फ्रान्स देशाची माहिती | France information in marathi

France information in marathi : फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. फ्रान्सच्या लोकांचा देवावर विश्वासच नाही. फ्रान्समधील 44 टक्के लोक नास्तिक आहेत. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-7 या राष्ट्रांचा सदस्य आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi) जाणून घेणार आहोत.

France information in marathi
फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi)

फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi)

देशफ्रान्स (France)
राजधानीपॅरिस (Paris)
सर्वात मोठे शहरपॅरिस (Paris)
अधिकृत भाषाफ्रेंच
लोकसंख्या6.71 कोटी (2019)
क्षेत्रफळ632,734 चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनयुरो (€) & फ्रांक पासिफिक (XPF)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+33
फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi)

फ्रान्स देशाविषयी रोचक तथ्य (Facts about France in Marathi)

1) संपूर्ण जगामध्ये फ्रान्स हा एक असा देश आहे, ज्यांने साहित्य क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नोबेल पुरस्कार जिंकले आहेत.

2) फ्रान्स हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोपमधील सर्वात मोठा आणि जगातील 43 वा सर्वात मोठा देश आहे. तसं पाहिलं तर याचं क्षेत्रफळ राजस्थान पेक्षाही कमी आहे.

3)  हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की फ्रान्समधील प्रत्येक पाच माणसांमधील एक माणूस डिप्रेशन ने पीडित आहे. हा जगातील सर्वात उदास देशांमधील एक देश आहे.

4) फ्रान्सच्या लोकांचा देवावर खूप कमी विश्वास आहे.  फ्रान्समधील 44 टक्के लोक नास्तिक आहेत.

5) फ्रान्स नावाची उत्पत्ती लॅटिन शब्द फ्रांसीया पासून झाली आहे.  याचा अर्थ फ्रँकची जमीन किंवा साम्राज्य असा होतो.

6) फ्रान्सची लोकसंख्या जवळजवळ 6.7 कोटी आहे. आणि ही जगातील 19 व्या क्रमांकाची लोकसंख्या आहे.

7) फ्रान्सची जीडीपी जवळ जवळ 2.6 खरब डॉलर आहे. ही जगातील दहावी सर्वात मोठी जीडीपी आहे.

8) फ्रान्स ने एकेकाळी जगातील 8.6 टक्के भागावर राज्य केलं आहे. जे की इंग्लंड नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

9) फ्रान्सचं नाव जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये येतं.  कारण फ्रान्समधील प्रत्येक सरासरी व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा 37 हजार डॉलर आहे.

10) जगातील सर्वात जास्त पर्यटक फ्रान्स मध्येच येतात. दरवर्षी 7.5 करोड लोक फिरायला येतात आणि हा आकडा फ्रान्सच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.

फ्रान्स माहिती मराठी (France information in marathi)

11) फ्रान्सच्या एका नियमानुसार आपण मेलेल्या व्यक्तीसोबत ही लग्न करू शकतो.

12) फ्रान्समधील लुइस XIX नावाचा राजा फक्त 20 मिनिटांसाठी फ्रान्स चा राजा बनला होता.

13) फ्रान्समध्ये कोणत्याही डुकराच नाव नेपोलियन असं ठेवू शकत नाही.

14) फ्रान्स जगातील असा पहिला देश आहे ज्याने समलैंगिकता या कायद्याला मान्यता दिली आहे.

15) फ्रान्स मध्ये म्हैस, साप, मेंढी आणि घोड्यांचे मटण अत्यंत आनंदाने खाल्लं जातं.

16) फ्रान्समध्ये आपण कोणत्याही हॉटेलमध्ये उष्ट राहिलेलं अन्न फेकून देऊ शकत नाही. आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे.

17) फ्रान्समधील महिला जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त वयापर्यंत जिवंत राहतात.

18) फ्रान्समधील कोणत्याही रेल्वे स्टेशनवर आपण कीस करू शकत नाही, आणि असं करताना जर आपण सापडलो तर आपल्याला डायरेक्ट जेल होऊ शकते.

19) फ्रेंच ने आपल्या स्वतःच अस एक इंटरनेट शोधून काढला आहे. ज्याला 1980 मध्ये मिनीटेल हे नाव देण्यात आलं होतं.

20) फ्रान्स संयुक्त राष्ट्र संघाचा संस्थापक सदस्य असण्याबरोबरच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 5 स्थायी सदस्यांपैकी एक आहे.

फ्रान्स देशाची माहिती (France country information in marathi)

21) फ्रेंच राष्ट्रपती चार्ल्स दे गुल्ले यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. कारण विरोधकांनी 32 वेळा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रत्येक वेळेस ते सुरक्षित राहत होते.

22) फ्रान्समधील लॉवर म्युझियम जगातील सर्वात जास्त पर्यटक येणार म्युझियम  आहे.

23) लोकांना एप्रिल फूल बनवण्याची सुरुवात फ्रान्सने केली होती.

24) फ्रान्स नेदरलॅंडनंतर युरोप मध्ये सर्वात जास्त शेती करणारा दुसरा देश आहे.

25) दर वर्षी मे महिन्यामध्ये दोन आठवड्यांसाठी फ्रान्समधील केनी शहरात जगातील सर्वात महत्त्वपूर्ण फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले जाते.

26) तुम्हाला विश्वास बसणार नाही की फ्रान्स मधील एका शहराला कंडोम असे नाव देण्यात आले आहे.

27) फ्रान्स कोळसा उत्पादनामध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

28) फ्रान्स सतराव्या शतकापासून आत्तापर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे.

29) आंतरराष्ट्रीय युनिट प्रणालीचा वापर करणारा पहिला देश फ्रान्स होता. जसं की किलोमीटर, लिटर, किलोग्रॅम.

30) फ्रान्स क्रांतीच्या वेळेस 75% फ्रान्स लोक फ्रेंच भाषा बोलत नव्हते.

फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi)

31) पूर्ण युरोपमध्ये सर्वात लठ्ठ पुरुष फ्रान्स मध्ये राहतात.  आणि महिला दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

32) फ्रान्समध्ये जवळजवळ 4700 प्रकारचे पनीर बनवले जातात.

33) फ्रान्समध्ये जगातील सर्वात जास्त अणूइंधन इलेक्ट्रॉनिक्स चा वापर केला जातो.

34) 2003 मध्ये झालेल्या ड्युरेक्स ग्लोबल सेक्सच्या  अभ्यासानुसार, जगातील फ्रेंच लोक एका वर्षात सर्वाधिक वेळा लैंगिक संबंध ठेवतात.

35) सर्वात प्रथम गाड्यांसाठी नंबर प्लेट फ्रान्स मध्ये वापरली गेली होती.

36) फ्रान्स मध्ये 12 टाईम झोन आहेत, इतर देशाच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत.

37) फ्रान्समधील सर्वात उंच पर्वत मॉन्ट ब्लांक (Mont Blanc) आहे ज्याची उंची समुद्रसपाटीपासून 15,774 फूट आहे.

38)  ‘Gallic rooster’ फ्रान्सच राष्ट्रीय प्राणी आहे.

39) लॉयर (Loire) ही फ्रान्स मधील सर्वात लांब नदी आहे. जिची लांबी 634 मीटर आहे. आणि ही जगातील 171 वी सर्वात लांब नदी आहे.

40) जगातील सर्वात जास्त साहित्यातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize) फ्रान्स या देशाने मिळवले आहेत.

फ्रान्स देशाची माहिती (France marathi mahiti)

41) फ्रान्स मध्ये 14 पेक्षा जास्त वर्ष वयाची कोणतीही व्यक्ती लायसेन्स नसताना गाडी चालवू शकते.

42) फ्रान्स मध्ये दररोज नवीन 2 नवीन पाककला पुस्तके प्रकाशित होतात.

43) फ्रान्स चे क्षेत्रफळ 632,734 चौरस किलोमीटर आहे.

44) या काळाच्या सुरवातीला इ.स. 1789 ते 1799 या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली.

45) फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

फ्रान्स ची लोकसंख्या (France population) किती आहे?

फ्रान्स ची लोकसंख्या 6.71 कोटी (2019) आहे.

फ्रान्स चे राष्ट्रीय चलन (National Currency of France) काय आहे?

फ्रान्स चे राष्ट्रीय चलन युरो (€) & फ्रांक पासिफिक (XPF) आहे.

फ्रान्स मध्ये कोणत्या राजघराण्याची सत्ता होती?

फ्रान्स मध्ये वालोई राजवंश राजघराण्याची सत्ता होती.

फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक कोण आहेत?

फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक जीन-जॅक्स रुसो आहेत.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात किती कलमे होती

फ्रेंच राज्यक्रांतीच्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यात 30 कलमे आहेत.

निष्कर्ष:

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण फ्रान्स देशाची माहिती (France information in marathi) जाणून घेतली. फ्रान्स माहिती मराठी (France information in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *