ग्रीस देशाची माहिती | Greece information in marathi

Greece information in marathi : ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे. मित्रांनो तुम्ही शाळेमध्ये असताना “हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे” असे अनेक वेळा ऐकलं असेल. याच ग्रीक भाषेला यूनानी भाषा किंवा ग्रीस भाषा सुद्धा म्हणतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण ग्रीस देशाची माहिती (Greece information in marathi) जाणून घेणार आहोत.

प्राचीन इतिहास लाभलेला हा देश, लोकशाही, ऑलिंपिक खेळ, पाश्चिमात्य नाट्यकला व तत्त्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो. यासोबतच तेथील गणितज्ञ, इतिहासकार, महान योद्धे, ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे.

ग्रीस देशाची माहिती (Greece information in marathi)

देशग्रीस
राजधानीअथेन्स
सर्वात मोठे शहरअथेन्स
अधिकृत भाषाग्रीक
लोकसंख्या1.07 कोटी (2020)
क्षेत्रफळ131,957 चौकिमी
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आतंरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+30
ग्रीस देशाची माहिती (Greece information in marathi)

1) ग्रीस या देशाचे नाव हॅलेनिक गणराज्य आहे. याला हेलास असे सुद्धा म्हणतात. जो ग्रीस साठी मूळ शब्द आहे.

2) ग्रीस हा जगातील पहिला लोकशाही देश आहे.

3) ग्रीस या देशामध्ये सूर्य 250 दिवसांपेक्षा अधिक दिवस दिसून येतो.

4) ग्रीस मध्ये दोन हजार पेक्षा जास्त बेट आहेत.

5) ग्रीसमधील एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोक ग्रीसची राजधानी अथेन्स येथे राहतात.

6) इकारिया ग्रीस मधील एक असं क्षेत्र आहे जेथे लोकांचे आयुष्य सर्वात जास्त आहे.

7) ग्रीस युरोपमधील वन्यजीवांच्या मानाने सर्वात समृद्ध देश आहे.

8) अलेक्झांडर द ग्रेट हा सुद्धा एक ग्रीक होता.

9) या देशामध्ये 400 पेक्षा जास्त पारंपारिक नृत्य आहेत.

10) ग्रीस मध्ये जन्मदिवस साजरा करण्याऐवजी नाव ठेवलेला दिवस साजरा केला जातो.

ग्रीस देश माहिती मराठी (Greece Desh mahiti marathi)

11) ऑलंपिक खेळाची सुरुवात ग्रीस मध्ये झाली होती.

12) चित्रपटाच्या थिएटरचा शोध सुद्धा ग्रीस या देशांमध्ये लागला होता.

13) ग्रीस मध्ये दरवर्षी जवळजवळ सोळा करोड पेक्षा जास्त पर्यटक येतात. जे की येथील लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत.

14) ग्रीसमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कायद्याने मतदान करण्याचा अधिकार आहे. 

15) जगामध्ये संगमरवर उत्पादनात जवळजवळ सात टक्के हिस्सा ग्रीसचा आहे.

16) 1950 च्या दशकामध्ये जवळजवळ तीस टक्के ग्रीक  वयस्क लोक वाचू आणि लिहू शकत होते. आता साक्षरता दर 95 टक्के पेक्षा जास्त आहे.

17) ग्रीस या देशांमध्ये जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त पुरातात्विक संग्रहालये आहेत.

18) प्राचीन ग्रीक हा अनेक लहान मोठ्या राज्यांनी बनलेला होता. सर्व राज्यांमध्ये सरकार आणि नियम वेगळे होते. परंतु प्रत्येक राज्यामध्ये संस्कृती एकसारखीच होती.

19) भारतावर हल्ला करणारा सिकंदर सुद्धा ग्रीसमधील मकदुनिया राज्याचा राजा होता.

20) प्राचीन ग्रीसमध्ये गणित, विज्ञान आणि कला यांचा खूप विकास झाला होता.

प्राचीन ग्रीस माहिती (Greece information in marathi)

21) प्राचीन ग्रीस मध्ये धर्मासाठी कोणताही शब्द नाही.

22) School हा शब्द ग्रीक भाषेमधून आला आहे. ज्याचा अर्थ फ्री वेळ आहे.

23) प्राचीन ग्रीक मध्ये कोणाच्याही अंगावर सफरचंद फेकणे प्रेमाची निशाणी मानले जात होते.

24) 1976 पर्यंत प्राचीन ग्रीक मध्ये युनान ही मुख्य भाषा होती.

25) सन 2020 मध्ये ग्रीस ची लोकसंख्या जवळ जवळ 1.07 कोटी (2020) होती.

26) ग्रीस देशाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर अथेन्स आहे.

27) ग्रीस मध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ग्रीक आहे.

28) ग्रीसच्या महत्वपूर्ण उद्योगांमध्ये सेवाक्षेत्र, कृषी आणि पर्यटन सामील आहे.

29) ग्रीस मधील सर्वात उंच शिखर माउंट ऑलिंपस असून त्याची 2917 मीटर ( 9570 फूट) इतकी उंची आहे.

30) प्राचीन ग्रीक लोक नग्न होऊन अभ्यास करत होते.

ग्रीस देश माहिती मराठी (Greece Desh mahiti marathi)

31) ग्रीस हा विकसित देश असून 1981 पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे.

32) भौगोलिक दृष्ट्या ग्रीस हा बाल्कन द्वीपकल्पाचा दक्षिण टोकाचा भाग आहे.

33) ग्रीसच्या बहुतांशी भाग हा डोंगराळ असून देशाचा 80 टक्के भूभाग डोंगराळ प्रदेशाने व्यापला आहे.

34) ग्रीसचे हवामान मुख्यत्वे भूमध्य हवामान प्रकारात गणण्यात येते. त्यामुळे अतिशय कोरडा उन्हाळा व ओला हिवाळा हे येथील वैशिट्य आहे.

35) ग्रीस हा युरोपियन संघातील मुख्य देश असला तरी ग्रीसची अर्थव्यवस्था ही पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत कमकुवत आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

प्राचीन ग्रीक नगर राज्यात कोणती लोकशाही होती?

उत्तर : जगातील पहिली लोकशाही अथेन्समध्ये होती. पाचव्या शतकाच्या आसपास एथेनियन लोकशाही विकसित झाली होती.

ग्रीस ची राजधानी कोणती आहे?

उत्तर :अथेन्स ग्रीस ची राजधानी आहे.

ग्रीस ची लोकसंख्या किती आहे?

उत्तर : 1.07 कोटी (2020)

ओईकोनोमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ कोणता?

उत्तर :अर्थव्यवस्था

ग्रीक भाषेत शिक्षकाला काय म्हणतात?

उत्तर : Δάσκαλος (Dáskalos)

लोकशाही हा शब्द कोणत्या ग्रीक शब्दापासून आला आहे?

उत्तर : डिमॉस + क्रॅटोस (Demos + Kratos)

ग्रीस चे चलन कोणते?

उत्तर : युरो (EUR)

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ग्रीस देशाची माहिती (Greece information in marathi) जाणून घेतली. ग्रीस देश माहिती मराठी (Greece Desh mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Comment