पश्चिम बंगाल राज्याची माहिती | West Bengal information in marathi

West Bengal information in marathi : पश्चिम बंगाल भारतातील पूर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. पश्चिम बंगाल हे राज्य विस्ताराने खूप छोटे आहे. परंतु येथील लोकसंख्या जास्त आहे. या राज्यातील लोकांचा मुख्य आहार भात आणि मासे आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पश्चिम बंगाल राज्याची माहिती (West Bengal information in marathi) जाणून घेऊ या.

West Bengal information in marathi
पश्चिम बंगाल राज्याची माहिती (West Bengal information in marathi)

पश्चिम बंगाल राज्याची माहिती (West Bengal information in marathi)

राज्यपश्चिम बंगाल
स्थापना26 जानेवारी 1950
राजधानीकोलकाता
अधिकृत भाषाबंगाली, नेपाळी
सर्वात मोठे शहरकोलकाता
जिल्हे23
लोकसंख्या9,13,47,736
क्षेत्रफळ88,752 चौकिमी
पश्चिम बंगाल राज्याची माहिती (West Bengal information in marathi)

1) पश्चिम बंगाल भारताच्या पूर्व भागामध्ये स्थित एक राज्य आहे. येथील मुख्य भाषा बंगाली आहे.

2) पश्चिम बंगाल ची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे.

3) पश्चिम बंगालमधील सरकारी भाषा बंगाली आणि इंग्रजी याबरोबरच हिंदी, ओडीसा, उर्दु, पंजाबी, इत्यादी भाषा बोलल्या जातात.

4) पश्चिम बंगाल मधील सर्वात मोठे शहर कोलकत्ता आहे.

5) पश्चिम बंगालमध्ये 295 विधानसभा मतदारसंघ आहेत.

6) पश्चिम बंगालमध्ये कोलकत्ता येथे उच्च न्यायालय आहे.

7) पश्चिम बंगालचे क्षेत्रफळ 88 हजार 752 चौरस किलोमीटर आहे.

8) क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौदावे सर्वात मोठे राज्य पश्चिम बंगाल आहे.

9) पश्चिम बंगाल ची लोकसंख्या नऊ कोटी 13 लाख 47 हजार 736 आहे. लोकसंख्येनुसार पश्चिम बंगाल भारतातील चौथे सर्वात मोठे राज्य आहे.

10) पश्चिम बंगाल ची घनता 904 प्रती चौकिमी आहे.

पश्चिम बंगाल माहिती मराठी (Paschim Bengal mahiti marathi)

11) तेराव्या शतकामध्ये पश्चिम बंगाल वर इस्लामी शासन होते.

12) सोळाव्या शतकामध्ये जेव्हा मुगल शासन होतं तेव्हा बंगाल एक समृद्ध व्यापारी केंद्र होते.

13) राज्याचा सर्वात मोठा उत्पन्न हिस्सा कृषी उत्पादनातून येतो.

14) हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असले तरीही देशाच्या एकूण उत्पन्नातील 14 टक्के तांदूळ याच राज्यातून येतो.

15) राज्याच्या दक्षिण विस्तार मध्ये गहू आणि आल्याची शेती सर्वात जास्त केली जाते.

16) पश्चिम बंगालमध्ये सफरचंद, संत्री, अननस यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते.

17) पश्चिम बंगालच्या मध्यभागात आणि दक्षिण भागांमध्ये आंबा आणि केळी यांचे उत्पादन घेतले जाते.

18) पश्चिम बंगालमध्ये मॅग्नीज, लोह, पेट्रोल, कोळसा यासारखी खनिज तत्त्व मिळते.

19) पश्चिम बंगाल भारतातील मुख्य आर्थिक केंद्र असलं तरीही येथे शिक्षण आणि रोजगार यांची खूप मोठी समस्या आहे.

20) पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा खूप मोठ्या धूमधाम पणे साजरी केली जाते.

पश्चिम बंगाल विषयी माहिती (West Bengal information in marathi)

21) पश्चिम बंगालमधील लोक फुटबॉल आणि क्रिकेट हा खेळ सर्वात जास्त खेळतात.

22) नक्षलवादी या शब्दाचा जन्म येथूनच झाला आहे असे मानले जाते. बंगाली भाषा गोड मानली जाते.

23) पश्चिम बंगालमधील लोक मुख्यतः भात आणि मासे खातात. या शिवाय पश्चिम बंगाल त्यांच्या मिठाई साठी प्रसिद्ध आहे.

24) भारताची राजधानी दिल्ली नंतर कोलकत्ता भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे.

25) गंगा, भागीरथी, दामोदर या येथील प्रमुख नद्या आहेत.

26) छऊ, लाटी, संथाल हे येथील प्रमुख नृत्य आहेत.

27) 2011 नुसार पश्‍चिम बंगालचा साक्षरता दर 77.08 टक्के आहे.

28) पश्चिम बंगालमध्ये एकूण 23 जिल्हे आहेत.

29) पश्चिम बंगाल मधील हवामान उष्णकटिबंधीय आहे.

30) बंगाली वाघ येथील राष्ट्रीय प्राणी आहे.

पश्चिम बंगाल मधील जिल्हे (Districts Of West Bengal in Marathi)

दार्जीलिंगजलपाईगुड़ी
कूचबिहारउत्तर दिनाजपुर
दक्षिण दिनाजपुरमालदा
बीरभूममुर्शिदाबाद
पूर्व बर्द्धमाननदिया
पुरुलियाबांकुड़ा
हुगलीउत्तर 24 परगना
पश्चिम मेदिनीपुरहावड़ा
कोलकाताअलीपुरद्वार
दक्षिण 24 परगनापश्चिम बर्धमान
पूर्व मेदिनीपुरझारग्राम
कलिंपोंग
पश्चिम बंगाल मधील जिल्हे

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पश्चिम बंगाल राज्य शेजारी कोणता देश आहे?

बांगलादेश, भूतान आणि नेपाळ

प. बंगालमधील एक अभयारण्य

सुंदरवन नेशनल पार्क, गोरुमारा राष्ट्रीय उद्यान

पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

ममता बॅनर्जी (5 मे 2021 पासून)

पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे?

कोलकत्ता

पश्चिम बंगाल राज्याची लोकसंख्या किती आहे?

9,13,47,736

पश्चिम बंगाल राज्याचे राज्यपाल कोण आहेत?

जगदीप धंखर (Jagdeep Dhankhar)

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण पश्चिम बंगाल राज्याची माहिती (West Bengal information in marathi) जाणून घेतली. पश्चिम बंगाल माहिती मराठी (Paschim Bengal mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *