थायलंड देशाविषयी माहिती | Thailand information in marathi

Thailand information in marathi : थायलंड एक दक्षिण-पूर्व आशियाई देश आहे. हा देश समुद्र किनारे, भव्य शाही महाल आणि बुद्धांच्या अतिसुंदर मंदिरांसाठी ओळखला जातो. यालाच किंगडम ऑफ थायलंड आणि पूर्वेला सियाम या नावाने ओळखले जाते. थायलंड हा देश पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण थायलंड विषयी माहिती (Thailand information in marathi) जाणून घेणार आहोत.

Thailand information in marathi
थायलंड देशाविषयी माहिती (Thailand information in marathi)

थायलंड देशाविषयी माहिती (Thailand information in marathi)

देशथायलंड (Thailand)
राजधानी बॅंकॉक (Bangkok)
सर्वात मोठे शहरबॅंकॉक (Bangkok)
अधिकृत भाषाथाई (Thai)
लोकसंख्या6.96 करोड (2019)
क्षेत्रफळ513,120 चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनथाई बात (THB) (฿)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+66
थायलंड देशाविषयी माहिती (Thailand information in marathi)

थायलंड विषयी रोचक तथ्य (Facts about Thailand in Marathi)

1) दक्षिण पूर्व आशिया मध्ये थायलंड एक मात्र असा देश आहे ज्याला युरोपीय शक्तीने कधीही गुलाम बनवले नाही.

2) रामायण हा येथील धार्मिक महाग्रंथ आहे.

3) दरवर्षी थायलंडमध्ये माकडासाठी समर्पित एक सण साजरा केला जातो.

4) थाई भाषेमध्ये थायलंडच नाव प्रथेट थाई आहे, याचा अर्थ आहे स्वतंत्र लोकांची जमीन.

5) थायलंडच्या चारी दिशांना वेगवेगळ्या देशांच्या सीमा लागतात. उत्तरेला आणि पश्चिमेला म्यानमार, उत्तरेला आणि पूर्वेला लाओस, दक्षिण पूर्वेला कंबोडिया आणि दक्षिणेला मलेशिया.

6) थायलँड जगातील सर्वात जास्त पर्यटनासाठी पाहिला जाणारा देश आहे.

7) थाई भाषेत 44 व्यंजने आणि 32 स्वर आहेत.

8) थायलँड एक बौद्ध धर्मीय देश आहे. येथील 94.6 टक्के लोक बौद्ध धर्माचे पालन करतात आणि मुस्लीम लोकांची लोकसंख्या आहे 4.6 टक्के आहे.

9) थायलंड मध्ये अंडरवेअर न घालता बाहेर पडणे हा एक गुन्हा आहे.

10) थायलंड हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे.

थायलंड माहिती मराठी (Thailand mahiti marathi)

11) पूर्ण जगामध्ये आढळणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातीमध्ये थायलंडचा दहावा क्रमांक लागतो.

12) थायलंडमध्ये शर्टलेस गाडी चालवणे कायद्याविरुद्ध आहे.

13) थायलंडमध्ये एक थाई महिला विंचू भरून असलेल्या काचेच्या एका रूम मध्ये 33 दिवस राहिली होती. तिने एक नवीन विश्व रेकॉर्ड बनवला आहे.

14) एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने थायलँड जगातील पन्नासावा सर्वात मोठा देश आहे.

15) थायलँड जगातील एकविसावा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे.

16) थायलंड राजधानी आणि थायलंड मधील सर्वात मोठे शहर बँकॉक आहेत.

17) थायलंडमधील लोक थाई भाषा बोलतात.

18) रेटिकुलेटेड पाइथन हा लांबीच्या हिशोबाने जगातील सर्वात मोठा साप आहे, जो थायलंडमध्ये आढळतो.

19) थायलंडमधील लोक आपल्या शरीरातील डोक्याला सर्वात जास्त पवित्र अंग मानतात.

20) थायलंड ची राजधानी बँक जगातील सर्वात उष्ण शहरांपैकी एक आहे. येथे सर्वात जास्त उष्ण महिना एप्रिल असतो. या महिन्यांमध्ये येते सोंगक्रन हा सण साजरा केला जातो. जो पूर्णपणे होळी सारखा असतो. परंतु यामध्ये रंगाच्या जागी पाण्याचा वापर केला जातो.

थायलंड देशाविषयी माहिती मराठी (Thailand deshachi mahiti marathi)

21) तसं तर पूर्ण जगामध्ये लोक अंधश्रद्धा म्हणतात. परंतु थायलंडमधील लोक भूतप्रेतापासून वाचण्यासाठी आपल्या घरामध्ये एक वेगळी खोली बनवून घेतात.

22) थायलंडमध्ये शाही परिवाराचा अपमान करणे हा एक प्रकारचा अपराध मानला जातो. मग तो त्या देशाचा निवासी असेल किंवा कोणत्या अन्य देशाचा असेल. दुसऱ्या देशाचे पर्यटक येऊन जर येथे राज्य परिवाराबद्दल अपमान करत असतील तर त्याला जेल होऊ शकते.

23) थायलंड चा राष्ट्रीय ध्वज दररोज सकाळी आठ वाजता फडकवला जातो आणि संध्याकाळी सहा वाजता उतरवला जातो.

24) थायलंडचे राष्ट्रीय चिन्ह गरुड आहे.

25) 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे थायलंड मध्ये आठ हजार लोक मृत्युमुखी पडले होते.

26) थायलंडच्या पूर्ण लोकसंख्येच्या दहा टक्के लोक बँकोक शहरांमध्ये राहतात.

27) थायलंडमध्ये जवळजवळ 35,000 मंदिरे आहेत. याला मंदिरांचा देश असेसुद्धा म्हणतात.

28) थायलंडमध्ये तेराशे पेक्षा जास्त द्वीप आहेत.

29) थायलंडमध्ये पाच हजार पेक्षा जास्त हत्ती आहेत. त्यातील जवळजवळ अर्धे हत्ती हे पाळीव आहेत.

30) कृषी आणि पर्यटन हे थायलंड मधील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आकर्षक उद्योग आहेत.

थायलंड देशाविषयी माहिती (Thailand information in marathi)

31) थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

32) वर्तमान थायलंडाच्या भूप्रदेशावर सुमारे 40,000 वर्षांपासून मानवाचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत.

33) विस्ताराच्या दृष्टीने 513,120 वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला, आकारमानानुसार येमेनपेक्षा काहीसा छोटा व स्पेनपेक्षा काहीसा मोठा विस्तार असलेला हा देश जगातला 51 व्या क्रमांकाचा मोठा देश आहे.

34) इंदानोन हे ठिकाण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे.

35) देशाच्या मध्यभागात चाओ फ्रया नदीचे खोरे वसले असून या खोर्‍यातून ही दक्षिणवाहिनी नदी थायलंडच्या आखातास जाऊन मिळते.

36) थायलंड देशाला बौद्ध भिक्खूंचा देश असेही म्हणतात कारण येथे बौद्ध भिक्खूंची संख्या अन्य बौद्ध देशांमधील भिक्खूंपेक्षा सर्वाधिक आहे. या देशात 40,00,000 पेक्षा अधिक बौद्ध भिक्खू आहेत.

37) रामायणातील कथाप्रसंग हे थायलंडमधील नाट्य आणि लोकनाट्याचे विशेष विषय आहेत.

38) थाई एअरवेजचा प्रमुख वाहतूकतळ असलेला बॅंकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळ हा थायलंडमधील सर्वात मोठा व वर्दळीचा विमानतळ आहे.

39) फुटबॉल हा सध्या थायलंडमधील लोकप्रिय खेळ आहे.

40) बॅंकॉकने आजवर आशियाई खेळ स्पर्धांचे विक्रमी चार वेळा आयोजन केले आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

थायलंड ची राजधानी कोणती आहे (Capital of Thailand in Marathi)

थायलंड ची राजधानी बॅंकॉक (Bangkok) आहे.

थायलंड ची लोकसंख्या किती आहे (Population of Thailand in Marathi)

थायलंड ची लोकसंख्या 6.96 करोड (2019) आहे.

थायलंड चे राष्ट्रीय चलन काय आहे? (Thailand currency in marathi)

थायलंड चे राष्ट्रीय चलन थाई बात (THB) (฿) आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण थायलंड देशाविषयी माहिती (Thailand information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. थायलंड माहिती मराठी (Thailand mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *