तरस प्राणी माहिती मराठी | Hyena information in marathi

Hyena information in marathi : Hyena म्हणजेच तरस. तरस हा एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे, जो साधारणपणे कुत्र्या प्रमाणे दिसतो. परंतु हा कुत्र्याच्या परिवाराशी कोणत्याही रूपाशी संबंधित नाही. तरस या प्राण्याला पर्यावरणाचा सफाईदार असेसुद्धा म्हणतात, कारण तो मेलेल्या प्राण्यांचे सडलेले सुद्धा मांस खातो, आणि हाडे सुद्धा सोडत नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण तरस या प्राण्याविषयी माहिती (Hyena information in marathi) जाणून घेणार आहोत.

तरस प्राणी माहिती मराठी (Hyena information in marathi)

तरस प्राणी माहिती मराठी (Hyena information in marathi)

प्राणीतरस (Hyena in marathi)
वैज्ञानिक नावHyaenidae
वंशपृष्ठवंशीय
जात सस्तन प्राणी
वर्ग मांसभक्षक
आयुर्मान 12 ते 15 वर्ष
तरस प्राणी माहिती मराठी (Hyena information in marathi)

1) तरस हा मोठ्या आकाराच्या कुत्र्याप्रमाणे दिसणारा एक मांसाहारी प्राणी आहे.

2) तरस हा प्राणी कुत्रा किंवा मांजर यांच्या परिवाराचा सदस्य नाही. परंतु त्याचा स्वतःचा एक वेगळा परिवार आहे. तो आहे हाइयेनीडि (Hyaenidae).

3) तरस या प्राण्याचे सर्वात चांगले संबंध मुंगूस या प्राण्याशी आहेत.

4) तरस हा प्राणी पृथ्वीवर जवळजवळ 24 मिलीयन वर्षापासून आहे.

5) तरस हा प्राणी आफ्रिका आणि आशियामधील मैदानी, वाळवंटी आणि जंगलांमध्ये आढळतो.

6) नर आणि मादी तरस एकसारखे दिसतात.

7) तरस या प्राण्याचा आकार एकसारखा नसतो. त्यांच्या आकारामध्ये आपल्याला खूप विविधता दिसून येते.

8) सर्वात मोठा तरस हा Spotted Hyena हा आहे. ज्याच्या शरीराची लांबी 1.2 मीटर ते 1.8 मीटर असते. आणि त्याचे वजन 40 ते 86 किलोपर्यंत असते.

9) सर्वात लहान आकाराचा तरस एर्डवुल्फ हा आहे. ज्याची लांबी 85 ते 105 सेंटीमीटर असते. 

10) Spotted Hyena आपला 95 टक्के आहार जनावरांच्या शिकारी पासून मिळवतो.

तरस प्राण्याची माहिती मराठी (Taras prani mahiti marathi)

11) तरस हा प्राणी कधीही अन्न वाया घालवत नाही. तो जनावरांच्या हाडांपासून ते संपूर्ण शरीर खातो.

12) तरस हा समूहामध्ये राहणारा प्राणी आहे. त्याच्या समूहाला Clan म्हणतात. प्रजाती नुसार त्यांचा समूह लहान किंवा मोठा असतो.

13) तरस प्राण्याचे हृदय इतर स्तनधारी प्राण्यांच्या तुलनेने मोठे असते.

14) साधारणपणे तरस साठ किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो.

15) प्रजाती नुसार तरस या प्राण्याचा गर्भ काळ कमी किंवा जास्त असतो. साधारणपणे तरस या प्राण्याचा गर्भ काळ 90 ते 110 दिवसांचा असतो.

16) मादी तरस एकावेळेस दोन ते चार पिल्लांना जन्म देते.

17) तरस या प्राण्यांच्या पिल्लांना शावक (Cub) म्हणतात.

18) जन्मानंतर तरस या प्राण्यांच्या पिल्लांचे डोळे पाच ते नऊ दिवस बंद असतात.

19) तरस या प्राण्यांची पिल्ले सहा महिन्यापर्यंत आईच्या दुधावर अवलंबून असतात.

20) वयाच्या दोन वर्षानंतर तरस यौन परिपक्वता प्राप्त करतो. आणि आपल्या आईपासून वेगळा होतो.

तरस या प्राण्याविषयी माहिती (Hyena information in marathi)

21) तरस या प्राण्याला खूप भित्रा प्राणी म्हणून ओळखले जाते. परंतु कधीकधी हा खूप खतरनाक सुद्धा होऊ शकतो. आणि तेव्हा तो जनावरांवर आणि मनुष्यावर सुद्धा हल्ला करतो.

22) तरस आणि वाघ एक दुसऱ्या ने केलेली शिकार चोरण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. शिकार केल्यानंतर तरस हा प्राणी आपल्या साथी प्राण्यांना बोलावण्यासाठी आवाज काढतो. हा आवाज ओळखून वाघ तेथे येतो आणि ती शिकार घेऊन जातो.

23) तरस एक बुद्धीमान प्राणी म्हणुन ओळखला जातो. तो जेवणाचे स्टीलचे डबे सुद्धा उघडू शकतो.

24) तरस हा प्राणी मासा पकडण्याची ट्रिक सुद्धा जाणतो. त्याला मासे पकडताना अनेक वेळा पाहिले गेले आहे.

25) तरस या प्राण्याचा उल्लेख बाईबल या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये सुद्धा केला गेला आहे.

26) तरस या प्राण्याविषयी समाजामध्ये अनेक पद्धतीच्या अफवा पसरवल्या जातात.

27) मध्ययुगामध्ये असे म्हटले जात होते की पूरलेल्या व्यक्तीला तर तरस प्राणी उकरून खातो. परंतु तो असं करत नाही.

28) प्राचीन मिस्त्र या देशामध्ये तरस या प्राण्याला पाळीव प्राणी म्हणून पाळले जात होते. आणि त्याचे मांस सुद्धा खाल्ले जात होते.

29) केनिया आणि टांझानिया या देशांमधील मसाई जातीचे लोक मृत्यू पावलेल्या व्यक्तीला पुरण्या ऐवजी तरस या प्राण्याला खाण्यासाठी सोडत होते.

तरस या प्राण्याविषयी माहिती (Hyena information in marathi)

30) तरस या प्राण्याचा एकमेव शिकारी माणूस आहे.

31) तरस या प्राण्याचा जीवन काळ दहा ते वीस वर्षापर्यंत असतो.

32) हा प्राणी वाघाच्या पिल्लांना उचलून सुद्धा घेऊन जातो. वाघाचा हा सर्वात मोठा शत्रू असतो. कधीकधी हा प्राणी आपल्याच प्रजातीच्या तरसाना सुद्धा खातो.

33) तरस या प्राण्याची सरळ शेपटी हल्ल्याची सूचना देते.

तरस प्राण्याच्या काही जाती

  • पट्टेरी तरस
  • तपकिरी तरस
  • स्पॉटेड तरस
  • कीटकभक्षी तरस

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लाफिंग ॲनिमल कोणाला म्हणतात?

तरस प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला ‘लाफिंग ॲनिमल’ (हसणारा प्राणी) असेही म्हणतात.

तरस प्राणी दाखवा

हा आहे भारतातील पट्टेरी तरस.

तरस चा आवाज

तरस प्राणी हा माणसाच्या रडल्या प्रमाणे तर मोठ्याने हसल्या प्रमाणे आवाज काढतो.

कवक सृष्टी मधील प्राण्याची वैशिष्ट्ये लिहा

1) कवकात प्राकलकण (कोशिकेत अंतर्भूत झालेले लहान दाट जीवद्रव्याचे भाग) नसतात.

हिस्त्र प्राणी म्हणजे काय?

हिस्त्र प्राणी म्हणजे जंगलात राहणारे आणि शिकार करून जगणारे प्राणी.

तरस प्राणी किती वर्ष जगतो?

तरस प्राणी 12 ते 15 वर्ष जगतो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण तरस या प्राण्याविषयी माहिती (Hyena information in marathi) जाणून घेतली. तरस प्राण्याची माहिती मराठी (Taras prani mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *