Chattisgarh information in marathi : नैसर्गिक विविधता, सांस्कृतिक आणि पारंपरिक इतिहास यासाठी प्रसिद्ध छत्तीसगड मध्य भारतामध्ये स्थित एक प्रमुख राज्य आहे. हे भारतातील नवव्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. ज्याचे क्षेत्रफळ 135,192 चौरस किलोमीटर आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण छत्तीसगड राज्याची माहिती (Chattisgarh information in marathi) जाणून जाणून घेणार आहोत.
Contents
- 1 छत्तीसगड राज्याची माहिती (Chattisgarh information in marathi)
- 2 छत्तीसगड माहिती मराठी (Chattisgarh mahiti marathi)
- 3 छत्तीसगड राज्याविषयी माहिती (Chattisgarh information in marathi)
- 4 छत्तीसगड राज्याची माहिती मराठी (Chattisgarh information in marathi)
- 5 छत्तीसगड राज्यातील जिल्हे (Districts of Chattisgarh)
- 6 छत्तीसगड पर्यटन स्थळे (Tourist places of Chattisgarh)
- 7 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- 8 सारांश (Summary)
छत्तीसगड राज्याची माहिती (Chattisgarh information in marathi)
राज्य | छत्तीसगड |
स्थापना | 1 नोव्हेंबर 2000 |
राजधानी | रायपूर |
सर्वात मोठे शहर | रायपूर |
जिल्हे | 32 |
भाषा | छत्तीसगढी, हिंदी |
लोकसंख्या | 2.94 कोटी (2020) |
क्षेत्रफळ | 135,192 चौकिमी |
1) सन 2000 मध्ये मध्य प्रदेश राज्याचे विभाजन होऊन नवीन राज्याची स्थापना झाली आणि त्याला नाव देण्यात आले छत्तीसगड.
2) छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर आहे.
3) छत्तीसगड राज्याची अधिकृत भाषा हिंदी आहे.
4) छत्तीसगड राज्याचा साक्षरता दर 71 टक्के आहे.
5) छत्तीसगड या राज्यांमध्ये 32 जिल्हे आहेत.
6) छत्तीसगड राज्यांमध्ये 90 विधानसभा आणि 5 राज्यसभांसाठी आणि 11 लोकसभा साठी जागा आहेत.
7) छत्तीसगड राज्याचा राज्य वृक्ष साल आहे. साल हा एक द्विबीजपत्री वृक्ष आहे. हा वृक्ष खूप कठोर आणि मजबूत असतो.
8) जंगली म्हैस हा छत्तीसगड राज्याचा राज्य प्राणी आहे. छत्तीसगडमध्ये यांची नोंदवली संख्या फक्त 8 आहे. त्यांना एका सुरक्षित परिसरामध्ये ठेवून त्यांचे प्रजनन चालू ठेवलेले आहे.
9) पहाडी मैना हा छत्तीसगड राज्याचा राज्य पक्षी आहे. पहाडी मैना चा रंग काळ्या रंगाचा असतो. पहाडी मैना हा सर्वाहारी आणि छोटा पक्षी आहे. हा पक्षी जंगलामध्ये आणि पानझडी वनामध्ये आढळतो.
10) छत्तीसगड राज्याची लोकसंख्या 2020 नुसार 2.94 कोटी आहे. लोकसंख्येनुसार हे भारतातील सतराव्या क्रमांकाचे राज्य आहे.
छत्तीसगड माहिती मराठी (Chattisgarh mahiti marathi)
11) छत्तीसगड राज्याची 20 टक्के लोकसंख्या शहरी भागांमध्ये राहते. आणि इतर ग्रामीण भागांमध्ये राहते.
12) छत्तीसगड राज्यात खनिज संसाधन खूप मोठ्या प्रमाणात आढळते, तरीही हे राज्य मागास आहे. परंतु येथे औद्योगिक विकास होत चालला आहे.
13) छत्तीसगड राज्यांमध्ये जरी महानदी, गोदावरी या सारख्या मोठ्या नदी असल्या तरीही येथील सिंचन व्यवस्था खूप कमकुवत आहे.
14) छत्तीसगड राज्यांमधील जास्त करून लोक हिंदी भाषा सहजपणे समजून घेतात. हिंदी भाषेची एक उपभाषा छत्तीसगढी सुद्धा येते बोलली जाते.
15) छत्तीसगड राज्याला प्राचीन काळामध्ये दक्षिण कोशल असे म्हटले जात होते.
16) रामाच्या काळामध्ये छत्तीसगड राज्या मधील वनांमध्ये ऋषिमुनींनी तपस्वी करण्यासाठी आश्रम बनवला होता, आणि तेथे ते निवास करत होते. वनवासाच्या काळामध्ये राम सुद्धा येथे आले होते असे मानले जाते.
17) 11 व्या शतकामध्ये छत्तीसगडच्या पूर्व भागामध्ये चोल शासन होते.
18) सन 1741 ते 1845 पर्यंत छत्तीसगड मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. त्यानंतर यावर ती इंग्रजांनी राज्य केले.
19) छत्तीसगड राज्याची सीमा सात राज्यांना मिळते. ते म्हणजे उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश.
20) पिकाच्या मुबलकतेमुळे राज्याला धान्याचा कटोरा म्हणतात.
छत्तीसगड राज्याविषयी माहिती (Chattisgarh information in marathi)
21) क्रूड टिनचे उत्पादन करणारे हे देशातील एकमेव राज्य आहे.
22) छत्तीसगड चे उच्च न्यायालय विलासपूर येथे आहे.
23) तांदूळ, मका, गहू, भुईमूग, कडधान्ये ही छत्तीसगढ राज्यातील प्रमुख पिके आहेत.
24) छत्तीसगड हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.
25) सीताबेगा लेणी ही भारतातील थिएटर आर्किटेक्चरचे सर्वात जुनी उदाहरण आहे, जे छत्तीसगडच्या रामगढ टेकडीवर वसलेले आहे.
26) छत्तीसगढ राज्याचा उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे, तर मध्य भाग हा सुपीक मैदान आहे.
27) छत्तीसगडमध्ये उष्णकटिबंधीय हवामान आहे.
28) अंबिकापूर, मेनपत, पेंद्र रोड, सामरी आणि जशपूर ही छत्तीसगड राज्यातील सर्वात थंड ठिकाणे आहेत.
29) छत्तीसगड राज्यातून एकूण 11 महामार्ग जातात ज्यांची लांबी 3,078 किमी आहे.
30) स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रायपूर आणि बिलासा देवी केवत विमानतळ बिलासपूर, ही दोन अनुसूचित व्यापारी सेवा विमानतळे छत्तीसगड राज्यात आहेत. जगदलपूर विमानतळ हे आणखी एक लहान विमानतळ आहे.
छत्तीसगड राज्याची माहिती मराठी (Chattisgarh information in marathi)
31) ही भारतातील 17 वी सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था आहे. 2017-18 मध्ये छत्तीसगडच्या अर्थव्यवस्थेने 6.7% वाढ नोंदवली आहे.
32) शेती हा या राज्याचा प्रमुख आर्थिक व्यवसाय म्हणून गणला जातो. बहुसंख्य शेतकरी अजूनही पारंपारिक पद्धतीचा अवलंब करत आहेत, परिणामी वाढीचा दर आणि उत्पादकता कमी आहे.
33) छत्तीसगडमध्ये फारच कमी नगदी पिके घेतली जातात, त्यामुळे तेलबिया आणि इतर नगदी पिकांकडे कृषी उत्पादनात विविधता आणण्याची गरज आहे.
34) पोलाद उद्योग हा छत्तीसगडमधील सर्वात मोठ्या जड उद्योगांपैकी एक आहे.
35) छत्तीसगड खनिजांनी समृद्ध आहे. देशाच्या एकूण सिमेंट उत्पादनापैकी 50% उत्पादन छत्तीसगड करते. लोह खनिज उत्पादनात हे तिसऱ्या आणि कथील उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. हे भारतातील एकमेव कथील धातूचे उत्पादन करणारे राज्य आहे.
36) पंथी, राऊत नाचा, पांडवानी, चैत्र, काकसर, सैला, खांब-स्वांग, भात्रा नाट, राहस, राय, माओ-पाता आणि सोवा या छत्तीसगडच्या अनेक देशी नृत्यशैली आहेत.
37) पांडवानी हा छत्तीसगडमध्ये प्रामुख्याने सादर केला जाणारा लोकगीत प्रकार आहे. यात महाभारतातील प्रमुख पात्र पांडवांची कथा दाखवण्यात येते.
38) छत्तीसगडच्या प्रमुख सणांमध्ये बस्तर दसरा / दुर्गा पूजा, बस्तर लोकोत्सव, मडई उत्सव, राजीम कुंभ मेळा आणि पखंजोर मेळा यांचा समावेश होतो.
39) अबुझमद पीस मॅरेथॉन ही नरेनपूरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे.
छत्तीसगड राज्यातील जिल्हे (Districts of Chattisgarh)
बालोद | बालोदा बाजार |
बलरामपूर | जगदलपूर |
बेमेतारा | विजापूर |
बिलासपूर | दंतेवाडा |
धमतरी | दुर्ग |
गारियाबंद | गौरेला |
जंजगीर | जशपूर |
कावर्धा | कांकेर |
कोंडागाव | कोरबा |
बैकुंठपूर | महासमुंद |
मुंगेली | नारायणपूर |
रायगड | रायपूर |
राजनांदगाव | सुकमा |
सूरजपूर | अंबिकापूर |
मोहला मानपूर | मनेंद्रगड |
सारंगढ | शक्ती |
छत्तीसगड पर्यटन स्थळे (Tourist places of Chattisgarh)
हे राज्य प्राचीन स्मारके, दुर्मिळ वन्यजीव, उत्कृष्ट कोरीवकाम केलेली मंदिरे, बौद्ध स्थळे, राजवाडे, धबधबे, लेणी, खडक चित्रे आणि डोंगर पठार यांनी परिपूर्ण आहे.
- इंद्रावती राष्ट्रीय उद्यान
- कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान
- गुरु घासी दास राष्ट्रीय उद्यान
- बर्नवापारा वन्यजीव अभयारण्य
- बिलासपुर
- चंपारण
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
छत्तीसगड ची राजधानी कोणती आहे?
रायपूर
छत्तीसगड ची लोकसंख्या किती आहे?
2.94 कोटी (2020)
छत्तीसगड ची स्थापना केव्हा झाली होती?
1 नोव्हेंबर 2000
छत्तीसगड चे मुख्यमंत्री कोण आहेत?
भूपेश बघेल (2021)
छत्तीसगड चे राज्यपाल कोण आहेत?
अनुसूया उईके (2021)
छत्तीसगड मध्ये किती जिल्हे आहेत?
32
छत्तीसगड राज्यातील शहरांची नावे?
रायपूर, बिलासपूर, दुर्ग, भिलाई.
सारांश (Summary)
आजच्या या पोस्टमध्ये आपण छत्तीसगड राज्याची माहिती (Chattisgarh information in marathi) जाणून घेतली. छत्तीसगड माहिती मराठी (Chattisgarh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.