भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे व माहिती

भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे : तुमचा सर्वात आवडता खेळ कोणता म्हटलं की तुमच्या समोर क्रिकेटचे नाव नक्की येत. आपल्या भारतामध्ये सुद्धा याला खूप पसंद केलं जातं. आपल्या भारत देशाने सुद्धा यामध्ये अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. हे विश्वविक्रम करण्यासाठी मदत केली त्या आपल्या भारतीय खेळाडूंनी. आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे (Names of Indian cricketers in Marathi) जाणून घेणार आहोत.

क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी 11 खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू (बाॅल) आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे.

भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे (Names of Indian cricketers in Marathi)

भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे (Names of Indian cricketers in Marathi)

भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे जन्मतारीख
सचिन तेंडुलकर24 एप्रिल 1973
सौरभ गांगुली08 जुलै 1972
विरेंद्र सेहवाग20 ऑक्टोबर 1978
व्ही.व्ही.स. लक्ष्मण01 नोव्हेंबर 1974
युवराज सिंग12 डिसेंबर 1981
गौतम गंभीर14 ऑक्टोबर 1981
हरभजन सिंग03 जुलै 1980
विराट कोहली05 नोव्हेंबर 1988
महेंद्र सिंग धोनी07 जुलै 1981
राहुल द्रविड11 जानेवारी 1973
अनिल कुंबळे17 ऑक्टोबर 1970
रोहित शर्मा30 एप्रिल 1987
शिखर धवन05 डिसेंबर 1985
अजिंक्य रहाणे05 जून 1988
भुवनेश्वर कुमार05 फेब्रुवारी 1990
दिनेश कार्तिक01 जून 1985
रविचंद्रन अश्विन17 सप्टेंबर 1986
रवींद्र जडेजा06 डिसेंबर 1988
श्रीशांत06 फेब्रुवारी 1983
सुरेश रैना27 नोव्हेंबर 1986
झहीर खान07 ऑक्टोबर 1978
हार्दिक पांड्या11 ऑक्टोबर 1993
जसप्रीत बुमराह06 डिसेंबर 1993
केदार जाधव26 मार्च 1985
के.एल. राहुल05 डिसेंबर 1985
कुलदीप यादव14 डिसेंबर 1994
मोहमद शमी03 सप्टेंबर 1990
विजय शंकर26 जानेवारी 1991
यजुवेंद्र चहल23 जुलै 1990

भारतीय क्रिकेट खेळाडूंची माहिती (Indian cricket players Information in Marathi)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)

हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकीर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.

महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni)

महेंद्र सिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी राजपूत परिवार मध्ये झाला होता. माही व एम.एस. धोनी या नावाने तो ओळखला जातो. त्याने 2007 पासून 2016 पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये आणि 2008 पासून 2014 पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले. त्याने 2007 च्या आयसीसी विश्वचषक 20-20, 2010 आणि 2016 आशिया कप, 2011 आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

युवराज सिंग (Yuvraj Singh)

हा भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज आहे. माजी वेगवान गोलंदाज आणि पंजाबी अभिनेते योगराजसिंग हे युवराज सिंगचे वडील आहेत. 2000 सालापासुन तो भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा सदस्य आहे. 2003 मध्ये त्याने पहिला कसोटी सामना खेळला. 2007 ते 2008 पर्यंत तो भारतीय एकदिवसीय संचाचा उपकर्णधार होता. 2011 च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते.

विराट कोहली (Virat Kohli)

हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे. इएसपीएन च्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या 2016 च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.

सुरेश रैना (Suresh Raina)

हा भारतचा ध्वज भारत क्रिकेट संघातील एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. तो अधूनमधून फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो. आय.पी.एल स्पर्धेत रैना चेन्नई सुपर किंग्स या संघाचा उपकर्णधार आहे. आय.पी.एल. मधील सर्वात जास्त धावा व झेल त्याच्याच नावावर आहे. आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत.

सारांश (Summary):

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतीय क्रिकेट खेळाडूंची नावे मराठी (Names of Indian cricketers in Marathi) जाणून घेतली. भारतीय क्रिकेट खेळाडूंची माहिती (Indian cricket players Information in Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. अश्याच प्रकारच्या माहितीसाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *