महाराष्ट्र राज्याविषयी माहिती | Maharashtra information in marathi

Maharashtra information in marathi : भारताच्या पश्चिम भागामध्ये स्थित महाराष्ट्र एक राज्य आहे. याची गणना भारतातील सर्वात समृद्ध राज्यांमध्ये केली जाते. महाराष्ट्र हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. हा शब्द दोन अक्षर मिळून बनला आहे. महा आणि राष्ट्र याचा अर्थ आहे महान राष्ट्र. हे नाव येथील संतांची देण आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचावाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)

Maharashtra information in marathi
महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi)

महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi)

राज्यमहाराष्ट्र (Maharashtra)
स्थापना1 मे 1960
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
सर्वात मोठे शहरमुंबई
अधिकृत भाषामराठी
जिल्हे36
लोकसंख्या12.47 लाख (2021)
क्षेत्रफळ3,07,713 चौ. किमी
महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi)

1) महाराष्ट्र भारतातील एक राज्य आहे जे भारताच्या पश्चिमेला स्थित आहे. हे राज्य भारतातील सर्वात धनवान आणि समृद्ध राज्य म्हणून ओळखले जाते.

2) लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरे सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र आहे.

3) महाराष्ट्राची सीमा अरबी समुद्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश यांना लागते. मुंबई भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे.

4) महाराष्ट्राला पहिल्यांदा बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि नंतर बॉम्बे स्टेट या नावाने सुद्धा ओळखत होते.

5) कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराची उंची 1646 मीटर आहे.

6) महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. ज्याचा जीडीपी भारतामध्ये सर्वात जास्त आहे.

7) गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.

8) भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी चार महाराष्ट्रामध्ये आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराची सुरुवात बालाजी बाजीराव यांनी केली होती.

9) महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या रूपामध्ये ओळखले जाते. सम्राट अशोकाच्या काळात याला राष्ट्रीय आणि त्यानंतर महान राष्ट्र या रुपात ओळखले जाते.

10) 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस सुद्धा साजरा केला जातो.

महाराष्ट्र राज्य माहिती मराठी (Maharashtra rajya mahiti marathi)

11) महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईला भारताची वित्तीय राजधानी अस सुद्धा म्हणतात.

12) महाराष्ट्र मध्ये कोळसा, लोह, मॅगनीज, बॉक्साईट, नैसर्गिक गॅस इत्यादी खनिजे सापडतात.

13) दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी, होळी व गणेशोत्सव हे महाराष्ट्रातील प्रमुख सण आहेत.

14) अजिंठा, वेरूळ, कनेरी या महाराष्ट्रातील काही गुंफा आहेत.

15) महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली होती. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे.

16) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,72,972 होती. महाराष्ट्रातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप आदर करतात.

17) आपल्या देशातील पहिला चित्रपट महाराष्ट्रात बनवला गेला होता.

18) दादासाहेब फाळके यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा भारतातील पहिला चित्रपट बनवला होता.

19) महाराष्ट्र भारतातील एकमेव राज्य आहे जेथे दोन मेट्रो शहरे आहेत एक मुंबई आणि दुसरी पुणे.

20) महाराष्ट्र मध्ये एक रेल्वे स्टेशन आहे ज्याचा अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि अर्धा भाग गुजरातमध्ये आहे. त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन.

महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती (Maharashtra information in marathi)

21) महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.3% आहे.

22) महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत.

23) महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदासंघ आहेत.

24) महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदरसंघ आहेत.

25) यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.

26) John Colville हे महाराष्ट्राचे पहिले गव्हर्नर होते.

27) महाराष्ट्राचा राष्ट्रीय खेळ कबड्डी आहे.

28) महाराष्ट्राचे राष्ट्रीय लोकनृत्य लावणी आहे.

29) महाराष्ट्राचा राज्य पक्षी हिरवा कबूतर आहे.

30) महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे.

महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra mahiti marathi)

31) महाराष्ट्राचा राष्ट्रीय वृक्ष आंबा आहे.

32) मराठी आणि कोकणी या भाषा महाराष्ट्रापासून विकसित झाल्या आहेत.

33) मुंबईमध्ये जवळजवळ 1.8 करोड लोक राहतात.

34) महाराष्ट्राची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी मुंबई आहे.

35) महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथे कोणत्याही घराला दरवाजे नाहीत. कारण येथे अशी मान्यता आहे की येथे कोणीही चोरी करू शकत नाही. आणि जर कोणी चोरी केली तर येथील शनि देव त्याला माफ करणार नाही.

37) महाराष्ट्रातील लोणार सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे.

38) भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या दरम्यान  गेली होती.

39) महाराष्ट्र मध्ये जवळजवळ 16 टक्के क्षेत्र वनक्षेत्र आहे.

40) देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा आहे.

माझा महाराष्ट्र माहिती मराठी (Maharashtra information in marathi)

41) महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे.

42) महारष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 कि.मी. ची किनारपट्टी आहे.

43) महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास “संतांची भूमी” असेदेखील म्हटले जाते.

44) अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू याच महाराष्ट्रातून तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेटपटू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.

45) महाराष्ट्रातील विविध स्थळांचा – नदी, पर्वत, स्थळ इ. रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो.

46) रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग धंदे आहेत.

47) आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत.

48) शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू ही महाराष्ट्रातील महत्वाची नगदी पिके आहेत.

49) भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई हे आहे.

50) महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेअर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.

51) कोळसानिर्मिती व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान

महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे 2134 मी. (अंदाजे 7000 फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी 50-80 कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.

महाराष्ट्रातील प्रशासन

भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत.

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते. महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत 67 प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत 19 प्रतिनिधी तर लोकसभेत 48 प्रतिनिधी असतात.

महाराष्ट्रातील प्रदेश

भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राचे पाच प्रदेश पडतात:

 • विदर्भ – (नागपूर विभाग आणि अमरावती विभाग)
 • मराठवाडा – (औरंगाबाद विभाग)
 • खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग – (नाशिक विभाग)
 • कोकण – (कोकण विभाग)
 • पश्चिम महाराष्ट्र – (पुणे विभाग)

महाराष्ट्रातील विभाग आणि जिल्हे

महाराष्ट्राचे एकूण सहा विभाग पडतात. ते पुढील प्रमाणे:

 1. अमरावती विभाग (विदर्भ): अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम
 2. औरंगाबाद विभाग (मराठवाडा): औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी.
 3. कोकण विभाग (कोकण): मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
 4. नागपूर विभाग (विदर्भ): नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
 5. नाशिक विभाग (खानदेश): नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर.
 6. पुणे विभाग (पश्चिम महाराष्ट्र): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

महाराष्ट्रातील लोकजीवन

महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ 11 देश आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र राज्यात 80% हिंदू, 6% बौद्ध, 12% मुस्लिम, 1% जैन व 1% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणात शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.

महाराष्ट्रातील संस्कृती

महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत.

मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति – पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात.

मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.

भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.

दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे 2021?

उत्तर : 12.47 कोटी

महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर : 1 मे 1960

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

उत्तर : शेकरू

निष्कर्ष :

हा लेख जरूर वाचावाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी माहिती (Maharashtra information in marathi) जाणून घेतली. महाराष्ट्र राज्य माहिती मराठी (Maharashtra rajya mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *