North Korea information in marathi : मित्रांनो उत्तर कोरिया मध्ये असे काही नियम आहेत जे जगामध्ये कोठेही नाहीत. उत्तर कोरिया आपल्या शासन पद्धतीच्या कारणाने अनेक वेळेस वादात असतो. या देशांमध्ये आपण ना आपल्या मर्जीने केस कापू शकतो ना इंटरनेट चालवू शकतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तर कोरिया देशाची माहिती (North Korea information in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
उत्तर कोरिया देशाची माहिती (North Korea information in marathi)
देश | उत्तर कोरिया |
राजधानी | प्यॉंगयांग |
सर्वात मोठे शहर | प्यॉंगयांग |
अधिकृत भाषा | कोरियन |
लोकसंख्या | 2.5 कोटी (2020) |
क्षेत्रफळ | 120,540 चौकिमी |
राष्ट्रीय चलन | North Korean won |
आतंरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +850 |
1) किम जोंग उन हा उत्तर कोरिया चा सर्वात मोठा नेता आणि क्रूर शासक आहे. त्याने त्याच्या काकांना नग्न करून 120 भुकेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात फेकून दिले होते.
2) उत्तर कोरिया च्या मुलांनी इतिहासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त आपल्या देशाबद्दलच आणि किम जोंग आणि त्याच्या कथा विषयी वाचावं असा नियम आहे.
3) जर तुम्ही बायबल वाचताना उत्तर कोरिया मध्ये सापडला तर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते.
4) उत्तर कोरिया मधील सुमारे 99 टक्के लोक सुशिक्षित आहेत. उत्तर कोरियातील ही सर्वात चांगली गोष्ट म्हणता येईल.
5) उत्तर कोरिया मधील लोकांना आठवड्यातून सहा दिवस काम करावेच लागते. आणि त्याशिवाय एका दिवसाचे स्वयंसेवकाचे सुद्धा काम करावे लागते.
6) उत्तर कोरिया मधील कॅलेंडर हे माजी हुकूमशहा किम इल-सुंग याच्या जन्मतारखेवर आधारित आहे.
7) उत्तर कोरियात आपण स्वतःच्या मर्जीने केस कापू शकत नाही. महिलांसाठी 28 आणि पुरुषांसाठी 10 केशरचना येथे सांगितल्या आहेत.
8) उत्तर कोरिया हा एकमेव नेक्रोराईस देश आहे, याचा अर्थ तो अजूनही मृत शासकाच्या अधिकाराखाली कार्यरत आहे.
9) उत्तर कोरिया मध्ये 8 जुलै ते 17 डिसेंबर यामध्ये कोणीही आनंद साजरा करू शकत नाही.
10) उत्तर कोरिया या देशात इंटरनेट सेवा उपलब्ध नाही. येथे फक्त व्हीआयपी लोकांनाच इंटरनेट वापरण्याचा अधिकार आहे. या देशाची स्वतःची रेड स्टार नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
उत्तर कोरिया माहिती मराठी (Uttar Korea mahiti Marathi)
11) उत्तर कोरिया मधील चौकांमध्ये ट्रॅफिक लाईट आणि सिग्नल नाहीत. येथील पोलीस त्यांच्या हाव भावांनी वाहनांवर नियंत्रण ठेवतात.
12) उत्तर कोरिया मध्ये जर कोणी गुन्हा केला तर त्याला आणि त्याच्या पुढील तीन पिढ्यांना ही शिक्षा होते.
13) उत्तर कोरियाचे लोक स्वतःच्या मर्जीने आपले घरही रंगवू शकत नाहीत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार तेथील इमारतींवर फक्त राखाडी रंग असला पाहिजे आणि त्यावर नेत्यांची छायाचित्रे ठेवण्याचा नियम आहे.
14) उत्तर कोरिया मध्ये फक्त 605 पुरुष इंटरनेट चालवतात.
15) उत्तर कोरिया मध्ये प्रत्येक घरात सरकार द्वारा नियंत्रित रेडिओ बसवले गेले आहेत. नागरिकांना ते बंद करण्याची परवानगी नाही.
16) उत्तर कोरिया मध्ये फक्त तीन दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत.
17) उत्तर कोरिया मधील लोक मानवी विष्ठेचा खत म्हणून वापर करतात.
18) उत्तर कोरिया कडे जगातील सर्वात मोठे आहे सैन्य आहे. ते अमेरिकेपेक्षा पाच पट मोठे आहे.
19) उत्तर कोरिया मध्ये गांजा वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी आहे.
20) उत्तर कोरिया ची जवळजवळ संपूर्ण लोकसंख्या अत्यंत दारिद्र्यात जगत आहे.
उत्तर कोरिया विषयी माहिती (North Korea information in marathi)
21) गेल्या 60 वर्षांमध्ये उत्तर कोरियातील 23 हजार लोक दक्षिण कोरियात स्थलांतरित झाले आहेत. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही ठेवण्यात आला होता. तर दुसरीकडे दक्षिण कोरिया तून फक्त दोनच लोक उत्तर कोरियात आले आहेत.
22) उत्तर कोरिया मध्ये कोणीही जीन्स घालू शकत नाही.
23) उत्तर कोरियात आपण भिकाऱ्यांचे फोटो काढू शकत नाही.
24) उत्तर कोरिया मध्ये सामान्य नागरिकांना गाड्या खरेदी करण्याची परवानगी नाही. सरकारी अधिकारी आणि लष्करी अधिकारी हेच फक्त गाड्या घेऊ शकतात.
25) उत्तर कोरिया मध्ये दर पाच वर्षांनी निवडणूक होते. परंतु तेथे एकच उमेदवार असतो.
26) उत्तर कोरियाच्या दक्षिणेला दक्षिण कोरिया, तर उत्तरेला चीन हा देश आहे. याच्या पूर्वेला कोरियाचे आखात व पश्चिमेला जपानचा समुद्र आहे.
27) 1 मार्च 1919 हा उत्तर कोरिया चा स्वातंत्र्य दिवस आहे.
28) जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात त्यांनी स्वतःचे डेस्क आणि खुर्च्या उपलब्ध करून देणे उत्तर कोरिया मध्ये आवश्यक आहे.
29) उत्तर कोरियाच्या नागरिकांना फक्त इंटरनेटवर 28 वेबसाइट ब्राउझ करण्याची परवानगी आहे.
30) उत्तर कोरिया मध्ये संगणक मात्र खूप महाग आहेत आणि कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असते.
उत्तर कोरिया बद्दल माहिती
31) जीवनाच्या इतर पैलूंवर निर्बंधांप्रमाणे, उत्तर कोरियामध्ये कोणतेही धार्मिक स्वातंत्र्य नाही. हा देश स्वतःला नास्तिक राज्य म्हणतो आणि जो कोणी कोणत्याही धर्माचे पालन करताना दिसतो त्याचा छळ केला जातो.
32) बास्केटबॉलसाठी उत्तर कोरियाचे स्वतःचे नियम आहे.
33) उत्तर कोरिया देशाची अर्थव्यवस्था कदाचित जीर्ण अवस्थेत असेल, ज्याची बहुसंख्य लोकसंख्या अन्नासाठी हताश असेल, परंतु हे त्याच्या जीडीपीच्या 20 टक्के भाग सैन्यावर खर्च करतात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर कोरिया कोणत्या खंडात आहे?
उत्तर कोरिया पूर्व आशिया खंडात आहे.
उत्तर कोरिया ची राजधानी कोणती आहे?
उत्तर कोरिया ची राजधानी प्यॉंगयांग आहे.
उत्तर कोरिया ची लोकसंख्या किती आहे?
उत्तर कोरिया ची लोकसंख्या 2.5 कोटी (2020) आहे.
उत्तर कोरिया चे राष्ट्रीय चलन काय आहे?
उत्तर कोरिया चे राष्ट्रीय चलन North Korean won आहे.
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तर कोरिया देशाची माहिती (North Korea information in marathi) जाणून घेतली. उत्तर कोरिया माहिती मराठी (Uttar Korea mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.