट आफ्रिकेमध्ये स्थित आहे.
12) जगातील सर्वात उष्ण स्थान इथिओपिया आफ्रिका मध्ये स्थित आहे.
13) क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेमधील सर्वात मोठा देश अल्जीरिया आहे.
14) आफ्रिकेला डार्क कॉन्टिनेन्ट या नावाने सुद्धा ओळखले जाते.
15) आफ्रिकेच्या सेनेगल मध्ये एक गुलाबी सरोवर आहे. ज्याला गुलाब सरोवर असेसुद्धा म्हणतात. याचा गुलाबी रंग हा एका बॅक्टेरिया च्या कारणामुळे होतो. परंतु हे सरोवर पोहण्यासाठी सुरक्षित आहे.
16) आफ्रिका हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड आहे.
17) आफ्रिकेची समुद्र तट रेषा 26 हजार किलोमीटर लांब आहे.
18) जगातील 50 टक्के पेक्षा जास्त फ्रेंच लोक आफ्रिकेमध्ये राहतात.
19) आफ्रिकेची पूर्ण लोकसंख्या पूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या पंधरा टक्के आहे.
20) आफ्रिका जगातील दुसरा सर्वात कोरडा खंड आहे.
21) आफ्रिकेमधे जगातील 25 टक्के पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात.
22) सोन्याचा जवळजवळ अर्धा हिस्सा दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळतो.
23) विक्टोरिया धबधब्याच्या पाण्याचा आवाज 40 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येतो.
24) नायजेरिया मध्ये जगातील सर्वात जास्त जुळी मुले जन्माला येतात. या देशाला जुळ्यांची भूमी असेसुद्धा म्हणतात.
25) आफ्रिकेमधील 10 लाख लोकांचे फेसबुक अकाउंट आहेत.
26) आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग ला द सिटी ऑफ गोल्ड या नावानेसुद्धा ओळखतात.
27) आफ्रिकेमधील लोक कांगा नावाचा पोशाख घालतात.
28) आफ्रिकेच्या जंगलामध्ये आढळणारा गोरिला पृथ्वीवरील सर्वात मोठा माकड आहे.
29) सुदानमध्ये 200 पेक्षा जास्त पिरॅमिड आहेत.
30) आफ्रिकेमधील सर्वात घातक जनावर दरियाई घोडा आहे. असे यामुळे आहे कारण या घोड्याने सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे.
आफ्रिका खंडाची माहिती (Africa Information in Marathi)
31) क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका भारतापेक्षा दहा पटीने मोठा आहे.
32) आफ्रिकेमध्ये जवळजवळ 54 देश आहेत.
33) आफ्रिका देशामध्ये जवळजवळ 27 लाख भारतीय प्रवासी राहतात.
34) आर्थिक सामाजिक आणि शिक्षणामध्ये सर्वात पाठीमागे असल्यामुळे अफ्रीका खंडाला अंध खंड सुद्धा म्हणतात.
35) आफ्रिका मध्ये तुआरेग, बद्दू, पिग्मी, बुश मैन, मसाई, किकियू या प्रमुख जाती आढळतात.
36) आफ्रिकेतील कांगो हि नदी विषुववृत्त रेषेला दोन वेळा ओलांडते.
37) आफ्रिकेची लिंपोपो हि नदी मकर रेषेला दोन वेळा ओलांडते.
38) केप काहिरा रेल्वे मार्ग हा आफ्रिकेतील सर्वात लांब रेल्वे मार्ग आहे.
39) आफ्रिकेमध्ये जगातील सर्वात जास्त AIDS चे रुग्ण आहेत.
40) एका अभ्यासानुसार जगातील सर्वात जुनी मानवी सभ्यता आफ्रिकेमध्ये विकसित झाली आहे.
आफ्रिका खंडाची माहिती (Africa Information in Marathi)
41) आफ्रिका हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो.
42) आफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र , ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागर आहेत.
43) उत्तर आफ्रिकेत कमी पर्जन्यमानामुळे अनेक प्रदेशात धुळीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आजही दिसते.
44) आफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे.
आफ्रिका खंडातील देश व राजधानी (Africa khand country and capitals in marathi):
देश | राजधानी |
बुरुंडी | बुजुंबुरा |
कोमोरोस | मोरोनी |
जिबूती | जिबूती |
इरिट्रिया | अस्मारा |
इथियोपिया | अदिस अबाबा |
केनिया | नैरोबी |
मादागास्कर | अंतानानारिव्हो |
मलावी | लिलॉंग्वे |
मॉरिशस | पोर्ट लुईस |
मायोत | मामौझू |
मोझांबिक | मापुतो |
रेयूनियों | सेंट डेनिस |
र्वांडा | किगाली |
सेशेल्स | व्हिक्टोरिया |
सोमालिया | मोगादिशु |
टांझानिया | डोडोमा |
युगांडा | कंपाला |
झांबिया | लुसाका |
झिंबाब्वे | हरारे |
अँगोला | लुआंडा |
कामेरून | याऊंदे |
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक | बांगुई |
चाड | न्द्जामेना |
काँगो | ब्राझाव्हिल |
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक | किंशासा |
इक्वेटोरीयल गिनी | मलाबो |
गॅबन | लिब्रेव्हिल |
साओ टोमे व प्रिन्सिप | साओ टोमे |
अल्जेरिया | अल्जीयर्स |
इजिप्त | कैरो |
लिबिया | त्रिपोली |
मोरोक्को | रबात |
सुदान | खार्टूम |
ट्युनिसिया | ट्युनिस |
पश्चिम सहारा | एल आयुन |
कॅनरी द्वीपसमूह | लास पामास दे ग्रॅन कॅनरिया, सांता क्रूझ दे तेनेराईफ |
सेउता | – |
मादेईरा (पोर्तुगाल) | फुंकल |
मेलिया | – |
बोत्स्वाना | गॅबोरोन |
लेसोठो | मासेरू |
नामिबिया | विंडह्योक |
दक्षिण आफ्रिका | ब्लोएमफॉंटेन, केप टाउन, प्रिटोरिया |
स्वाझिलँड | एमबाबने |
बेनिन | पोर्तो-नोव्हो |
बर्किना फासो | Ouagadougou |
केप व्हर्दे | Praia |
कोत द’ईवोआर | आबिजान, यामुसुक्रो |
गांबिया | बंजुल |
घाना | आक्रा |
गिनी | कोनाक्री |
गिनी-बिसाउ | बिसाउ |
लायबेरिया | मोन्रोविया |
माली | बामाको |
मॉरिटानिया | नौक्कॉट |
नायजर | नियामे |
नायजेरिया | अबुजा |
सेंट हेलेना | जेम्सटाऊन |
सेनेगल | डाकर |
सिएरा लिओन | फ्रीटाउन |
टोगो | लोम |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
आफ्रिका खंडाला वळसा घालणारा पहिला दर्यावर्दी कोण होता
उत्तर : बार्थोलोम्यु डायस
आफ्रिका खंडाचा नकाशा

हा आहे आफ्रिका खंडाचा नकाशा
आफ्रिका खंडातील बेटे
उत्तर : मादागास्कर (मॅलॅगॅसी) व मॉरिशस, सेशेल, रॉड्रिगेस, कॉमोरो, रीयून्यन फर्नांदो पो, अन्नाबॉन.
आफ्रिकेच्या प्रश्नात लक्ष घालणार युरोपातील पहिले राष्ट्र कोणते?
उत्तर : पोर्तुगाल
आफ्रिका खंडात किती देश आहेत?
उत्तर : 54
आफ्रिकेतील मासाई जमातीची वस्ती काय आहे
उत्तर : दक्षिण आफ्रिकेतील एक भटकी पशुपालक जमात. यांची वस्ती मुख्यतः केन्या आणि टांझानिया प्रजासत्ताकांत विशेषतः उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या खचदरीत (रिफ्ट व्हॅलीत), गवताळ प्रदेशाच्या आसपास, वायव्य किलिमांजारो या भागात आढळते. हा भाग मसाई भूमी म्हणूनच प्रसिद्ध आहे.
एक मोठा आफ्रिकन वानर
उत्तर : गोरिल्ला बेरिंगी
आफ्रिका खंडाची लोकसंख्या किती आहे?
उत्तर : 121.61 कोटी (2016)
निष्कर्ष:
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आफ्रिका खंडाची माहिती (Africa Information in Marathi) माहिती जाणून घेतली. आफ्रिका खंडाविषयी माहिती मराठी (Africa khand mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
नैसर्गिक दुरुष्टया संपन्न देश आहे.त्यामुळे खूप खूप आवडते.