डेन्मार्क देशाची माहिती | Denmark Information in Marathi

Denmark Information in Marathi : डेन्मार्क उत्तर पूर्व मध्ये स्थित एक देश आहे. अनेक बेटांनी मिळून बनलेला हा देश जगातील सर्वात आनंदी आणि सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणून ओळखला जातो. डेन्मार्क हा उत्तर युरोपामधील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi):

देशडेन्मार्क (Denmark)
राजधानीकोपनहेगन (Copenhagen)
सर्वात मोठे शहरकोपनहेगन (Copenhagen)
अधिकृत भाषाडॅनिश
लोकसंख्या58.3 लाख (2020)
क्षेत्रफळ42,933 चौकिमी
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+45
Denmark Information in Marathi

डेन्मार्क विषयी काही रंजक गोष्टी (Facts about Denmark in marathi):

1) डेन्मार्क जगातील सर्वात सुखी देश आहे.

2) पूर्ण जगामध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार डेन्मार्क मध्ये आहे.

3) डेन्मार्कमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत आहे.

4) डेन्मार्कचा राष्ट्रीय ध्वज जगातील सर्वात जुना ध्वज आहे. जो आज सुद्धा वापरला जातो.

5) डेन्मार्क मध्ये जगातील सर्वात जास्त कॅन्सरचे प्रमाण आहे.

6) डेन्मार्कची लेगो कंपनी जगातील सर्वात मोठी खेळणी बनवणारी कंपनी आहे.

7) डेन्मार्क सर्वात जास्त पवनचक्की एक्सपोर्ट करतो.

8) डेन्मार्क ची राजधानी कोपनहेगन मध्ये सायकलींची संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

9) डेन्मार्कची कोणतीही जागा समुद्रापासून 52 किलोमीटर लांब नाही.

10) डेन्मार्कमध्ये लोकांपेक्षा जास्त डुक्कर आहेत.

डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi):

11) डेन्मार्कमध्ये सायकलची संख्या कार पेक्षा दुप्पट आहे.

12) ब्लुटूथ च नाव डेन्मार्कचा राजा किंग हेराल्ड ब्लूटूथ याच्या नावावरून ठेवले गेले आहे.

13) डेन्मार्क मध्ये नवीन कार खरेदी केल्यानंतर 150 टक्के टॅक्स लागतो.

14) डेन्मार्क मधील 95 टक्के लोकसंख्या पोहू शकते.

15) डेन्मार्क मध्ये आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलाचं नाव ठेवू शकत नाही.

16) डेन्मार्क मधील सर्वात उंच पर्वत फक्त 170 मीटर लांब आहे.

17) डेन्मार्क मध्ये जवळजवळ 170 दिवस पाऊस पडतो.

18) डेन्मार्क मध्ये जगातील सर्वात जुना आणि दुसरा सर्वात जुना पार्क आहे.

19) डेनिस भाषेमध्ये कृपया या शब्दासाठी कोणताही शब्द नाही.

20) डेन्मार्क हे बेट 100 पेक्षा जास्त बेटांनी मिळून बनलेला आहे. ज्या मधील काही बेटांवर लोकसंख्याच नाही.

डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi):

21) फुटबॉल हा डेन्मार्कचा सर्वात आवडता आणि राष्ट्रीय खेळ आहे.

22) डेन्मार्क राहण्यासाठी सर्वात महाग युरोपीय संघ देश आहे.

23) डेन्मार्क देशा मध्ये पुरुषांच्या जास्त मृत्यू दरामुळे डेन्मार्कमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.

24) डेन्मार्क मध्ये जर कोणी वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत अविवाहित असेल तर त्याच्या जन्मदिवसा दिवशी त्याच्या अंगावर दालचिनी फेकली जाते. तिसाव्या जन्मदिवसा दिवशी अविवाहित व्यक्तीला काळी मिरची देण्याची परंपरा आहे.

25) डेन्मार्क मध्ये आपण सरकारद्वारे ठरवलेल्या 7000 नावांपैकी एकाचं नाव ठेवू शकतो.

26) डेन्मार्कमध्ये आपण कोणत्या दुसऱ्या देशाचा झेंडा जाळणे गैरकानूनी आहे.

27) डेन्मार्कला फक्त एका देशाची सीमा जोडते ती म्हणजे जर्मनी.

28) डेन्मार्कमध्ये पूर्ण वर्षभर खूप वेगाने हवा चालते. त्यामुळे ते पवन ऊर्जेचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला जातो. येथील 42 टक्के वीज पवन ऊर्जेमुळे उत्पादित होते.

29) डेन्मार्कमधील लोकांनी सर्वात जास्त वेळा पाहिलेला विदेशी चित्रपट टायटॅनिक आहे.

30) डेन्मार्कमध्ये दंत चिकित्सा खूप महाग आहे.

डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi):

31) डेन्मार्क मध्ये सर्वात जास्त पुरुषांची नावे पिटर आणि महिलांची नावे ऐनी आहेत.

32) डेन्मार्क मध्ये कारच्या तुलनेने सर्वात जास्त सायकल आहेत.

33) डेन्मार्क मध्ये प्रेम करण्यासाठी काही वयाचे बंधन नाही.

34) डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

35) डेन्मार्कच्या मुख्य भूमिच्या दक्षिणेस जर्मनी, ईशान्येस स्वीडन व उत्तरेस नॉर्वे आहेत. डेन्मार्कला उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रांचा किनारा आहे.

36) डेन्मार्क चे क्षेत्रफळ 42,933 चौकिमी आहे.

37) डेन्मार्कचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +45 आहे.

38) कोपनहेगन मधील लोक दररोज साधारणपणे 3 तास सायकल चालवतात.

39) जगातील पहिले पर्यावरण मंत्रालय डॅनिश होते.

40) डेन्मार्कमध्ये जगातील सर्वात प्राचीन राजेशाही आहे.

डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi):

41) डेन्मार्कमध्ये पाच राष्ट्रीय उद्याने आहेत.

42) कोपेनहेगन शहराच्या मध्यभागी आपल्याला कारपेक्षा जास्त सायकल दिसतील.

43) हँडबॉलचा शोध डेन्मार्कमध्ये 1897 मध्ये लागला होता.

44) ‘न्यू नॉर्डिक’ ही डेन्मार्क मधील प्रगत डॅनिश पाककृती आहे.

45) ‘स्टेग फ्लॉस्क’ (तळलेले डुकराचे मांस) हे डेन्मार्क मधील प्रमुख पाककृती आहे.

46) हंस हा डेन्मार्कचा राष्ट्रीय पक्षी आहे

47) Tech Ambassador ची नियुक्ती करणारा डेन्मार्क हा पहिला देश आहे.

48) डेन्मार्कने या देशाने जगातील पहिली महिला मंत्री म्हणून नियुक्त केली होती.

49) डेन्मार्क चा प्रजासत्ताक दिवस 5 जून आहे.

50) दरवर्षी कोपनहेगनला संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या 6 पट जास्त पर्यटक येतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1) डेन्मार्क ची राजधानी (Capital of Denmark) कोणती आहे?

उत्तर : कोपनहेगन (Copenhagen)

2) डेन्मार्कची लोकसंख्या (Population of Denmark) किती आहे?

उत्तर : 58.3 लाख (2020)

3) डेन्मार्क चे राष्ट्रीय चलन (National Currency of Denmark) काय आहे?

उत्तर : डॅनिश क्रोन (DKK)

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण डेन्मार्क देशाची माहिती (Denmark Information in Marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a comment