राजस्थान राज्याची माहिती | Rajasthan information in marathi

Rajasthan information in marathi : राज्यस्थान भारतातील एक राज्य आहे. गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारी जयपूर ही राजस्थान ची राजधानी आहे. अरवली पर्वतरांगेमध्ये स्थित माउंट आबू राजस्थान मधील एकमेव हिलस्टेशन आहे. राजस्थानचा पश्‍चिम उत्तर भाग खूप शुष्क आहे. राजस्थान जगातील अनेक देशांपेक्षा मोठा आहे. जसे की इंग्लंडच्या दुप्पट, इजराइल पेक्षा 17 पटीने मोठे राजस्थान आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi) जाणून घेणार आहोत.

Rajasthan information in marathi
राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi)

Contents

राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi)

राज्यराजस्थान
राजधानीजयपूर
स्थापना30 मार्च 1949
भाषाहिंदी, राजस्थानी, गुजराती
क्षेत्रफळ342,239 चौकिमी
लोकसंख्या 68,548,437 (2011)
जिल्हे33
राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi)

1) राजस्थानची स्थापना 30 मार्च 1949 ला झाली होती.

2) राजस्थान चे क्षेत्रफळ तीन लाख 42 हजार 239 चौकिमी आहे.

3) राजस्थानच्या लोकसभेत 25 आणि राज्यसभेत 10 जागा आहेत.

4) राजस्थानची राजकीय भाषा हिंदी यांनी राजस्थानी आहे. याबरोबरच हे लोक सिंधी, पंजाबी, संस्कृत आणि गुजराती या भाषेचा वापर करतात.

5) राजस्थान मध्ये 33 जिल्हे आहेत.

6) राजस्थानचा राष्ट्रीय प्राणी उंट आणि चिंकारा आहे.

7) राज्यस्थान चा राष्ट्रीय पक्षी माळढोक आहे.

8) राजस्थानचे राष्ट्रीय फूल रोहिरा आहे.

9) राजस्थानचे राष्ट्रीय वृक्ष खेजरी आहे.

10) राजस्थानचा राष्ट्रीय खेळ बास्केट बॉल आहे.

राजस्थान माहिती मराठी (Rajasthan mahiti marathi)

11) ज्वारी, मका, हरबरा व गहू ही राजस्थान मधील प्रमुख धान्य पिके, तर ऊस, तेल व तंबाखू ही येथील प्रमुख नगदी पिके आहेत.

12) व्यास, चंबळ, बनास, लूनी या राजस्थान मधील प्रमुख नद्या आहेत.

13) राजस्थान मधील रस्त्यांची एकूण लांबी 1 लाख 86 हजार आठशे सहा किलोमीटर आहे.

14) राजस्थान देशातील सर्वात मोठे तिसरे मीठ उत्पादक राज्य आहे.

15) लोकसंख्येनुसार राजस्थानचा भारतात सातवा क्रमांक लागतो. 

16) राज्यस्थान मुख्यता कृषी व पशु पालन प्राधान्य राज्य आहे. अन्नधान्य आणि भाज्या येथून निर्यात केल्या जातात.

17) राजस्थानच्या पश्चिम उत्तर सीमेला पाकिस्तान उत्तर आणि उत्तर-पूर्वेला पंजाब आणि हरियाणा. पूर्वेला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि दक्षिणेला गुजरात राज्य लागते.

18) सातव्या ते अकराव्या शतकांमध्ये येथे अनेक राज वंवशाचा उदय झाला होता.

19) राजस्थान मध्ये सर्वात खास सण मार्च च्या शेवटी आणि एप्रिल च्या सुरुवातीला येणारा सण गणगौर खूप प्रसिद्ध आहे.

20) राजस्थानचे प्राकृतिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक पर्यटनासाठी येतात.

राजस्थान राज्याची माहिती मराठी (Rajasthan information in marathi)

21) राजस्थान किल्ला, मंदिरे यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

22) राजस्थान आपल्या पारंपारिक कला आणि रंगीत कला साठी प्रसिद्ध आहे.

23) राजस्थान मध्ये अजमेर, अलवर, भरतपुर आणि जयपुर ही सर्वात मोठी शहरे आहेत.

24) घुमर हे राजस्थानचे लोकनृत्य प्रसिद्ध आहे.

25) राजस्थान चे जुने नाव राजपुताना असे होते.

26) राजस्थान हे राज्य आपल्या प्राचीन इतिहासाची व ऐतिहासिक किल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.

27) क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

28) राजस्थानची साक्षरता 67.06 टक्के एवढी आहे.

29) उष्ण वाळवंट व कमी पाऊस यामुळे राजस्थान येथे शेतीचे प्रमाण कमी आहे.

30) अरवली पर्वत राजस्थान राज्याच्या आग्नेय ते नैर्ऋत्य दिशांना पसरलेला आहे व त्याची एकूण लांबी 850 किमी इतकी आहे. अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत.

राजस्थान माहिती (Rajasthan Mahiti)

31) अबू डोंगरावरील गुरु शिखर हे अरवली पर्वताचे राजस्थानमधील सर्वात उंच शिखर आहे.

32) भरतपूर येथील राष्ट्रीय उद्यान हे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे.

33) राजस्थान मध्ये कोरडे वाळवंट, शुष्क काटेरी जंगल, गवताळ वाखर, शुष्क जंगल अशी विविध प्रकारची वने आढळतात.  

34) राजस्थानमध्ये प्रामुख्याने शुष्क वातावरणाला सरावणारे वन्यजीव दिसून येतात. त्यात चिंकारा, काळवीट, रानगाढव व भारतीय लांडगा हे प्राणी आहेत.

35) माळढोक हा राजस्थानचा राज्यपक्षी असून अतिशय दुर्मिळ आहे.

36) जैसलमेर मधील मरु राष्ट्रीय उद्यान हे भारतातील आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

37) तेल बीयांच्या व वनस्पती तेल उत्पादनात राजस्थानचा भारतात पहिला क्रमांक आहे.

38) अलिकडेच राजस्थानने माहिती तंत्रज्ञान उद्योगातही भरारी घेतली असून जयपूरमध्ये उत्तर भारतातील सर्वात मोठे आय.टी पार्क विकसित झाले आहे.

राजस्थान चा इतिहास (History of Rajasthan in marathi)

राजस्थान हे राज्य प्राचीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. पुरातन सिंधू संस्कृती ही राजस्थानच्या काही भागात विकसित झाली होती. सिंधू संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा पाया समजली जाते. या संस्कृतीतील काही महत्त्वाची शहरे राजस्थानमध्ये होती. सिंधू नदीची लुप्त झालेली प्रमुख उपनदी सरस्वती राजस्थानच्या मधोमध वाहत होती. आजही अनेक पुरातत्त्वीय खुणा राजस्थानच्या या भागात सापडतात.

डांगी, बिश्नोई, रजपूत, यादव, जाट, भील, गुज्जर, मीना व अनेक आदिवासी समूह हे राजस्थानमधील निवासी आहेत. त्यांचा आजच्या राजस्थानच्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. राजस्थानचा इतिहास हा राजेरजवाडे, लढाया, वीरस्त्रिया, धार्मिक संत महात्मे यांनी अजरामर केला आहे.

राजस्थान पाहाण्यासारखी ठिकाणे (Tourist places in Rajasthan in Marathi)

भौगोलिक विविधता, रोमांचक इतिहास व ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सौंदर्य व विविधरंगी संस्कृती यामुळे राजस्थान पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षिक करते. पर्यटकांमध्ये देशी तसेच विदेशी पर्यटकांचा मोठा समावेश असतो. भारतात येणार्‍या दर तीन विदेशी पर्यटकांपैकी एक पर्यटक हा राजस्थानात जाण्यास उत्सुक असतो. जयपूर, उदयपूर, जोधपूर, जेसलमेर, अजमेर, बिकानेर ही ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहे.

जयपूर हे पर्यटकांचे सर्वाधिक आवडते शहर आहे. जयपूर शहराला येथील इमारतींच्या रंगांमुळे गुलाबी शहर असे म्हणतात. जयपूर शहरातील पर्यटन स्थळांमध्ये जंतर-मंतर, हवा महल, नियोजित जयपूर शहर व अंबरचा किल्ला ही प्रसिद्ध स्थळे आहेत. उदयपूर येथील तळ्यातील महाल जगप्रसिद्ध आहे. उदयपूर शहराजवळील चित्तोडगडचा किल्ला पहाण्याजोगा आहे. हा किल्ला क्षेत्रफळाने अशियातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो.

जोधपूर शहरातील मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेस ही पहाण्याजोगी स्थळे आहेत. जोधपूर जवळील मंढोर येथे पूर्व मध्ययुगीन देवळे आहेत. जेसलमेर हे वाळवंटातील एक ऐतिहासिक शहर आहे. जेसलमेरचा किल्ला, थरचे वाळवंट व येथील मध्ययुगीन हवेल्या पर्यटकांना आकर्षित करतात.

राजस्थानमध्ये जैन धर्मीयांची अनेक भक्तिस्थळे आहेत. राणकपूर, भिलवाडा, जेसलमेर, जोधपूर, माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर तसेच सिरोही जिल्ह्यातील अनेक मंदिरांना दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. अजमेर येथील दर्ग्यास भेट देण्यास केवळ मुसलमानच नव्हे तर हिंदू धर्मीयही सुद्धा येतात. तसेच अजमेरजवळील पुष्कर या ठिकाणचा पुष्कर मेळा पाहण्यास देश-विदेशातून अनेक लोक येतात.

रणथंबोर, सारिस्का, चित्तोडगड, ही अरवलीच्या सानिध्यातील अभयारण्यांना भेट देण्यास पर्यटक उत्सुक असतात.

राजस्थानमधील जिल्हे (Districts of Rajasthan in Marathi)

राजस्थान राज्यात 33 जिल्हे आहेत जे 7 विभागात विभागले आहेत.

  • अजमेर विभाग: अजमेर , भिलवाडा , टोंक , नागौर.
  • भरतपूर विभाग: भरतपुर , धोलपुर , करौली , सवाई माधोपुर.
  • बिकानेर विभाग: बिकानेर , चुरू , गंगानगर , हनुमानगढ.
  • जयपूर विभाग: जयपुर , अलवार , झुनझुनुन , दौसा , सिकर
  • जोधपूर विभाग: जोधपुर , जालोर , जेसलमेर , पाली , सिरोही , बारमेर
  • कोटा विभाग: बरान , बुंदी , कोटा , झालावाड
  • उदयपूर विभाग: उदयपुर , चित्तोडगढ , डुंगरपुर, बांसवाडा, रजसामंड

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

राजस्थानातील एक शहर

जयपूर, जोधपूर, अजमेर, भरतपूर, बिकानेर, उदयपूर

राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात?

राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आहेत.

राजस्थान मध्ये शेतीवर मालकी असणाऱ्या जातींना काय म्हणतात?

राजस्थान मध्ये शेतीवर मालकी असणाऱ्या जातींना जाट जाती म्हणतात.

भारतातील राजस्थान राज्य शेजारी कोणता देश आहे

राजस्थान हे पाकिस्तान सिमेला लागून आहे.

राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला म्हणतात?

राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थरचे वाळवंट म्हणतात.

राजस्थान मधील सर्वात मोठे वाळवंट कोणते

राजस्थान मधील सर्वात मोठे वाळवंट थरचे वाळवंट आहे.

थरचे वाळवंट कोठे आहे?

थरचे वाळवंट राजस्थान मध्ये आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण राजस्थान राज्याची माहिती (Rajasthan information in marathi) जाणून घेतली. राजस्थान माहिती मराठी (Rajasthan mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *