Norway information in marathi : नॉर्वे हा युरोप खंडाच्या च्या उत्तरेला स्थित एक देश आहे. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असल्याने हा देश खूप थंड आहे. आणि बर्फाच्या पहाडानी भरलेला आहे. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण नॉर्वे या देशाची माहिती (Norway information in marathi) जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 नॉर्वे देशाविषयी माहिती (Norway information in marathi)
- 2 नॉर्वे विषयी रोचक तथ्य (Amazing facts about norway in Marathi)
- 3 नॉर्वे माहिती मराठी (Norway mahiti marathi)
- 4 नॉर्वे देशाची माहिती मराठी (Norway deshachi mahiti marathi)
- 5 नॉर्वे देशाची माहिती (Norway country information in marathi)
- 6 नॉर्वे देशाची माहिती (Norway information in marathi)
- 7 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 8 सारांश (Summary)
नॉर्वे देशाविषयी माहिती (Norway information in marathi)
देश | नॉर्वे (Norway) |
राजधानी | ओस्लो (Oslo) |
सर्वात मोठे शहर | ओस्लो (Oslo) |
अधिकृत भाषा | नॉर्वेजियन |
लोकसंख्या | 53.8 लाख |
क्षेत्रफळ | 385,207 चौकिमी |
राष्ट्रीय चलन | नॉर्वेजियन क्रोन (NOK) |
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +47 |
नॉर्वे विषयी रोचक तथ्य (Amazing facts about norway in Marathi)
1) नॉर्वेच्या तुरुंगामध्ये कैद्यांना इंटरनेटची सुविधा मिळते.
2) नॉर्वे देशातील नागरिक जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेने सर्वात जास्त पुस्तके वाचतात. आणि ते दरवर्षी सरासरी पाच हजार रुपये आपल्या पुस्तकावर खर्च करतात.
3) जर तुम्ही नॉर्वेमध्ये एखादे चांगले पुस्तक लिहिले तर सरकार त्याच्या एक हजार कॉपी खरेदी करून आपल्या लायब्ररीमध्ये ठेवते. येथे दरवर्षी दोन हजार पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित होतात.
4) या देशांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोणतीही जाहिरात बनवणे बेकायदेशीर आहे.
5) नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी दोन नावे खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे Odd आणि दुसरे म्हणजे Even.
6) नॉर्वेमध्ये एक शहर आहे ज्याचं नाव Hell आहे. याचा अर्थ नरक असा होतो.
7) नॉर्वेमध्ये 17 मे हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी इसवी सन 1814 मध्ये नॉर्वेच संविधान बनवलं गेलं होत.
8) नॉर्वेचे स्वर्गीय राजा ओलाव पांचवे सार्वजनिक वाहनांचा वापर करत होते. आणि ते तिकिटांचे पैसे सुद्धा स्वतः देत होते.
9) नॉर्वे ला येथील लोक Nordweg म्हणतात याचा अर्थ Northern Way (उत्तर रस्ता) असा होतो.
10) स्वीडन आणि नॉर्वे 1814 पासून ते 1905 पर्यंत एकच देश होते. 1905 मध्ये स्वीडन नॉर्वे पासून वेगळा झाला.
नॉर्वे माहिती मराठी (Norway mahiti marathi)
11) 2017 मध्ये नॉर्वे असा पहिला देश बनला ज्याने एफ एम रेडिओ ची सुविधा पूर्णपणे बंद केली आहे.
12) दुसऱ्या महायुद्धानंतर नॉर्वेमध्ये फक्त आतापर्यंत दहा पोलिसांची हत्या झाली आहे.
13) दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या देशांनी संयुक्त राष्ट्राची स्थापना केली होती, त्यामध्ये नॉर्वेची मुख्य भूमिका होती.
14) नॉर्वे मध्ये आपण आपल्या कुत्र्याला बांधून ठेवू शकत नाही. असं करणं हा एक गुन्हा आहे. काही जरूरी परिस्थितीमध्ये आपण कुत्र्याला बांधू शकतो.
15) नॉर्वे या देशामध्ये कोणीही व्यक्ती आपली कमाई लपवू शकत नाही. येथील टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीची कमाई आपल्या वेबसाईटवर टाकते.
16) नॉर्वे मध्ये जर कोणी कोणाची हत्या केली तर त्याला फाशी लावली जात नाही. कारण येथील सर्वात मोठी शिक्षा ही 21 वर्ष तुरुंगवासाची आहे.
17) नॉर्वे मध्ये जर आपण आपल्या घरामध्ये टीव्ही ठेवली असेल तर आपल्याला दर वर्षी त्याची लायसन्स फी द्यावी लागते. ती जवळजवळ 24000 रुपये आहे.
18) नॉर्वे मध्ये एकूण गाड्या पैकी 53 टक्के आणि नेदरलॅंडमधील 55 टक्के इलेक्ट्रिकल गाड्या आहेत.
19) नॉर्वे जरी जगामध्ये सर्वात जास्त पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन करत असला तरीही तेथे गॅस ची किंमत सर्वात जास्त आहे.
20) नॉर्वेच्या उत्तर भागामध्ये मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत जवळजवळ 76 दिवस सूर्य मावळतच नाही.
नॉर्वे देशाची माहिती मराठी (Norway deshachi mahiti marathi)
21) हेलडेन जेल ही नॉर्वे मधील सर्वात दयाळू जेल आहे.
22) नॉर्वे हा खूप लांब देश आहे. त्याच्या एकूण भू सिमेची लांबी 2566 किमी आहे.
23) नॉर्वेचे राष्ट्रीय प्रतीक कुऱ्हाड पकडलेला वाघ आहे.
24) 17 मे हा दिवस नॉर्वेमध्ये बाल दिवस म्हणून साजरा केला जातो.
25) World Happiness Report 2020 च्या रिपोर्ट नुसार नॉर्वे जगातील पाचवा सर्वात आनंदी देश आहे.
26) रोरोस (Roros) नॉर्वेमधील सर्वात थंड ठिकाण आहे. याचे तापमान -50°C आहे.
27) नॉर्वेमध्ये 50 हजार पेक्षा जास्त बेट आहेत.
28) नॉर्वेमधील तीस टक्के लोकसंख्या उच्च शिक्षण प्राप्त आहे. नॉर्वेच्या विश्व विद्यालयांमध्ये आणि राज्य महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.
29) नॉर्वेमध्ये सहा वर्षाच्या आत शिक्षणाला सुरुवात केली जात नाही.
30) दारू पिऊन गाडी चालवन्याने नॉर्वेमध्ये 30 दिवसाची जेल होऊ शकते.
नॉर्वे देशाची माहिती (Norway country information in marathi)
31) कॅनडाच्या तुलनेमध्ये नॉर्वेमध्ये इंग्रजी बोलणारे लोक जास्त आहेत. कॅनडाची लोकसंख्या 76 टक्के इंग्रजी भाषा बोलते आणि नॉर्वेमधील लोकसंख्या 86% इंग्रजी बोलते.
32) नॉर्वेमध्ये बेरोजगारी दर खूप कमी म्हणजे 3.5 टक्के आहे.
33) ईस्टर आणि ख्रिसमस या दोन नॉर्वेमधील प्रमुख सुट्या आहेत.
34) ग्लोबल पीस इंडेक्स नुसार नॉर्वे हा शांतिप्रिय देश आहे.
35) नॉर्वे मधील नागरिक आपल्या कब्रसाठी जमीन स्वतः खरेदी करतात. आणि त्याची डिझाइन करतात.
36) नॉर्वे देशामध्ये आपण अल्कोहोल सरकारी रिटेलर कंपनी विनोमोपोलेट’ (Vinmonopolet) येथूनच खरेदी करू शकतो.
37) नॉर्वे मधील पाच प्रमुख शहरे : ओस्लो, बर्गन, स्टवान्गर, ट्रॉनहैम, ट्रोम्सो.
38) नॉर्वे मधील जवळ जवळ 5 मिलियन लोक अमेरिकेत राहतात.
39) नॉर्वे देशाचा दोन तृतियांश भाग पर्वतानी व्यापलेला आहे. येथे 2000 मीटर पेक्षा जास्त उंच 300 पर्वत आहेत.
40) नॉर्वे देशाचा राष्ट्रीय प्राणी (National animal of Norway) एल्क (Elk) आहे.
नॉर्वे देशाची माहिती (Norway information in marathi)
41) स्कॅंडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत.
42) सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे.
43) अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
44) नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे
45) नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.
46) आपल्याला येथे जंगली ध्रुवीय अस्वल पाहायला मिळतील.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
नॉर्वे ची राजधानी कोणती आहे?
नॉर्वे ची राजधानी ओस्लो (Oslo) आहे.
नॉर्वे ची लोकसंख्या किती आहे?
नॉर्वे ची लोकसंख्या 53.8 लाख आहे.
नॉर्वे चे राष्ट्रीय चलन काय आहे?
नॉर्वे चे राष्ट्रीय चलन नॉर्वेजियन क्रोन (NOK) आहे.
नॉर्वे स्वीडन मध्ये कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
नॉर्वेत उंच पर्वतीय थंड प्रदेशात खुरटी वनस्पती आहे, पण दऱ्याखोऱ्यांतून 700 ते 850 मी. उंचीपर्यंत स्प्रूस व पाडून या सूचिपर्णी वृक्षांची दाट झाडी आहे.
नॉर्वे हा देश कशासाठी प्रसिद्ध आहे?
नॉर्वेला मध्यरात्री सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते. हे त्याच्या अभूतपूर्व तलाव आणि जादुई आकाशासाठी प्रसिद्ध आहे.नॉर्वे त्याच्या भाषा, लोककथा आणि तेल उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नॉर्वे देशाची माहिती (Norway information in marathi) जाणून घेतली. नॉर्वे देशाची माहिती मराठी (Norway deshachi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.