न्यूझीलंड देशाची माहिती | New zealand information in Marathi

New zealand information in Marathi : न्यूझीलंड हा एक दक्षिण – पश्चिमी पॅसिफिक महासागरावर वसलेला एक द्वीप देश आहे. हा मुख्यपणे दोन बीट उत्तरी बेटे आणि दक्षिण बेटे आणि 700 अन्य छोट्या छोट्या बेटानी मिळून बनला आहे. इंग्लिश ही ह्या देशाची मुख्य भाषा आहे. आपण भारतीय या देशाला जास्तकरून क्रिकेटच्या कारणाने ओळखतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi) जाणून घेणार आहोत.

New zealand information in Marathi
न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi)

न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi)

देशन्यूझीलंड
राजधानी वेलिंग्टन
सर्वात मोठे शहरऑकलंड
अधिकृत भाषाइंग्लिश, माओरी
लोकसंख्या50.8 लाख (2020)
क्षेत्रफळ268,021 चौकिमी
राष्ट्रीय चलनन्यूझीलंड डॉलर
आतंरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+64
न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi)

न्यूझीलंड विषयी काही रोचक तथ्य (Facts about New Zealand in Marathi):

1) न्यूझीलंड ची राजधानी वेलिंग्टन ही आहे. आणि अधिकृत भाषा इंग्लिश आणि माओरी ही आहे.

2) न्यूझीलंड ची लोकसंख्या 50 लाख आहे. आणि ही लोकसंख्या 2,68,021 चौकीमी मध्ये पसरलेली आहे.

3) न्यूझीलंड हा असा पहिला देश आहे ज्याने महिलांना पहिल्यांदा मतदान करण्याचा अधिकार दिला होता. न्यूझीलंड मध्ये 1893 मध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला होता.

4) सर्वात जलद कोणताही बिझनेस सुरू करण्यामध्ये न्यूझीलंड पहिल्या नंबरवर येतो. येथे कोणीही बिझनेस सुरु करू शकतो तेही फक्त एका दिवसात.

5) जवळजवळ सर्वच देशांमध्ये वैद्यकीय औषधांची जाहिरात करणे मनाई आहे परंतु न्यूझीलंड आणि अमेरिकेमध्ये अस नाही.

6) न्यूझीलंड दोन मोठ्या आणि अनेक छोट्या बेटानी मिळून बनला आहे. न्यूझीलंड देशाचे क्षेत्रफळ जवळजवळ दोन लाख 68 हजार वर्ग किलोमीटर आहे जे आपल्या आंध्र प्रदेश राज्यापेक्षा थोडसं कमी आहे.

7) न्यूझीलंडला किवी पक्षांचा देश म्हणून सुद्धा ओळखल जातो. किवी येथील पक्षी आहे जो उडू शकत नाही. हा न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणून सुद्धा ओळखला जातो.  तुम्हाला सांगू इच्छितो की किवी हे एक फळ सुद्धा आहे.

8) न्यूझीलंड मध्ये आपल्याला साप बिल्कुल पाहायला मिळत नाहीत. जर कोणत्याही व्यक्तीला साप पाहायला मिळाला तर त्याला पोलिस मध्ये रिपोर्ट लिहावी लागते.

9) न्यूझीलंड जगातील पाच सर्वात कमी भ्रष्टाचारी देशामध्ये येतो. बाकीचे चार देश हे डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे हे आहेत.

10) सन 2006 मध्ये ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने Ebay वेबसाईटवर न्यूझीलंडला विकण्यासाठी बोली लावली होती. ही बोली 0.01 डॉलर पासून सुरू झाली होती आणि 300 डॉलर पर्यंत पोहोचली होती. जेव्हा eBay अधिकाऱ्यांना याविषयी कळल तेव्हा त्यांनी त्या व्यक्तीच अकाउंट लगेच बंद केलं.

न्यूझीलंड माहिती मराठी (New zealand mahiti Marathi)

11) न्यूझीलंडमध्ये ख्रिसमस, गुड फ्रायडे, आणि ईस्टर या सनानबद्दल टीव्ही वर जाहिरात दाखवण्यावर बंदी आहे.

12) जगामध्ये पुरुष आणि महिलांच्या पगारामध्ये सर्वात कमी अंतर न्यूझीलंडमध्ये आहे. या देशांमध्ये हे अंतर फक्त पाच टक्के पर्यंत आहे.

13. पहिल्या महायुद्धात न्यूझीलंडने एक लाख सैनिकांची एक सेना तयार केली होती. ही त्यावेळेस एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के होती.

14) पेंग्विन (Penguin) च्या सर्वात जास्त प्रजाती न्यूझीलंड मध्ये पाहायला मिळतात. पेंग्विन चा सर्वात जुना अवशेष सुद्धा येथेच पाहायला मिळाला होता. जो 6 कोटी 20 लाख वर्ष जुना आहे.

15) न्यूझीलंड मधील ब्ल्यू लेक हे सरोवर जगातील सर्वात स्वच्छ सरोवर आहे. ज्याच्या 85 मीटर तळात सुद्धा आपण डोळ्याने पाहू शकतो.

16) आज पासून 800 वर्षे पहिले न्यूझीलंड ची माहिती मेओरी लोकांना सोडून इतर कोणालाही नव्हती.

17) न्यूझीलंडमधील कोणतीही जागा समुद्र पासून 128 किलोमीटर पेक्षा जास्त लांब नाही.

18) न्यूझीलंडमधील वेलिंग्टन हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणारे शहर आहे.

19) न्यूझीलंड मध्ये राहणाऱ्या एकूण जीवापैकी केवळ पाच टक्के लोकसंख्या ही मानवाची आहे. आणि बाकीचे सर्वाधिक पशुपक्षी आणि त्यांच्या प्रजाती न्यूझीलंडमध्ये निवास करतात.

20) न्यूझीलंडमध्ये मुले वयाच्या पंधराव्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करू शकतात.

न्यूझीलंड विषयी माहिती (New zealand information in Marathi)

21) Kea हा न्यूझीलंडमध्ये पाहिला जाणारा एक पक्षी आहे. याला पहाडी जोकर असं सुद्धा म्हणतात.

22) न्यूझीलंडमध्ये दोन राष्ट्रगीत आहेत. ज्यांचं नाव क्रमाने  “God Save the Queen” आणि दुसरं God Defend New Zealand हे आहे.

23) न्यूझीलंडमधील Waipoua वृक्ष हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. Waipoua वृक्षाची आयुमर्यादा एक हजार वर्षापासून पंधराशे वर्षापर्यंत आहे.

24) न्यूझीलंड दुसऱ्या देशात पासून तेल, मशिनरी, वाहन आणि वस्त्र आयात करतो.

25) न्यूझीलंड आपला अधिकाधिक माल चीन, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त राज्य अमेरिका मधून आयात करतो.

26) न्यूझीलंड हा जगातील एक प्रगत व समृद्ध देश असून येथील मानवी विकास निर्देशांक जगात पाचव्या स्थानावर आहे. न्युझीलंड मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.

27) क्रिकेट, रग्बी, फुटबॉल व नेटबॉल हे न्यूझीलंडमधील लोकप्रिय खेळ असून रग्बी युनियन, रग्बी लीग व क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघांना यश लाभले आहे.

28) तौमटावहकतांगीहंगाकोआउओओटामातेतुरीपुकाकापीकिमाँगाहोरोनुकूपोकाईवेन्युअकिताणाताहु हे न्यूझीलंडच्या पूर्व किनारपट्टीवरील एका शहराचे नाव आहे.

29) न्यूझीलंडचा इतिहास काही शंभर वर्षांचा आहे . या देशात फक्त 800 वर्षांपूर्वी पहिल्या मानवांनी वास्तव्य केले होते.

30) न्यूझीलंडमध्ये प्रति व्यक्ती 9 मेंढ्या आहेत, ज्यामुळे ते जगातील सर्वाधिक प्रमाण आहे.

न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi)

31) न्यूझीलंडने 2012 मध्ये एल्व्हिश भाषेत हवामानाचा पहिला अहवाल प्रसारित केला होता.

32) वटवाघूळ हा न्यूझीलंड देशातील एकमेव मूळ सस्तन प्राणी आहे.

33) जगातील सर्वात उंच रहिवासी रस्त्याला बाल्डविन स्ट्रीट म्हणतात आणि ते डुनेडिनमध्ये आहे.

34) चिली आणि अर्जेंटिना नंतर न्यूझीलंड हा अंटार्क्टिकाचा 3 रा सर्वात जवळचा देश आहे.

35) न्यूझीलंडकडे जगातील 9 व्या क्रमांकाची सर्वात लांब किनारपट्टी आहे, ज्याची लांबी 15,134 किमी आहे.

36) माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला माणूस सर एडमंड हिलरी हा मूळचा न्यूझीलंडचा होता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

न्यूझीलंड ची राजधानी कोणती आहे?

न्यूझीलंड ची राजधानी वेलिंग्टन आहे.

न्यूझीलंड ची लोकसंख्या किती आहे?

न्यूझीलंड ची लोकसंख्या 50.8 लाख (2020) आहे.

न्यूझीलंड चे राष्ट्रीय चलन काय आहे?

न्यूझीलंड चे राष्ट्रीय चलन न्यूझीलंड डॉलर आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण न्यूझीलंड देशाची माहिती (New zealand information in Marathi) जाणून घेतली. न्यूझीलंड माहिती मराठी (New zealand mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *