ब्राझील देशाविषयी माहिती | Brazil information in marathi

brazil information in Marathi : ब्राझील एक दक्षिण अमेरिकन देश आहे. याची सीमा उत्तरेला वेनेझुईला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयाना, दक्षिणेला उरुग्वे पश्चिमेला अर्जेंटिना, पेराग्वे, बोलिविया आणि पेरू आणि पश्चिमेला कोलंबिया याला मिळते. पूर्वेला ब्राझीलची सीमा दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते.

आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi) जाणून घेणार आहोत. ब्राझील हा देश उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या दोन महाद्वीपा वरील सर्वात मोठा देश होण्याबरोबरच जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे.

हा संस्कृती आणि विविधतेचा देश आहे. विविध देशांच्या संस्कृतीच्या लोकांचा ब्राझीलच्या जमिनीवर प्रवास आणि इतिहास आहे. जो येथील संस्कृती, विविधता आणि समृद्धीचा आधार आहे. येथील लोकांमध्ये राहणे, खाणे-पिणे, संगीत सन उत्सव यांची छाप दिसून येते.

ब्राझीलमध्ये सस्तन प्राणी झाडे आणि खारट पाण्यातील मासे यांची संख्या सर्वात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. येथील जैवविविधता, वन्यजीवन आणि प्राकृतिक सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. आज आपण ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi) जाणून घेऊ या.

Brazil information in marathi
ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi)

Contents

ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi)

देशब्राझील (Brazil)
राजधानीब्राझीलिया (Brasilia)
सर्वात मोठे शहरसाओ पाउलो (Sao Paulo)
अधिकृत भाषापोर्तुगीज (Portuguese)
लोकसंख्या21.26 कोटी (2020)
क्षेत्रफळ8.516 मिलियन चौरस किलोमीटर
राष्ट्रीय चलनब्राझीलियन रिआल (BRL
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+55
प्रजासत्ताक दिन15 नोव्हेंबर 1889
ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi)

1) ब्राझील शब्दाची उत्पत्ती पौज़ ब्रेज़िल” (ब्राज़ीलवुड) [pau brazil” (brazilwood)] नावाच्या एका लाकडापासून झाली आहे. हे पहिलं उत्पादन होतं ज्याला पोर्तुगाली लोकांनी व्यवसायिक रूपात आपल्या फायद्यासाठी याचा उपयोग केला होता.

2) ब्राझीलला पिंडोरामा (Pindorama) असं सुद्धा म्हणतात. ज्याचा अर्थ ताडाच्या झाडाची भूमी असा होतो. (Land of palm trees).

3) ब्राझीलला Land of Contrasts असं सुद्धा म्हणतात.

4) ब्राझील ला Land of the holy cross असं सुद्धा म्हणतात.

5) ब्राझीलच अधिकारीक नाव ‘Federative Republic of Brazil’ आहे. हा दक्षिण अमेरिका आणि लैटिन अमेरिका यामधील सर्वात मोठा देश आहे.

6) ब्राझील ने 15 नोव्हेंबर 1889 मध्ये स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले.

7) क्षेत्रफळानुसार रूस, कॅनडा, युएस आणि चीन नंतर ब्राझील जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे.

8) लोकसंख्येनुसार चीन, भारत, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान नंतर ब्राझील जगातील पाचवा सर्वात मोठा देश आहे.

9) चिली आणि एक्वाडोर यांना सोडल तर ब्राझीलची सीमा दक्षिण अमेरिका महाद्वीपाच्या सर्व देशांना मिळते.

10) ब्राझीलमध्ये 26 राज्य आणि एक संघीय जिल्हा आहे. ब्रासिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे.

ब्राझील माहिती मराठी (Brazil mahiti marathi)

11) ब्राझीलमध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारी तेरा शहरे आहेत.

12) ब्राझीलमध्ये फक्त तीन टाईम झोन आहेत.  फ्रान्स मध्ये 12 टाइम झोन आहेत.

13) साओ पाउलो (Sao Paulo) हे ब्राझीलमधील सर्वात श्रीमंत आणि सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य आहे. हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर सुद्धा आहे.

14) साओ विसेंट (São Vicente) हे ब्राझील मधील सर्वात जुने शहर आहे.

15) ब्राझील मध्ये एक शहर आहे ज्याचं नाव ” Nao-Me-Toque” आहे. याचा अर्थ मला स्पर्श करू नका असा आहे. (Don’t touch me).

16) ब्राझील मध्ये दरवर्षी जवळ जवळ सहा मिलीयन पर्यटक येतात.

17) एका रिपोर्टनुसार दोन हजार सोळा मध्ये 6.6 मिल्लियन पर्यटकांनी ब्राझील दौरा केला या पर्यटकांमुळे ब्राझीलमधील अर्थव्यवस्था 6.2 $ वाढली होती.

18) ब्राझीलमधील पहिले राष्ट्रीय उद्यान 1930 च्या शेवटी बनवले गेले होते.

19) पाण्याच्या प्रवाहाच्या मात्रे नुसार जगातील सर्वात लांब नदी ॲमेझॉन ब्राझील मध्ये आहे.

20) माकडांच्या सर्वात जास्त प्रजाती ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात.

ब्राझील देशाविषयी रोचक तथ्य (Facts about Brazil in marathi)

21) ब्राझील मध्ये एक द्वीप आहे ज्याला स्नेक द्वीप असे म्हणतात. येथे नागरिकांना जाण्याची परवानगी नाही.

22) ब्राझील जगातील सर्वात जास्त संत्रा उत्पादन करणारा देश आहे. जो जगातील एकूण उत्पादनाच्या 30 टक्के संत्री उत्पादन करतो.

23) ब्राझील दीडशे वर्षापर्यंत जगातील सर्वात मोठा कॉपी निर्यातक देश होता.

24) ब्राझील जगातील इथेनॉल इंधन उत्पादन करण्यामध्ये सर्वात मोठा दुसरा उत्पादक देश आहे.

25) ब्राझील मधील विमान निर्माण करणारी कंपनी Embraer जगातील पाच सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.

26) ब्राझील मध्ये 4093 विमानतळ आहेत. जगातील सर्वात जास्त विमानतळ 13513 अमेरिकेमध्ये आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे.

27) ब्राझील हा जगातील दहावा सर्वात मोठा रेल्वे आणि तिसरा सर्वात मोठा सडक मार्ग नेटवर्क असणारा देश आहे.

28) ब्राझीलचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. येथील प्रत्येक शहरामध्ये कमीत कमी एक फुटबॉल स्टेडियम आपल्याला पाहायला मिळेल.

29) जगभरामध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाने प्रसिद्ध असणारे पेले प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ब्राझीलचे आहेत.

30) सर्व दक्षिण अमेरिकी देशांमध्ये ब्राझीलचा साक्षरता दर सर्वात कमी आहे. (86.4%)

ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi)

31) जर आपण ब्राझीलमध्ये एप्पल आयफोन विकत घेणार असाल तर त्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या तुलनेमध्ये जवळजवळ दुप्पट रक्कम द्यावी लागेल.

32) ब्राझील वर जवळजवळ 322 वर्ष पोर्तुगाल यांनी राज्य केला आहे. 7 डिसेंबर ते 1822 ला ब्राझील स्वातंत्र्य मिळालं.

33) ब्राझील मध्ये पहिल्यांदा 1695 मध्ये सोन्याचा शोध लागला होता.

34) संयुक्त राज्य अमेरिका नंतर ईसाई लोकांची सर्वात जास्त लोकसंख्या ब्राझील मध्ये आहे.

35) ब्राझीलमध्ये जवळजवळ 180 भाषा बोलल्या जातात.

36) ब्राझील मधील लोकांचे सरासरी आयुष्य 75 वर्षे आहेत.

37) सिल्वा हे ब्राझील मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आडनाव आहे.

38) ब्राझील मध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार 1946 मध्ये मिळाला होता.

39) ब्राझील मधील बेरोजगारी दर 6.2 टक्के आहे.

40) ब्राझीलमध्ये मतदानासाठी कमीत कमी वय फक्त सोळा वर्षे आहे.

ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi)

41) ब्राझील मध्ये जवळजवळ चोपन्न टक्के लोकसंख्या युरोपीय देशांची आहे.

42) ब्राझीलिया (Brasilia) ही ब्राझील ची राजधानी आहे.

43) ब्राझील ची अधिकृत भाषा पोर्तुगीज (Portuguese) आहे.

44) 2019 नुसार ब्राझील ची लोकसंख्या 21.1 करोड आहे.

45) ब्राझील चे क्षेत्रफळ 8.516 मिलियन चौरस किलोमीटर आहे.

46) ब्राझील चे राष्ट्रीय चलन ब्राझीलियन रिआल (BRL) आहे.

47) जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.

48) गेली 150 वर्ष ब्राझील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन करणारा देश आहे.

49) ब्राझीलने आजवर पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकला असून 2014 फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझीलमध्येच केले होते.

50) ब्राझील ची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची असते.

ब्राझील मधील राज्ये (Brazil states in Marathi)

आक्रे, आलागोआस, अमापा, अमेझोनास, बाईया, सिआरा, शासकीय जिल्हा, एस्पिरितो सांतो, गोयाएस, मरानहाओ, मातो ग्रोसो, मातो ग्रोसो दो सुल, मिनास गेराईस, पारा, परैबा, पाराना, पर्नांबुको, पिआवी, रियो दि जानेरो, रियो ग्रांदे दो नॉर्ते, रियो ग्रांदे दो सुल, रोन्द्योनिया, रोराईमा, सांता कातारिना, साओ पाउलो, सर्जिपे, तोकान्तिन्स.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ब्राझीलची राजधानी कोणती (Capital of Brazil)?

ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया (Brasilia) आहे.

ब्राझील मधील सर्वात उंच शिखर कोणते?

ब्राझील मधील सर्वात उंच शिखर Pico da Neblina (2,995.3 metres) आहे.

ब्राझील मधील दलदलीचा प्रदेश कोणता?

ब्राझील मधील दलदलीचा प्रदेश माटू ग्रोसू प्रांताच्या नैऋत्येस पॅराग्वाय नदी खोऱ्यात पँटनाल हा दलदलीचा प्रदेश आहे.

ब्राझील देशातील कोणत्या राज्यातून विषुववृत्त जाते?

ब्राझील देशातील अमापा, अमेझोनास, रोराईमा, पारा राज्यातून विषुववृत्त जाते.

ब्राझील मधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता?

ब्राझील मधील पर्जन्य ऋतूचा कालावधी मार्च ते ऑगस्ट

ब्राझील मधील अतिपूर्वेकडील ठिकाण कोणते?

ब्राझील मधील अतिपूर्वेकडील ठिकाण साओ पाउलो.

ब्राझील ची लोकसंख्या किती आहे

ब्राझील ची लोकसंख्या 21.1 करोड (2019) आहे.

ब्राझील या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे?

ब्राझील या देशाचा पूर्व-पश्चिम विस्तार विषुववृत्त आणि उष्णकटिबंधीय गोलार्ध मध्ये आहे.

ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे?

ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार ब्राझील पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ब्राझील देशाविषयी माहिती (Brazil information in marathi) माहिती जाणून घेतली. ब्राझील माहिती मराठी (Brazil mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “ब्राझील देशाविषयी माहिती | Brazil information in marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *