Uttar Pradesh Information in Marathi : उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य आहे. हे राज्य भारताच्या उत्तर भागामध्ये स्थित आहे. उत्तर प्रदेश ही भूमी खुप सार्या देवी देवतांनी भरलेली आहे. अनेक देवी देवतांचा जन्म सुद्धा येथे झाला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तर प्रदेश राज्याची माहिती (Uttar Pradesh Information in Marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
उत्तर प्रदेश ची माहिती (Uttarpradesh information in marathi)
राज्य | उत्तर प्रदेश |
राजधानी | लखनऊ |
स्थापना | 26 जानेवारी 1950 |
राज्यभाषा | हिंदी |
सर्वात मोठे शहर | कानपूर |
जिल्हे | 75 |
लोकसंख्या | 23.79 कोटी (2019) |
क्षेत्रफळ | 243,286 चौकिमी |
1) उत्तर प्रदेश देशातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यापैकी एक आहे. मगद, नंद, मौर्य, मुघल इत्यादी. असं म्हणतात की येथे पारिजात वृक्षाला भगवान कृष्णाने स्वर्गाहुन आणले होते.
2) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जानेवारी 1950 मध्ये संयुक्त प्रांत हे नाव बदलून उत्तर प्रदेश असे ठेवण्यात आले.
3) उत्तर प्रदेश भारतातील सर्वात जास्त 23 कोटी लोकसंख्या असणारे राज्य आहे. येथे भारताची जवळजवळ 16.6 टक्के लोकसंख्या आहे. जर उत्तर प्रदेश एक देश असता तर तो जगातील सहावा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश बनला असता.
4) उत्तरप्रदेश एकमेव असे राज्य आहे, ज्याच्या सीमा इतर नऊ राज्यांना मिळतात. नेपाळ या देशाला सुद्धा या राज्याची सीमा लागते.
5) 2016 च्या एका रिपोर्टनुसार उत्तर प्रदेश अपराधीक आधिक गोष्टींसाठी सर्व भारतीय राज्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होता.
6) उत्तर प्रदेश राज्य गंगा आणि यमुना यांच्या मिळण्याची भूमी आहे. गंगा आणि यमुना या येथील दोन प्रमुख नद्या आहेत. या नद्या बंगालच्या खाडीला मिळण्याअगोदर या राज्यातून वाहत जातात.
7) उत्तर प्रदेश आपल्या वेगळ्या संस्कृतीसाठी ओळखला जातो. येथे विविध प्रकारचे नृत्य, उत्सव, सभा, संगीत, नाटक, सिनेमा इत्यादी केले जातात.
8) कथक या राष्ट्रीय नृत्याची उत्पत्ती याच राज्यामध्ये झाली होती. लोकप्रिय संगीत येथे रसिया ला म्हणतात.
9) उत्तर प्रदेश मधील प्रयागराज हे त्या चार पवित्र तीर्थ क्षेत्रापैकी एक आहे, जिथे कुंभमेळ्याचे आयोजन केलं जातं. 2013 मध्ये प्रयागराज कुंभमेळा मध्ये बारा कोटी म्हणजेच 120 मिलियन लोक आले होते.
10) उत्तर प्रदेश पर्यटनासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेश मध्ये प्रत्येक वर्षी सात मिलीयन पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक यात्रा करतात.
उत्तर प्रदेश माहिती मराठी (Uttar Pradesh mahiti Marathi)
11) उत्तर प्रदेश राज्या मध्ये सर्वात जास्त लोकसभा आणि राज्यसभा उमेदवार उभारले जातात. राज्य विधानसभा लखनऊ मध्ये स्थित आहे.
12) वाराणसी ला भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. हेसुद्धा उत्तरप्रदेशमध्ये स्थित आहे. या शहराला जगातील सर्वात जुने शहर म्हणून ओळखले जाते. हे शहर मंदिरे आणि गंगा नदी साठी प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हे शहर तीन हजार वर्षे जुने आहे.
13) गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश सारनाथ नावाच्या गावांमध्ये दिला होता. हे गाव उत्तर प्रदेश मध्ये स्थित आहे.
14) हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ध्यानचंद यांचा जन्म सुद्धा इलाहाबाद येथे झाला होता. त्यावेळी ते ब्रिटिशांचे राज्य होते. इलाहाबाद अजूनही उत्तरप्रदेशमध्ये आहे.
15) उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव Snapdeal.com नगर असं आहे. या गावातील लोकांना पाण्यासाठी खूप दूर जावं लागत होतं. तेव्हा स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपनीने या गावांमध्ये 14 हँड पंप बसवले होते.
16) भारतातील एकूण ऊस उत्पादनामध्ये अर्धे ऊस उत्पादन उत्तर प्रदेश एकटे राज्य करते.
17) उत्तर प्रदेश राज्याचा राज्य वृक्ष अशोक आहे.
18) उत्तर प्रदेशचे राज्य फुल पळस आहे.
19) उत्तर प्रदेशचा राज्य प्राणी बारशिंगा आहे.
20) उत्तर प्रदेशचा राज्य पक्षी सारस क्रेन आहे.
उत्तर प्रदेशाची माहिती मराठीत (Uttar Pradesh information in marathi)
21) लखनऊ ही उत्तर प्रदेश की राजधानी आहे.
22) उत्तर प्रदेश मधील लोक हिंदी भाषेत बोलतात.
23) उत्तर प्रदेश मधील जवळजवळ सत्तर टक्के लोक साक्षर आहेत.
24) उत्तर प्रदेश मध्ये जवळ-जवळ 75 जिल्हे आहेत.
25) उत्तर प्रदेश मधील पहिले मुख्यमंत्री गोविन्द बलभ पंत आणि पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या.
26) उत्तर प्रदेश मधील सर्वात उंच पर्वत शिवलिका पर्वत आहे.
27) उत्तर प्रदेश राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती.
28) उत्तर प्रदेशची राजधानी पहिल्यांदा अलाहाबाद होती.
नंतर ती बदलून लखनऊ करण्यात आली.
29) लखीमपुर-खीरी उत्तर प्रदेश मधील सर्वात मोठा जिल्हा आहे.
30) उत्तर प्रदेश ला भारतीय राजकारणाचे केंद्र मानले जाते.
31) तांदूळ, गहू, मका व डाळ ही उत्तर प्रदेश मधील प्रमुख पिके आहेत.
32) उत्तर प्रदेशचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. राज्यात 78 टक्के लोक शेती करतात. लागवडी खालील शेती क्षेत्र 168.19 लाख हेक्टर इतके आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भारतातील उत्तर प्रदेश राज्य शेजारी कोणता देश आहे?
उत्तर : नेपाळ
उत्तर प्रदेश मध्ये किती जिल्हे आहेत
उत्तर :75
उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शहर
उत्तर : सारनाथ
उत्तर प्रदेश ची राजधानी कोणती आहे?
उत्तर : लखनऊ
उत्तर प्रदेश ची लोकसंख्या किती आहे?
उत्तर : 23.79 कोटी (2019)
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण उत्तर प्रदेश राज्याची माहिती (Uttar Pradesh Information in Marathi) जाणून घेतली. उत्तर प्रदेश माहिती मराठी (Uttar Pradesh mahiti Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.