50+ मराठी कोडी | Riddles in marathi

Riddles in Marathi : Puzzles in marathi : मित्रांनो लहानपणीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे मराठी कोडी (Marathi Kodi). आणि मराठी कोडी सोडवायला सुद्धा खूप मज्जा येते. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कोडी (Riddles in marathi) पाहणार आहोत. ही कोडी तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील.

Riddles in marathi
50+ मराठी कोडी (Riddles in marathi)

मराठी कोडी (Riddles in marathi)

1) अशा भाजीचे नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे
नाव लपलेले आहे…
उत्तर : वांगी आणि शिमला

2) एका माणसाचे पाच अक्षरी नाव काय ? जे नाव उलटे आणि सरळ वाचले तर सारखेच येते.
उत्तर : नवजीवन

3) रात्री 3 ठिकाणी आग  लागली आहे. 1- मंदिर 2- शाळा 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
उत्तर : अँबुलन्स आग विझवित नाही.

4) मी चालले राग राग,तु का ग माझ्या माग माग…
उत्तर : सावली

5) रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?
उत्तर : रामा

6) एवढं मोठं घर आणि त्याला एकच राखनदार…
उत्तर : कुलूप

7) तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे वडिलांचे भाऊ तुमचे कोण?
उत्तर : काका

8) ती धावत पळत समुद्रातून येते आणि किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते. ओळखा पाहू ती कोण ?
उत्तर : लाट

9) अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही, आणि शहर आहे पण पाणी नाही
उत्तर : नकाशा

10) अशी कोणती गोष्ट आहे जिला माणूस लपवून चालतो पण स्त्रिया दाखवून चालतात?
उत्तर : पर्स

मजेशीर मराठी कोडी (Puzzles in marathi):

11) ऊन बघता मी येतो, सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा होतो. सांगा मी कोण?
उत्तर : घाम

12) पाणी नाही, पाऊस नाही, रान हिरवेगार. कात नाही, चुना नाही, तोंड लाललाल.
उत्तर : पोपट

13) कोकणातून येतो, देश विदेशात जातो. मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा महान. पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण?
उत्तर : आंबा

14) आकाशातून पडली घार, तिला केलं ठार. रक्त प्यायलं घटाघटा, मांस खाल्लं पटापट.
उत्तर : नारळ

15) दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मांतरी…
उत्तर : डोळे

16) दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान
उत्तर : ट्रॅक्टर

17) आकाशातून पडली घार, तिला केलं ठार. रक्त प्यायलं घटाघटा, मांस खाल्लं पटापट.
उत्तर : नारळ

18) दोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मान्तरी
उत्तर : डोळे

19) इथेच आहे पण दिसत नाही
उत्तर : वारा

20) दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान
उत्तर : ट्रॅक्टर

ओळखा पाहू मी कोण (who am i riddles in marathi)

21) तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?
उत्तर : दहा रुपयाची अगरबत्ती घेईन आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल.

22) लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट घालू शकत नाही?
उत्तर : मंगळसूत्र

23) असा कोण आहे जो तुमच्या नाखा वर बसून तुमचे कान पकडतो?
उत्तर : चष्मा

24) असा कोण आहे ज्याच्या जवळ पंख नसून सुद्धा तो उडतो?
उत्तर : पतंग

25) असा कोण आहे ज्याला मारताना लोकांना खूप मज्जा येते?
उत्तर : ढोल

26) असे काय आहे ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात?
उत्तर : वाढदिवसाचा केक

27) अशी कोणती खोली आहे ज्याला कोणताच दरवाजा आणि कोणतीच खिडकी नाही?
उत्तर : मशरूम

28) अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला देण्याअगोदर तुमच्याकडून घेतली जाते?
उत्तर : तुमचा फोटो

29) असं काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते पण ते कोणीही ते वाचू शकत नाही?
उत्तर : भाग्य

30) असे काय आहे जे फक्त वाढत जाते पण कधी कमी होत नाही?
उत्तर : वय

मराठी कोडी व उत्तरे (puzzles in marathi with answers)

31) असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही, तरीही तो राजा आहे.
उत्तर :  सिंह

32) अशी कोणती वस्तू आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना की आवडत नाही?
उत्तर : पालकांचा मार किंवा ओरड

33) असे काय आहे जे फाटते परंतु त्या मधून आवाज येत नाही?
उत्तर : दूध

34) अशी कोणती गोष्ट आहे ज्याला मान आहे पण डोके नाही?
उत्तर : बाटली

35) असे काय आहे जे कोपऱ्यात राहून जगभर प्रवास करते?
उत्तर : शिक्का

36) असे काय आहे जे आपल्याकडे असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही?
उत्तर : गुपित

37) जो माणूस ते निर्माण करतो ते तो वापरत नाही, जो माणूस त्याला खरेदी करतो त्याला त्याची गरज नसते, जो माणूस त्याचा वापर करतो त्याला ते माहीत नसते, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : एक ताबूत

38) मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत, मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : ढग

39) असे काय आहे ज्याचे नाव घेतल्या घेतल्या ते अदृश्य होते?
उत्तर : शांतता

40) तुम्ही मला पाण्यात पाहू शकता पण मी कधीही ओली होऊ शकत नाही, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : प्रतिबिंब

डोकं चालवा मराठी कोडी व उत्तरे (riddles in marathi with answers)

41) मी तरुण असतो तेव्हा उंच असतो आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : मेणबत्ती किंवा पेन्सिल

41) लोक मला खाण्यासाठी विकत घेतात, पण ते मला कधीही खात नाहीत, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : प्लेट आणि चमचा

42) माझ्याकडे हृदय आहे, परंतु इतर अवयव नाहीत ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : पत्त्यांचा डेक

43) गोल आहे पण बॉल नाही, शेपटी आहे पण प्राणी नाही, सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात, पण तरीसुद्धा मी रडत नाही, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : फुगा

44) चौकीवर बसली एक रानी, तिच्या डोक्यावर पाणी
उत्तर : मेणबत्ती

45) आपण जेवढे पुढे जातो तेवढे आपण पाठीमागे सोडत जातो?
उत्तर : पाऊल

46) रात्री जागतो, दिवसा झोपतो, नेहमी झाडाला उलट लटकलेला असतो, ओळखा पाहू मी कोण?
उत्तर : वटवाघूळ

47) प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे?
उत्तर : दिशा

48) एवढस कार्टं घर कसं राखतं?
उत्तर : कुलूप

49) इथेच आहे पण दिसत नाही?
उत्तर : वारा

50) पांढरे पातेल पिवळा भात?
उत्तर : अंडी

एमपीएससी मराठी कोडी (mpsc puzzle in marathi with answer):

51) तिखट मीठ मसाला, चार शिंगे कशाला?
उत्तर : लवंग

52) सुपभर लाह्या, त्यात एक रुपया?
उत्तर : चंद्र आणि चांदण्या

53) हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली?
उत्तर : भेंडी

54) तीन पायांची तिपाई, त्यावर बसला शिपाई?
उत्तर : चूल आणि तवा

55) तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
उत्तर : घड्याळ

56) पाटील बुवा राम राम, दाढी मिशा लांब लांब?
उत्तर : कणीस

57) काळ्या रानात हत्ती मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
उत्तर : कापूस

58) अशी कोणती गोष्ट आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?
उत्तर : वाहणारे नाक

59) अशी कोणती गोष्ट आहे जी चोर चोरी करू शकत नाही?
उत्तर : ज्ञान

60) ती माय माउली जग तिच्यावर जगते, घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?
उत्तर : जमीन

सूचना: जर तुमच्याकडे मराठी कोडी (Riddles in marathi) असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही ती कोडी या पोस्ट मध्ये नक्की संग्रहित करू.

सारांश :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी कोडी (Riddles in marathi) जाणून घेतली. मजेशीर मराठी कोडी (Puzzles in marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कोडी आवडली असतील तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

4 thoughts on “50+ मराठी कोडी | Riddles in marathi

  1. अशी कोणती खोली आहे, ज्याला कोणताही दरवाजा आणि कोणतीही खिडकी नाही?

    1. मला डोळे आहे पण पाहता येत नाही
      हात आहे पण काम करता येत नाही
      कान आहे पण ऐकता येत नाही
      पाय आहे पण चालता येत नाही
      तरीही लहान मुले माझ्याशी खेळतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *